Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 11:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 मग असे झाले की लोक याहवेहसमोर असताना त्यांच्या कष्टांबद्दल तक्रार करू लागले. जेव्हा याहवेहने ते ऐकले तेव्हा त्यांचा राग भडकला आणि त्यांच्यामध्ये याहवेहचा अग्नी पेटला आणि छावणीच्या बाहेरील काही भाग भस्म झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 मग लोक संकटात सापडल्यासारखे कुरकुर करू लागले; ते परमेश्वराच्या कानी पडले. ते ऐकून परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेऊन छावणीच्या हद्दीवरचे काही भाग भस्म केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 इस्राएल लोक आपल्या त्रासाबद्दल कुरकुर करू लागले तसे परमेश्वराने ऐकले. परमेश्वराने लोकांचे ऐकले आणि तो रागावला. परमेश्वरापासूनचा अग्नी त्यांच्यात पेटला आणि त्याने छावणीच्या हद्दीवरचे काही भाग भस्म केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 11:1
40 Iomraidhean Croise  

हे त्याचे कृत्य याहवेहच्या दृष्टीने एक फार मोठे पाप होते; म्हणून याहवेहने त्यालाही मारून टाकले.


शोककाळ संपल्यानंतर दावीदाने तिला आपल्या घरी बोलावून घेतले आणि ती त्याची पत्नी झाली आणि तिने त्याच्या पुत्राला जन्म दिला. परंतु दावीदाने जे केले होते त्यामुळे याहवेह असंतुष्ट झाले होते.


एलीयाहने उत्तर दिले, “मी परमेश्वराचा मनुष्य असेन, तर स्वर्गातून अग्नी उतरो आणि तुला, व तुझ्या पन्नास शिपायांना भस्म करो.” मग परमेश्वराचा अग्नी स्वर्गातून उतरला आणि त्याला व त्याच्या पन्नास माणसांना भस्म केले.


तो बोलतच असताना, दुसरा एक निरोप्या आला व म्हणाला, “परमेश्वराचा अग्नी आकाशातून आला, त्याने मेंढरे आणि चाकरे भस्म केले, तुम्हाला सांगण्यासाठी मीच एकटा सुटून आलो आहे!”


आणि त्यांच्या अनुयायांवर अग्निपात झाला; दुष्ट माणसांना भस्म करण्यात आले.


जेव्हा याहवेहने हे ऐकले, ते संतापले; त्यांचा अग्नी याकोबाविरुद्ध पेटला, आणि त्यांचा क्रोध इस्राएलावर भडकला.


त्यांचे तरुण अग्नीने खाऊन टाकले; त्यांच्या कन्यांना विवाहगीते लाभलीच नाही.


आणि सकाळी तुम्ही याहवेहचे गौरव बघाल, कारण तुम्ही याहवेहविरुद्ध केलेली कुरकुर त्यांनी ऐकली आहे. आम्ही कोण आहोत की तुम्ही आमच्याविरुद्ध कुरकुर करावी?”


मग मोशे अहरोनाला म्हणाला, “संपूर्ण इस्राएली समुदायाला सांग, ‘याहवेहच्या समोर या, कारण त्यांनी तुमची कुरकुर ऐकली आहे.’ ”


इस्राएलचा प्रकाश अग्नी होईल, त्यांचे पवित्र परमेश्वर एक ज्वाला होतील; त्याचे काटे आणि काटेरी झुडपे ते एकाच दिवसात जळतील व भस्म करतील.


तोफेथ फार पूर्वीपासून तयार झालेला आहे; ते राजासाठी तयार केलेले आहे. त्याचे अग्निकुंड खोल आणि रुंद केले आहे, त्यामध्ये भरपूर अग्नी आणि लाकूड आहे; जळत्या गंधकाच्या प्रवाहासारखा, याहवेहचा श्वास ते पेटवितो.


सीयोनमध्ये असलेले पापी जन घाबरले आहेत; देवहीन लोक थरथर कापत आहेत: “भस्म करणाऱ्या अग्नीमध्ये आमच्यामधील कोण राहू शकेल? सार्वकालिक अग्नीत आमच्यामधील कोण जळत राहू शकेल काय?”


आमच्या पापांबद्दल आम्हाला शिक्षा होते, तेव्हा आम्ही जिवंत मानवांनी तक्रार का करावी?


इजिप्त देशाच्या रानात जसा मी तुमच्या पूर्वजांचा न्याय केला, तसाच मी तुमचा न्याय करेन, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.


म्हणून याहवेहकडून अग्नी निघाला आणि त्याने त्यांना भस्म केले आणि ते याहवेहसमोर मरण पावले.


त्यांच्यासमोर पर्वत कंपित होतात व टेकड्या विरघळतात. पृथ्वी आणि जग व त्यात राहणारे सर्वजण त्यांच्या समक्षतेत थरकापतात.


महामारी त्यांच्या पुढे चालते; घातकी रोग त्यांच्यामागे चालतात.


मग ते याहवेहचे पर्वत म्हणजेच सीनाय पर्वतापासून निघाले व तीन दिवसांचा प्रवास करीत गेले. याहवेहच्या कराराचा कोश त्यांच्या विसाव्याचे ठिकाण पाहण्यासाठी त्या तीन दिवसांचा प्रवास करीत त्यांच्यापुढे गेला.


“लोकांना सांग: ‘उद्याच्या तयारीकरिता स्वतःला पवित्र करा, कारण उद्या त्यांना मांस खायला मिळेल. “आम्हाला मांस खायला मिळाले तर किती बरे! आम्ही इजिप्तमध्ये चांगले होतो!” हे तुमचे रडणे याहवेहने ऐकले आहे, आता याहवेह तुम्हाला मांस देणार आहेत आणि ते तुम्ही खाल.


त्यांनी विचारले, “याहवेह मोशेद्वारेच बोलले आहेत काय? याहवेह आमच्याद्वारे सुद्धा बोलले नाहीत काय?” आणि याहवेहने हे ऐकले.


सर्व इस्राएली लोकांनी मोशे व अहरोन यांच्याविरुद्ध कुरकुर केली आणि सर्व समुदाय त्यांना म्हणाला, “आम्ही इजिप्त देशात किंवा या रानातच मेलो असतो तर किती बरे असते!


ज्यांनी माझे वैभव आणि मी इजिप्तमध्ये व रानात केलेले चमत्कार पाहिले आहेत आणि तरीही माझा आज्ञाभंग केला व दहा वेळा माझी परीक्षा पाहिली;


“कुठपर्यंत हा दुष्ट समुदाय माझ्याविरुद्ध कुरकुर करीत राहणार? या कुरकुर करणाऱ्या इस्राएली लोकांच्या तक्रारी मी ऐकल्या आहे.


म्हणून त्यांना सांगा, याहवेह म्हणतात, खचितच मी जिवंत आहे, जे काही तुम्ही बोलला आहात तेच मी तुम्हास करेन:


तू व तुझे सर्व अनुयायी असे एकत्र आला ते याहवेहच्या विरोधात आहे. अहरोन कोण आहे की तुम्ही त्याच्या विरोधात कुरकुर करावी?”


नंतर याहवेहपासून अग्नी निघाला आणि त्याने धूपाचे अर्पण करणार्‍या त्या दोनशे पन्नास पुरुषांना भस्म केले.


ज्या पुरुषाची मी निवड करेन त्याच्या काठीला अंकुर फुटेल आणि इस्राएली लोक तुमच्याविरुद्ध सातत्याने जी कुरकुर करतात त्यापासून मी स्वतःची सुटका करेन.”


ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध कुरकुर करीत बोलू लागले व म्हणाले, “तुम्ही आम्हाला या रानात मरावे म्हणून इजिप्तमधून का आणले? येथे भाकर नाही! पाणी नाही! आणि हे बेचव अन्न आम्हाला नकोसे झाले आहे.”


आणि कुरकुर करू नका, जशी त्यांच्यापैकी काहींनी केली आणि ते नाश करणार्‍या दूताच्या हातून मरण पावले.


जेव्हा तुम्ही दुर्बल व थकलेले होता, तेव्हा त्यांनी तुम्हाला मार्गात गाठले आणि मागे राहिलेल्यांवर हल्ला केला; त्यांना परमेश्वराचे भय नव्हते.


कारण माझा क्रोधाग्नी प्रदीप्त होत आहे, तो थेट अधोलोकापर्यंत खोलवर पेटणार आहे. तो पृथ्वी व तिच्यावरील सर्व पिके जाळून टाकील, आणि तिच्या पर्वतांच्या पायांना अग्नी लावील.


पुन्हा तबेरा येथे, मस्सा येथे आणि किब्रोथ-हत्ताव्वा येथेही तुम्ही याहवेहला संतप्त केले.


कारण आपले “परमेश्वर भस्म करणारे अग्नी आहेत.”


पाहा! ज्या कामकर्‍यांनी तुमची शेते कापली, त्यांचे वेतन तुम्ही दिले नाही ते तुमच्याविरुद्ध आक्रोश करीत आहेत. कापणी करणार्‍यांचा आक्रोश सेनाधीश प्रभूच्या कानावर गेला आहे.


हे लोक कुरकुर करणारे आणि दोष शोधणारे आहेत; वाईट वासनांच्या मागे लागणारे, स्वतःची बढाई मारणारे आणि स्वतःच्या लाभासाठी इतरांची खुशामत करणारे आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan