Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 12:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 मी त्याच्याशी कोड्यात नाही, तर समोरासमोर स्पष्टपणे बोलतो; तो याहवेहचे रूप पाहतो. माझा सेवक मोशे याच्याविरुद्ध बोलण्यास तुम्हाला भीती का वाटली नाही?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मी त्याच्याशी स्पष्टपणे तोंडोतोंड बोलत असतो, गूढ अर्थाने बोलत नसतो; परमेश्वराचे स्वरूप तो पाहत असतो; तर माझा सेवक मोशे ह्याच्याविरुद्ध बोलायला तुम्हांला भीती कशी नाही वाटली?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मी त्याच्याशी समोरासमोर बोलतो. दृष्टांताने किंवा कोड्यानी बोलत नाही. तो माझे स्वरूप पाहत असतो. तर असे असताना माझा सेवक मोशे ह्याच्या विरूद्ध बोलताना तुम्हास भीती कशी वाटली नाही?

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 12:8
39 Iomraidhean Croise  

मग याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पनीएल असे ठेवले, कारण तो म्हणाला, “मी परमेश्वराचे मुख पाहिले आणि तरीही मी जिवंत राहिलो.”


मी तर नीतिमत्वामुळे तुमच्या मुखाचे दर्शन करणार; मी जागा होईन, तेव्हा तुमच्या दर्शनाने माझे पूर्ण समाधान होईल.


दृष्टांताकडे मी आपले कान लावेन; मी वीणेच्या साथीवर कोडे स्पष्ट करेन:


कर्ण्याचा आवाज जसा मोठा होत गेला, तसा मोशे बोलत होता आणि परमेश्वर त्याला उत्तर देत होते.


तुम्ही स्वतःसाठी वर आकाशातील, पृथ्वीवरील व पृथ्वीच्या खाली जलातील कशाचीही प्रतिमा करू नका.


जसा एखादा व्यक्ती आपल्या मित्राशी बोलतो तसे याहवेह मोशेशी समोरासमोर बोलत असत. मग मोशे छावणीकडे परत जात असे, परंतु त्याचा तरुण सहकारी, नूनाचा पुत्र यहोशुआ हा मंडप सोडून जात नसे.


आणि याहवेह म्हणाले, “मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढून चालवेन आणि याहवेह म्हणून माझ्या नावाची घोषणा मी तुझ्यासमक्ष करेन. ज्याच्यावर मला कृपा करावयाची त्याच्यावर मी कृपा करेन आणि ज्याच्यावर मला दया करावयाची त्याच्यावर मी दया करेन.”


मग मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठ पाहशील; पण माझा चेहरा तुला दिसणार नाही.”


जेव्हा अहरोन व सर्व इस्राएल लोकांनी मोशेला पाहिले, त्याचा चेहरा तेजस्वी होता आणि ते त्याच्याजवळ येण्यास घाबरत होते.


ज्ञानी मनुष्याची नीतिसूत्रे व बोधकथा, प्रसिद्ध वचने आणि कोडे समजण्यासाठी ही नीतिसूत्रे उपयुक्त होतील.


तर मग तुम्ही परमेश्वराची तुलना कोणाबरोबर कराल? तुम्ही कोणत्या प्रतिमेला त्यांची उपमा द्याल?


“तुम्ही कोणाशी माझी तुलना कराल किंवा माझी बरोबरी कराल? तुम्हाला माझ्यासारखा असा कोण आढळेल, ज्याच्याशी तुम्ही माझी तुलना कराल?


“हे मानवपुत्रा, एक रूपक घे आणि ते दाखला म्हणून इस्राएलच्या लोकांना सांग.


मग मी म्हणालो, “हे सार्वभौम याहवेह, माझ्याविषयी हे लोक म्हणतात, ‘हा केवळ दाखलेच सांगत नाही ना?’ ”


याहवेहने इजिप्तमधून इस्राएलला बाहेर काढण्यासाठी संदेष्ट्याच्या उपयोग केला, एका संदेष्ट्याच्या मार्फत त्याची काळजी घेतली.


आणि ते त्या देशात राहणार्‍यांना याविषयी सांगतील. त्यांनी तर आधी तुमच्याविषयी ऐकले आहे की, तुम्ही याहवेह या लोकांबरोबर आहात, तुमचा मेघस्तंभ त्यांच्यावर असतो आणि याहवेह तुम्ही त्यांना समोरासमोर दिसता आणि तुम्ही दिवसा मेघस्तंभात व रात्री अग्निस्तंभात त्यांच्यापुढे असता.


जेव्हा मोशे याहवेहशी बोलण्यासाठी सभामंडपात गेला, तेव्हा कराराच्या नियमाच्या कोशावर असलेल्या प्रायश्चिताच्या झाकणावरून, दोन करुबांमधून त्याच्याशी बोलत असलेली वाणी त्याने ऐकली. अशाप्रकारे याहवेह त्याच्याशी बोलले.


याप्रमाणे संदेष्ट्यांद्वारे जे भविष्य सांगितले होते ते पूर्ण झाले ते हे: “मी तोंड उघडून दाखल्यांनी त्यांच्याशी बोलेन. जगाच्या उत्पत्तीपासून ठेवलेले रहस्य मी त्यांना सांगेन.”


“जे तुमचे ऐकतात, ते माझे ऐकतात आणि जे तुम्हाला नाकारतात, ते मला नाकारतात. परंतु जे मला नाकारतात, ते ज्यांनी मला पाठविले आहे त्यांना नाकारतात.”


परमेश्वराला कोणी कधीही पाहिलेले नाही, परंतु त्यांचा एकुलता एक पुत्र, जे स्वतः परमेश्वर आहेत आणि पित्याच्या निकट सहवासात राहतात, त्या पित्याने त्यांना प्रकट केले आहे.


मी यापुढे तुम्हाला दास म्हणणार नाही, कारण धन्याचे व्यवहार दासाला माहीत नसतात; त्याऐवजी, मी तुम्हाला मित्र म्हटले आहे, कारण जे काही मी आपल्या पित्यापासून शिकून घेतले आहे, ते सर्व मी तुम्हाला कळविले आहे.


जे कोणीही केले नाही, ते कार्य मी त्यांच्यामध्ये केले नसते, तर ते दोषी समजले गेले नसते. परंतु वस्तुस्थिती ही आहे की, त्यांनी आम्हा दोघांचा, म्हणजे माझा व माझ्या पित्याचा द्वेष केला आहे.


कारण आपण आता केवळ आरशात प्रतिबिंब पाहत आहोत; नंतर आपण समोरासमोर पाहणार आहोत. मला आता केवळ अंशतः कळते; नंतर मला सर्वकाही स्पष्ट असे दिसेल, जशी माझी संपूर्ण ओळख झाली आहे.


आपण जे सर्व, मुखावर आच्छादन नसलेले; ते आपण प्रभूचे वैभव प्रतिबिंबित करणारे आहोत. ते आपण वाढत जाणार्‍या तेजासह त्यांच्या प्रतिमेप्रमाणे बदलत जात आहोत. हे सर्व प्रभूपासून आहे जे आत्मा आहेत.


याहवेह तुमचे परमेश्वर इस्राएलातून तुमच्यासाठी माझ्यासारखा एक संदेष्टा उभा करतील. तुम्ही त्याचे ऐकावे.


मोशेसारखा संदेष्टा इस्राएलात पूर्वी झाला नाही, कारण याहवेह त्याच्याशी समोरासमोर बोलत असत,


याकरिता सावधगिरी बाळगा, कारण याहवेह तुमच्याशी होरेब पर्वतावर अग्नीमधून बोलले, त्यावेळी त्यांची काहीही आकृती तुमच्या दृष्टीस पडली नाही;


तुम्ही स्वतःसाठी वर आकाशातील, पृथ्वीवरील व पृथ्वीच्या खाली जलातील कशाचीही प्रतिमा करू नका.


त्यांचा पुत्र हे अदृश्य परमेश्वराची प्रतिमा आहेत, सर्व सृष्टीत प्रथम जन्मलेले आहेत.


यास्तव, जो कोणी या निर्देशाचा तिरस्कार करतो, तो मनुष्यांचा नव्हे परंतु ज्या परमेश्वराने आपल्याला पवित्र आत्मा दिला आहे त्या परमेश्वराचा तिरस्कार करतात.


भूतकाळात परमेश्वर वेळोवेळी आणि निरनिराळ्या प्रकारे संदेष्ट्यांद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलले.


पुत्र परमेश्वराच्या गौरवाचे प्रतिबिंब आणि त्याच्या व्यक्तिमत्वाचे हुबेहूब प्रतिरूप आहेत. ते आपल्या वचनाच्या महान शक्तीने सर्व गोष्टींना सुस्थिर ठेवतात. पापांची शुद्धी केल्यानंतर, ते स्वर्गामध्ये वैभवाच्या उजवीकडे बसले आहेत.


विशेषकरून अशा लोकांसाठी हे खरे आहे जे देहाच्या भ्रष्ट अभिलाषांच्या मागे लागतात आणि अधिकारास तुच्छ मानतात. धाडसी आणि उद्धट असून ते स्वर्गीय प्राण्यांची निंदा करण्यास घाबरत नाहीत;


अगदी त्याच प्रकारे, हे अनीतिमान लोक आपल्या स्वप्नाच्या जोरावर, स्वतःचे शरीर विटाळवितात, अधिकार नाकारतात आणि स्वर्गीय प्राणिमात्रांची निंदा करतात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan