Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 14:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 मी त्यांच्यावर पीडा आणून त्यांचा नाश करेन, परंतु मी तुझ्यापासून त्यांच्याहून मोठे व बलवान राष्ट्र करेन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मी त्यांचा मरीने संहार करून त्यांचा वारसा नष्ट करीन आणि तुझेच त्यांच्याहून मोठे व प्रबळ राष्ट्र करीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मी त्यांना मरीने मारून टाकीन. मी त्यांचा वारसा हक्क काढून घेईल, आणि मी तुझ्या स्वतःच्या कुळापासून त्यांच्यापेक्षा मोठे व सामर्थ्यशाली राष्ट्र करीन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 14:12
9 Iomraidhean Croise  

इस्राएली लोकांविरुद्ध याहवेहचा कोप पुन्हा भडकला आणि त्यांनी दावीदाला चिथविले, “जा आणि इस्राएल व यहूदीयाची शिरगणती कर.”


तर आता माझ्या आड येऊ नकोस. माझा राग मी त्यांच्याविरुद्ध भडकवीन आणि मी त्यांचा नाश करेन. मग मी तुला एक मोठे राष्ट्र बनवीन.”


तेव्हा ते फारोहला म्हणाले, “इब्री लोकांच्या परमेश्वराने आम्हाला दर्शन दिले. आता आम्ही याहवेह, आमच्या परमेश्वराला यज्ञ करावा म्हणून आम्हाला तीन दिवसांचा प्रवास करून रानात जाऊ दे. नाही तर परमेश्वर आम्हाला पीडांनी किंवा तलवारीने मारून टाकेल.”


“ ‘तरीही इस्राएली लोकांनी रानात माझ्याविरुद्ध बंड केले. त्यांनी माझे विधी पाळले नाही तर माझ्या नियमांचा धिक्कार केला; ज्यामुळे ज्यांनी नियमाचे पालन केले असते ते जगले असते; आणि त्यांनी माझ्या शब्बाथाला पूर्णपणे अपवित्र केले. म्हणून मी म्हणालो मी माझा क्रोध त्यांच्यावर ओतेन आणि रानात त्यांचा नाश करेन.


माझा करार मोडल्याबद्दल तुमच्यावर तलवार आणेन. तुम्ही आपआपल्या शहरांत एकत्र व्हाल, तेव्हा तिथे मी तुमच्यामध्ये प्राणघातक रोग पाठवेन आणि तुम्हाला तुमच्या शत्रूच्या हाती देण्यात येईल.


परंतु त्या पीडेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांची संख्या चोवीस हजार होती.


जो देश तुम्ही प्रवेश करून ताब्यात घेणार आहात, त्या देशातून तुम्ही समूळ नष्ट होईपर्यंत, याहवेह तुम्हावर मरी पाठवतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan