Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 11:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 मी या सर्व लोकांचे गर्भधारण केले काय? त्यांना मी जन्म दिला काय? आई आपल्या तान्ह्या बाळाला घेते तसे मी यांना माझ्या उराशी घेऊन तुम्ही त्यांच्या पूर्वजांना शपथ घेऊन वचन दिलेल्या देशात मी घेऊन जावे असे तुम्ही मला का सांगता?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मी ह्या सर्व लोकांचे गर्भधारण केले आहे काय? ह्यांना मी प्रसवलो आहे काय? ‘जो देश ह्यांच्या पूर्वजांना तू शपथपूर्वक देऊ केला आहेस, त्या देशाकडे, तान्ह्या बाळाला सांभाळून नेणार्‍या पालक-पित्याप्रमाणे मी ह्यांना उराशी धरून घेऊन जावे’ असे तू मला कसे सांगतोस?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मी या लोकांचे गर्भधारण केले काय? मी त्यांना जन्म दिला आहे का म्हणून तू म्हणतोस की, जसा पिता आपल्या बाळाला छातीशी धरून घेऊन जातो तसे मी त्यांना न्यावे? जो देश देण्याविषयी त्यांच्या पूर्वजांना तू शपथ दिली त्यांना मी घेऊन जावे का?

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 11:12
20 Iomraidhean Croise  

जो सर्व देश तू पाहतोस तो मी तुला आणि तुझ्या वंशजांना देईन.


“कारण याहवेह जे स्वर्गाचे परमेश्वर आहेत, त्यांनी माझ्या पित्याच्या घरातून व माझ्या जन्मभूमीतून काढून मला आणि माझ्या मुलाबाळांना हा देश देण्याचे वचन दिले आहे, तेच परमेश्वर तुझ्यापुढे आपला दूत पाठवतील आणि माझ्या मुलासाठी योग्य वधू तुला मिळेल.


या प्रांतात काही काळ राहा आणि मी तुझ्यासह असेन व तुला आशीर्वादित करेन. तुझा पिता अब्राहाम याला मी दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी हा सर्व प्रदेश तुला आणि तुझ्या वंशजाला देईन.


नंतर योसेफ आपल्या भावांस म्हणाला, “लवकरच माझा अंत होईल, पण खात्रीने परमेश्वर तुमची भेट घेतील आणि तुम्हाला इजिप्त देशाबाहेर अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना वचन दिलेल्या देशात घेऊन जातील,”


शोमरोनात अहाबाचे सत्तर पुत्र होते. येहूने येज्रीलच्या अधिकाऱ्यांना, वडिलांना आणि अहाबाच्या पुत्रांच्या पालकांना: जे शोमरोनात होते त्यांना एक पत्र लिहिले, ज्यामध्ये असे लिहिलेले होते,


मग राजवाड्याचा कारभारी, शहराचा कारभारी, वडील व त्या पुत्रांचे पालक यांनी येहूला हा निरोप पाठविला: “आम्ही तुमचे सेवक आहोत व तुम्ही जे काही सांगाल ते आम्ही करू. आम्ही कोणालाही राजा म्हणून नियुक्त करणार नाही; तुम्हाला जे उत्तम वाटते, ते तुम्ही करा.”


“तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना दिलेल्या शपथेनुसार याहवेह तुम्हाला कनानी लोकांच्या देशात घेऊन जातील व तो देश तुम्हाला देतील,


जेव्हा तुम्हाला कनानी, हिथी, अमोरी, यबूसी आणि हिव्वी यांचा देश, ज्यात दूध व मध वाहतो, ते तुम्हाला देतील अशी तुमच्या पूर्वजांशी शपथ वाहिली, त्यात याहवेह तुम्हाला नेतील; तेव्हा या महिन्यात हा विधी तुम्ही पाळावा.


नंतर याहवेह मोशेला म्हणाले, “तू आणि ज्या लोकांना तू इजिप्तमधून बाहेर आणले त्यांना घेऊन या ठिकाणातून नीघ आणि मी अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांना शपथ घेऊन अभिवचन दिले, ‘हा देश मी तुझ्या वंशजांना देईन’ त्या देशाकडे घेऊन जा.


आणि जो देश अब्राहाम, इसहाक व याकोब यांना देण्यास मी हात उंच करून शपथ वाहिली, त्यात मी तुम्हाला आणेन आणि तो तुम्हाला वतन म्हणून देईन. मीच याहवेह आहे.”


ते मेंढपाळाप्रमाणे त्यांच्या कळपाचे संगोपन करतात: ते कोकरांना त्यांच्या कवेत एकत्र करतात आणि आपल्या हृदयाजवळ ठेवतात; जे अजून पिल्ले आहेत, त्यांना ते सौम्यपणाने नेतात.


“आईला आपल्या दुधपित्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल का आपल्या जन्मदात्या मुलावरील तिची माया कधी आटेल का? ती कदाचित विसरेल, पण मी तुम्हाला विसरणार नाही.


राजे तुला उपपित्यासमान होतील, व त्यांच्या राण्या तुला उपमातेसमान होतील. ती तुझ्यासमोर भुईपर्यंत लवून मुजरा करतील; आणि तुझी पायधूळ चाटतील. तेव्हा मीच याहवेह आहे, हे तुला समजेल. माझ्यावर आशा ठेवणारा, कधीच निराश होणार नाही.”


मी त्यांच्यावर एक मेंढपाळ नेमीन तो माझा सेवक दावीद असेल आणि तो त्यांचे राखण करेल; तो त्यांची जोपासना करेल व त्यांचा मेंढपाळ होईल.


“मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरिता आपला जीव देतो.


ख्रिस्तामध्ये तुम्हाला हजारो शिक्षक असले, पण पुष्कळ वडील नाहीत. कारण ख्रिस्त येशूंमध्ये शुभवार्तेद्वारे मी तुमचा पिता झालो आहे.


माझ्या प्रिय मुलांनो, ख्रिस्ताचे स्वरूप तुम्हामध्ये निर्माण होईपर्यंत मला प्रसूती वेदना होत राहतील.


वास्तविक ख्रिस्ताचे प्रेषित म्हणून आमचा अधिकार निश्चितपणे मिळविता आला असता. जशी आई आपल्या लेकरांचे कोमलतेने पालनपोषण करते, त्याचप्रमाणे आम्हीही तुमच्याशी कोमलतेने व्यवहार केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan