Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 15:39 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 ते यासाठी की तुम्ही त्यांच्याकडे पाहावे व याहवेहच्या सर्व आज्ञांचे तुम्हाला स्मरण व्हावे, म्हणजे तुम्ही त्यांचे पालन करावे आणि आपल्या अंतःकरणाच्या व डोळ्यांच्या वासनांच्या मागे लागून व्यभिचार करू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 ह्या गोंड्यांचा उद्देश असा की, ते तुमच्या नजरेस पडून परमेश्वराच्या सगळ्या आज्ञांचे तुम्हांला स्मरण व्हावे व तुम्ही त्या पाळाव्यात; आपल्या मनास येईल तसे तुम्ही व्यभिचारी मतीने वागत आलात तसे वागू नये;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 या गोंड्याचा उद्देश असा की, ते बघून परमेश्वराने दिलेल्या सगळ्या आज्ञा लक्षात ठेवाल व आज्ञा पाळाल. तुमचे हृदय व तुमची दृष्टी ज्यांच्यामागे जाऊन तुम्ही व्यभिचारी होत असा, त्याच्यामागे तुम्ही जाऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 15:39
21 Iomraidhean Croise  

आठव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, त्याने स्वतःच निवडलेल्या महिन्यात, त्याने बेथेलमध्ये बांधलेल्या वेदीवर यज्ञार्पणे केली. त्याने इस्राएली लोकांसाठी सण स्थापित करून वरती वेदीवर जाऊन अर्पणे सादर केली.


जर माझे पाऊल मार्गातून भटकले असतील, जर माझ्या हृदयाने माझ्या डोळ्यांचे अनुसरण केले असेल, अथवा माझे हात भ्रष्ट झाले असतील,


आपल्याच कर्मानी ते भ्रष्ट झाले; आणि त्यांचे कृत्य व्यभिचारी ठरले.


जे तुमच्यापासून दूर आहेत त्यांचा नाश होईल; तुमच्याशी विश्वासघात करणार्‍यांना तुम्ही नष्ट करता.


हे तुम्हाला तुमच्या हातावरील खूण व कपाळावर स्मरणचिन्हासारखे असणार. याहवेहचा हा नियम तुमच्या मुखात असावा. कारण याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले.


स्वतःवरच भरवसा ठेवणारा मनुष्य मूर्ख आहे. पण शहाणपणाने वागणारे सुरक्षित राहतील.


माझ्या मुला, माझे शिक्षण विसरू नकोस, परंतु माझ्या आज्ञा तुझ्या अंतःकरणात ठेव;


जो तू तरुण आहेस, तो तू तारुण्यात आनंदी राहा, तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला आनंद देवो. तुझे हृदय जे काही इच्छिते आणि तुझे नेत्र जे काही पाहतात त्याप्रमाणे कर, परंतु हे लक्षात असू दे की परमेश्वर या सर्वांनुसार तुझा न्याय करेल.


याउलट ते हट्टीपणाने मनाला येईल तसे वागले, आणि त्यांच्या पूर्वजांनी शिकविल्याप्रमाणे त्यांनी बआलच्या मूर्तीचे अनुसरण केले.”


मग ज्या राष्ट्रांमध्ये ते निर्वासित म्हणून जातील व जे वाचतील ते माझे स्मरण करतील; त्यांचे व्यभिचारी हृदय, जे माझ्यापासून दूर वळले आहे आणि त्यांचे डोळे, जे त्यांच्या मूर्तीमागच्या वासनांनी पेटले आहे, त्याने मला किती दुःखी केले. त्यांनी जी वाईट कृत्ये केली आणि त्यांच्या अमंगळ कृत्यांमुळे ते स्वतःचीच घृणा करतील.


“तुम्ही आपल्या आईला रागवा, तिला रागवाच, कारण ती माझी पत्नी नाही, आणि मी तिचा पती नाही. ती आपल्या मुखावरून तिचे व्यभिचारी रूप आणि अविश्वासूपणा तिच्या स्तनांमधून दूर करो.


जो कोणी अशी महत्त्वाची आणि गंभीर स्वरुपाची शपथ आपल्या कानांनी ऐकतो आणि स्वतःला आशीर्वाद देऊन म्हणतो, “माझ्या स्वतःच्याच इच्छेने मी चाललो तरी माझे काही बिघडणार नाही, मी सुरक्षित राहीन;” असे म्हणणारी माणसे सिंचित भूमी आणि कोरड्या भूमीवर नाश ओढवून घेतील.


तेव्हा सावधगिरी बाळगा, नाहीतर याहवेह तुमच्या परमेश्वराने मनाई केलेल्या वस्तूंची तुम्ही स्वतःसाठी कोरीव प्रतिमा कराल आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या कराराचे तुम्हाला विस्मरण होईल.


ज्या याहवेहने तुम्हाला इजिप्त देशातून, दास्यगृहातून बाहेर आणले त्यांना तुम्ही विसरू नये याची खबरदारी घ्या.


परंतु याच वेळी तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे, नाहीतर तुम्ही आपल्या समृद्धीत याहवेह तुमच्या परमेश्वराला विसराल व त्यांच्या ज्या आज्ञा, नियम व विधी मी तुम्हाला आज देत आहे, त्या पाळण्याचे सोडून द्याल.


तेव्हा तुमचे अंतःकरण उन्मत्त होईल आणि ज्यांनी तुम्हाला इजिप्त देशाच्या गुलामगिरीतून काढून बाहेर आणले, त्या याहवेह तुमच्या परमेश्वराला तुम्ही विसरून जाल.


व्यभिचारी लोकांनो, जगाशी मैत्री परमेश्वराबरोबर वैर आहे हे तुम्हाला समजत नाही काय? यास्तव, जो कोणी जगाचा मित्र होण्याचे पसंत करतो तो परमेश्वराचा शत्रू झाला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan