Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 15:25 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

25 याजकाने सर्व इस्राएली समुदायासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल; कारण त्यांनी मुद्दाम पाप केले नव्हते आणि त्यांनी याहवेहला आपल्या पापाबद्दल अन्नार्पण व पापार्पण सादर केले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

25 मग याजकाने इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीसाठी प्रायश्‍चित्त करावे, म्हणजे त्यांना क्षमा होईल; कारण त्यांचे पाप चुकून झाले असून त्यांनी आपल्या ह्या चुकीबद्दल आपले अर्पण म्हणजे परमेश्वराप्रीत्यर्थ हव्य आणि आपला पापबली परमेश्वरासमोर अर्पण केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

25 म्हणून याजकाने इस्राएलाच्या सर्व लोकांसाठी प्रायश्चित करावे. म्हणजे त्याची क्षमा होईल. कारण त्यांचे पाप चुकून झाले असून त्यांनी आपल्या या चुकीबद्दल आपले अर्पण म्हणजे परमेश्वराकरता हव्य आणि आपला पापबलि परमेश्वरासमोर अर्पिला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 15:25
13 Iomraidhean Croise  

तुझ्या मुखाने तुला पाप करावयास लावू नये. “मी चुकून नवस केला” असे मंदिराच्या दूताला सांगून निषेध करू नकोस. तू जे बोलतो त्याबद्दल परमेश्वराने रागावून तुझ्या हाताचे कार्य नष्ट का करावे?


याजकाने त्यातील एका पक्ष्याचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण करावे. अशाप्रकारे याजकाने त्याच्या स्त्रावासाठी याहवेहसमोर प्रायश्चित करावे.


पापार्पणाच्या गोर्‍ह्यासंबंधीच्या विधीप्रमाणेच त्याने या गोर्‍ह्याचेही करावे. अशा प्रकारे याजकाने संपूर्ण समुदायासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्यांची क्षमा होईल.


शांत्यर्पणाच्या अर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे या सर्व चरबीचा वेदीवर होम करावा. अशाप्रकारे पुढार्‍याच्या पापाबद्दल, याजक प्रायश्चित करेल आणि त्याची क्षमा होईल.


मग सर्व चरबी काढून शांत्यर्पणाच्या यज्ञपशूच्या चरबीप्रमाणे याजकाने तिचा याहवेहसाठी सुवासिक हव्य म्हणून वेदीवर होम करावा. अशाप्रकारे याजकाने त्या व्यक्तीसाठी प्रायश्चित्त करावे म्हणजे त्याची क्षमा होईल.


शांत्यर्पणाच्या कोकराच्या चरबीचा उपयोग करतात, तसा या चरबीचा उपयोग करावा. याजकाने सर्व चरबी काढून तिचे वेदीवर याहवेहसमोर होम करावे. अशाप्रकारे याजक त्या व्यक्तींसाठी प्रायश्चित करेल, म्हणजे त्यांच्या पापांची क्षमा होईल.


तेव्हा येशू म्हणाले, “हे पित्या, यांना क्षमा कर, कारण ते काय करीत आहेत, ते त्यांना समजत नाही.” आणि येशूंची वस्त्रे सैनिकांनी चिठ्ठ्या टाकून वाटून घेतली.


जो प्रत्येकजण विश्वास ठेवतो, तो त्यांच्याद्वारे सर्व पापांपासून मुक्त होतो, मोशेच्या नियमशास्त्राच्या आधारे ही गोष्ट पटवून देणे तुम्हाला शक्य झाले नव्हते.


ख्रिस्ताच्या सांडलेल्या रक्ताने विश्वासाद्वारे प्रायश्चिताचा यज्ञ व्हावा म्हणून परमेश्वराने त्यांना प्रस्तुत केले. यासाठी की मागे केलेल्या आपल्या पापांसाठी त्यांच्या सहनशीलतेमुळे दंड मिळू नये, तर त्यांचे नीतिमत्व प्रगट व्हावे.


मग त्या नगरातील सर्व लोकांनी त्याला धोंडमार करून ठार मारावे. अशा रीतीने तुमच्यामधील दोष तुम्ही घालवून टाकावे म्हणजे सर्व इस्राएली लोक हे ऐकतील आणि घाबरतील.


या कारणासाठी त्यांना आपल्यासारखे म्हणजे बंधूसारखे होणे व पूर्ण मानव होणे अगत्याचे होते, कारण त्यामुळेच त्यांना परमेश्वरासमोर आपला कृपाळू व विश्वासू याजक होता आले आणि मनुष्याच्या पापांबद्दल प्रायश्चित करता आले.


पण आतील खोलीत फक्त महायाजकच प्रवेश करीत असे आणि तेही वर्षातून एकदाच. तो स्वतःसाठी आणि लोकांनी अजाणतेने केलेल्या पापांसाठी रक्त अर्पण करत असतो आणि रक्ताशिवाय तो इथे कधीही प्रवेश करीत नाही.


तेच आपल्या पापांसाठी प्रायश्चिताचा यज्ञ आहेत आणि केवळ आपल्यासाठीच नाही तर सर्व जगाच्या पापांसाठीसुद्धा आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan