Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 13:21 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 मग ते गेले आणि सीन रानापासून हमाथाच्या जवळील रहोबा पर्यंतचा देश त्यांनी हेरला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 मग त्यांनी जाऊन सीन रानापासून हमाथाच्या वाटेवरील रहोबापर्यंत देश हेरला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 म्हणून ते तो प्रदेश शोधायला निघाले. त्यांनी सीन रानापासून रहोब आणि लेबो हमाथपर्यंतच्या प्रदेशात शोध घेतला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 13:21
15 Iomraidhean Croise  

हमाथाचा राजा तोई याने जेव्हा ऐकले की, दावीदाने हादादेजरच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केला आहे,


दिमिष्क विषयी: “हमाथ व अर्पाद ही शहरे भीतीने घाबरी झाली आहेत, कारण त्यांना वाईट बातमी समजली आहे. ते निराश झाले आहेत, एखाद्या खवळलेल्या समुद्रागत अस्वस्थ झाले आहेत.


आणि तो पकडला गेला. त्याला बाबिलोनी राजासमोर हमाथ राज्यातील रिब्लाह या शहरात आणण्यात आले. त्या ठिकाणी सिद्कीयाला शिक्षा सुनाविण्यात आली.


बेरोथाह व सिबराईमपासून (जी दिमिष्क व हमाथाच्या मध्ये आहे), हाजेर-हत्तीकोनपर्यंत, जे हवरानच्या सीमेवर आहे.


कालनेह येथे जा आणि तिला पाहा; तिथून महान हमाथास जा, आणि तिथून खाली पलिष्ट्यांच्या गथ येथे जा. हे तुमच्या दोन राज्याहून अधिक उत्तम आहेत काय? त्यांचा देश तुमच्या देशाहून मोठा आहे काय?


पहिल्या महिन्यात सर्व इस्राएली लोकांचा समुदाय सीन अरण्यात आला आणि त्यांनी कादेश येथे तळ दिला. तिथे मिर्याम मरण पावली व तिला तिथेच पुरण्यात आले.


कारण सीन रानात पाण्याजवळ जेव्हा इस्राएली लोकांनी बंड केले, त्यावेळी त्यांच्या नजरेपुढे मला पवित्र म्हणून मानण्यास नाकारून तुम्ही दोघांनी माझ्या आज्ञेचा भंग केला.” (हेच सीन रानातील, कादेश येथील मरीबाहचे पाणी.)


त्यांनी एजिओन-गेबेर सोडले आणि सीनच्या वाळवंटातील कादेश येथे तळ दिला.


आणि होर पर्वतापासून लेबो हमाथपर्यंत व तिथून ती सीमा जेदादपर्यंत न्यावी.


तिथून निघून ते डोंगराळ प्रदेशात पोहोचले आणि ते अष्कोल दरीपर्यंत आले व त्यांनी त्या प्रदेशाची पाहणी केली.


कारण सीनच्या अरण्यात कादेशच्या मरीबाह नावाच्या झर्‍याजवळ इस्राएली लोकांसमक्ष तू आणि अहरोनाने माझा विश्वासघात करून माझ्या पवित्रतेला आदर दिला नाही.


गिबली लोकांचा प्रदेश; बआल-गादपासून खाली हर्मोन पर्वत ते लेबो हमाथपर्यंत पूर्वेकडील सर्व लबानोन.


यहूदाह गोत्रास त्यांच्या कुटुंबानुसार चिठ्ठ्या टाकून देण्यात आलेला प्रदेश एदोमाच्या सीमेपर्यंत आणि सीनच्या वाळवंटातील दक्षिणेच्या सीमेपर्यंत पसरला होता.


त्यांना वाचविणारा कोणी नव्हता, कारण ते सीदोनापासून दूर राहत होते आणि त्यांचा इतर लोकांशी कसलाही व्यवहार नव्हता. हे शहर बेथ-रहोब शेजारी असलेल्या खोर्‍यात होते. मग दानच्या लोकांनी ते शहर पुन्हा बांधले आणि ते तिथे राहू लागले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan