Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 11:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 याहवेहने मोशेला उत्तर दिले, “याहवेहचा हात इतका आखूड आहे काय? माझे शब्द घडून येतात की नाही हे तू आता पाहशील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 परमेश्वर मोशेला म्हणाला, “परमेश्वराचा हात काय तोकडा पडला आहे? माझे म्हणणे तुझ्या प्रत्ययास येते की नाही हे तू आता पाहशील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझा हात तोकडा आहे काय? आता माझे शब्द खरे आहेत की नाही हे तू पाहशील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 11:23
21 Iomraidhean Croise  

याहवेहला कोणतीही गोष्ट असाध्य आहे काय? मी सांगितल्याप्रमाणे पुढील वर्षी निश्चित वेळेत परत येईल आणि साराहला एक पुत्र होईल.”


त्याच्या सेवकाने म्हटले, “शंभर लोकांपुढे हे भोजन कसे ठेऊ?” परंतु अलीशाने उत्तर दिले, “हे लोकांना खाण्यास दे. कारण याहवेह असे म्हणतात: ‘ते खातील आणि काही शिल्लक राहील.’ ”


ज्या कारभाऱ्याच्या हातावर राजा टेकायचा तो परमेश्वराच्या मनुष्याला म्हणाला, “याहवेहने आकाशाच्या खिडक्या उघडल्या, तरी असे घडणे शक्य नाही.” अलीशाने त्याला उत्तर दिले, “तसे तू आपल्या डोळ्यांनी पाहशील, पण त्यातील तू काहीही खाऊ शकणार नाही!”


पुन्हा आणि पुन्हा त्यांनी परमेश्वराची परीक्षा पाहिली; इस्राएलाच्या पवित्र परमेश्वराला त्यांनी चिथविले.


तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “आता मी फारोहला काय करतो, ते तू पाहशील: कारण माझ्या पराक्रमी हातामुळे तो लोकांना जाऊ देईल; कारण माझ्या बलवान हातामुळे तो त्यांना आपल्या देशाबाहेर घालवून देईल.”


मी जेव्हा आलो, तेव्हा तिथे कोणीही का नव्हते? मी जेव्हा हाक मारली, तेव्हा कोणीही उत्तर का दिले नाही? तुम्हाला सोडविण्यासाठी माझा हात फारच आखूड होता काय? तुमचे तारण करण्यास माझ्याकडे सामर्थ्य नाही काय? मी केवळ धमकाविले तरी समुद्र आटून जाईल! नद्यांचे मी वाळवंटात रूपांतर करतो; त्यातील मासे पाण्याच्या अभावी सडतात आणि तहानेने मरतात.


निश्चितच, याहवेहची भुजा तारण करू शकणार नाही इतकी आखूड नाही, वा ऐकू येणार नाही असे त्यांचे कान बहिरे नाहीत.


एखाद्या विस्मित झालेल्या व्यक्तीसारखे तुम्ही का आहात? एखाद्या तारण ने करणाऱ्या वीरासारखे का झालात? हे याहवेह, तुम्ही तर येथेच आमच्यामध्ये आहात, आम्ही तुमचे नाव धारण केले आहे; आमचा त्याग करू नका!


“हे सार्वभौम याहवेह, तुमच्या महान शक्तीने व विस्तारलेल्या भुजेने तुम्ही स्वर्ग व पृथ्वी निर्माण केली आहे. तुम्हाला अवघड असे काहीच नाही.


“मी, याहवेह, अखिल मानवजातीचा परमेश्वर आहे. मला कोणतीही गोष्ट करणे अवघड आहे का?


परंतु मी याहवेह, मला जे वाटते ते बोलेन आणि विलंब न करता ते पूर्ण होईल. कारण अहो बंडखोर लोकहो, तुमच्या याच दिवसात, मी जे बोलेन ते पूर्ण करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”


“ ‘मी याहवेह हे बोललो आहे आणि मी ते करण्याची वेळ आली आहे. मी आवरून धरणार नाही; मी दया करणार नाही, मी अनुतापणारही नाही. तुझे वर्तन व तुझी कृत्ये यानुसार तुझा न्याय केला जाईल, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.’ ”


जेव्हा राजा गुहेच्या जवळ आला, त्याने दानीएलला मोठ्या दुःखाने त्याने हाक मारली. “दानीएला, दानीएला, जिवंत परमेश्वराच्या सेवका, ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस, त्यांनी तुला सिंहांपासून सोडविले आहे काय?”


हे याकोबाच्या घराण्या, “असे म्हटले जावे काय, याहवेह अधीर होतात काय? ते अशी कामे करतात काय? “ज्याचे मार्ग सरळ आहेत त्याचे माझे शब्द भले करत नाहीत काय?


गुरे व शेरडेमेंढरे कापली तरी ते त्यांच्यासाठी पुरेसे होईल काय? समुद्रातील सर्व मासे पकडले तरी ते त्यांना पुरतील काय?”


परमेश्वर मनुष्य नाहीत की त्यांनी लबाडी करावी, ते मानव नाहीत, की त्यांनी आपले मन बदलावे. याहवेह बोलणार आणि त्यानुसार करणार नाहीत काय? त्यांनी अभिवचन दिले आणि ते पूर्ण करणार नाहीत काय?


येशूंनी त्यांच्याकडे पाहिले आणि म्हटले, “मानवाला हे अशक्य आहे, परंतु परमेश्वराला सर्वगोष्टी शक्य आहेत.”


आकाश व पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार नाहीत.


कारण परमेश्वराला कोणतेही वचन पूर्ण करणे अशक्य नाही.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan