Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 14:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 सर्व इस्राएली लोकांनी मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध कुरकुर केली आणि सर्व समुदाय त्यांना म्हणाला, “आम्ही इजिप्त देशात किंवा या रानातच मेलो असतो तर किती बरे असते!

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 सर्व इस्राएल लोक मोशे आणि अहरोन ह्यांच्याविरुद्ध कुरकुर करू लागले; सर्व मंडळी त्यांना म्हणाली, “आम्ही मिसर देशात मेलो असतो तर बरे झाले असते किंवा ह्याच रानात मेलो असतो तरी बरे झाले असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 इस्राएल लोकांनी मोशे आणि अहरोनाविरूद्ध तक्रारी केल्या. सर्व मंडळी त्यांना म्हणाली “आम्ही मिसर देशामध्ये किंवा रानात मरण पावलो असतो तर बरे झाले असते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 14:2
31 Iomraidhean Croise  

तो स्वतः एक दिवसाचा प्रवास करीत रानात गेला, तो रतामाच्या झुडूपाखाली आला आणि मरून जावे म्हणून तिथे बसून प्रार्थना केली. “हे याहवेह आता पुरे आहे, माझा प्राण घ्या, मी माझ्या पूर्वजांपेक्षा चांगला आहे असे नाही.”


“मी जन्माला आलो तेव्हाच का नाश पावलो नाही? गर्भाशयातून निघताच माझे प्राण का गेले नाहीत?


वचनदत्त देशास त्या लोकांनी तुच्छ लेखले; त्यांनी दिलेल्या अभिवचनांवर त्यांचा विश्वास नव्हता.


त्यांनी आपल्या तंबूत कुरकुर केली, आणि याहवेहची आज्ञा झिडकारली.


त्यांच्याकरिता त्यांनी आपल्या कराराचे स्मरण केले, आणि त्यांच्या महान प्रीतीमुळे त्यांचे अंतःकरण द्रवले.


ते मोशेला म्हणाले, “इजिप्त देशात कबरा नव्हत्या म्हणून तू आम्हाला या रानात मरायला आणले काय? इजिप्तमधून आम्हास बाहेर आणून तू हे काय केले?


“आम्ही काय प्यावे?” असे म्हणत लोकांनी मोशेविरुद्ध कुरकुर केली.


पण तिथे लोकांना फारच तहान लागली होती आणि ते मोशेविरुद्ध कुरकुर करीत म्हणाले, “आम्ही व आमची मुलेबाळे व पशू तहानेने मरून जावे म्हणून तू आम्हाला इजिप्त देशाबाहेर आणलेस का?”


तेव्हा हे याहवेह, माझा जीव घ्या, कारण मला जगण्यापेक्षा मरणेच बरे आहे.”


जेव्हा सूर्य उगवला तेव्हा परमेश्वराने पूर्वेचा एक प्रखर वारा पाठवला आणि योनाहच्या डोक्यावर सूर्याची उष्णता आदळली, ज्यामुळे तो मूर्छित झाला. त्याला मरावेसे वाटू लागले, आणि तो म्हणाला, “मला जगण्यापेक्षा मरण बरे.”


मग असे झाले की लोक याहवेहसमोर असताना त्यांच्या कष्टांबद्दल तक्रार करू लागले. जेव्हा याहवेहने ते ऐकले तेव्हा त्यांचा राग भडकला आणि त्यांच्यामध्ये याहवेहचा अग्नी पेटला आणि छावणीच्या बाहेरील काही भाग भस्म झाला.


तुम्ही मला असेच वागविणार असाल आणि तुमच्या दृष्टीत मी जर कृपा पावलो असलो तर मला मारून टाका. मी माझाच नाश पाहावा असे होऊ देऊ नये.”


इजिप्त देशात आम्ही फुकट मासे खाल्ले; आणि काकड्या, खरबुजे, कंदभाजी, कांदे आणि लसूण यांची सुद्धा आम्हाला आठवण येते.


रात्रीच्या वेळी लोकसमुदायाचे सर्व सभासद आपला आवाज उंच करून मोठ्याने रडू लागले.


ज्यांनी माझे वैभव आणि मी इजिप्तमध्ये व रानात केलेले चमत्कार पाहिले आहेत आणि तरीही माझा आज्ञाभंग केला व दहा वेळा माझी परीक्षा पाहिली;


दूध व मध वाहत असलेल्या देशातून तू आम्हाला या रानात मारण्यास आणले ते पुरे नाही काय? आणि आता तुला आमच्यावर प्रभुत्व करावयाचे आहे!


पण दुसर्‍याच दिवशी सकाळी सर्व इस्राएली लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध पुन्हा कुरकुर करू लागले. ते त्यांना म्हणाले, “तुम्हीच याहवेहच्या लोकांना मारून टाकले.”


म्हणून मोशे इस्राएली लोकांशी बोलला आणि त्यांच्या पुढार्‍यांनी त्याला बारा काठ्या दिल्या, त्यांच्या पूर्वजांच्या गोत्रांप्रमाणे प्रत्येक पुढार्‍याकडून एक काठी आणि त्यांच्यामध्ये एक अहरोनाची काठी होती.


त्या ठिकाणी समुदायासाठी पाणी नव्हते आणि लोक मोशे आणि अहरोन यांच्याविरुद्ध एकत्र आले.


लोक मोशेशी भांडण करीत म्हणाले, “याहवेहसमोर आमचे भाऊबंद जेव्हा मरून पडले, तेव्हाच आम्हीही मेलो असतो तर बरे होते!


याहवेहच्या समुदायाला तुम्ही या अरण्यात का आणले, आम्ही व आमच्या जनावरांनी मरावे म्हणून आणले काय?


ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध कुरकुर करीत बोलू लागले व म्हणाले, “तुम्ही आम्हाला या रानात मरावे म्हणून इजिप्तमधून का आणले? येथे भाकर नाही! पाणी नाही! आणि हे बेचव अन्न आम्हाला नकोसे झाले आहे.”


आणि कुरकुर करू नका, जशी त्यांच्यापैकी काहींनी केली आणि ते नाश करणार्‍या दूताच्या हातून मरण पावले.


आपल्या तंबूत बसून तुम्ही कुरकुर केली आणि म्हटले, “याहवेह आमचा द्वेष करीत आहेत, म्हणून अमोर्‍यांच्या हातून आमचा नाश व्हावा यासाठी त्यांनी आम्हाला इजिप्त देशातून इकडे आणले आहे.


आणि जेव्हा याहवेहने तुम्हाला कादेश-बरनेआ येथून पाठविले, तेव्हा ते म्हणाले, “वर जा आणि जो देश मी तुम्हाला दिला आहे त्याचा ताबा घ्या.” पण तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेविरुद्ध बंड केले. त्यांच्यावर भरवसा ठेवला नाही व त्यांची आज्ञा पाळली नाही.


ज्यांनी वाणी ऐकली आणि नंतर बंड केले ते लोक कोण होते? मोशेने ज्यांना इजिप्तमधून बाहेर काढले, तेच हे लोक होते नाही का?


हे लोक कुरकुर करणारे आणि दोष शोधणारे आहेत; वाईट वासनांच्या मागे लागणारे, स्वतःची बढाई मारणारे आणि स्वतःच्या लाभासाठी इतरांची खुशामत करणारे आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan