Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




गणना 1:53 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

53 परंतु लेव्यांनी आपले डेरे कराराच्या निवासमंडपाच्या सभोवती उभारावे, म्हणजे इस्राएली समुदायाविरुद्ध माझा क्रोध पेटणार नाही. लेव्यांनी कराराच्या नियमाच्या निवासमंडपाची जबाबदारी घेऊन त्याची काळजी घ्यावी.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

53 पण लेव्यांनी आपले डेरे साक्षपटाच्या निवासमंडपासभोवती ठोकावेत म्हणजे इस्राएल लोकांच्या मंडळीवर कोप होणार नाही; आणि लेव्यांनी साक्षपटाच्या निवासमंडपाचे रक्षण करावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

53 परंतु लेवी लोकांनी आपले तंबू पवित्र निवासमंडपाच्या सभोवती ठोकावेत; त्यांनी आज्ञापट असलेल्या पवित्र निवासमंडपाचे रक्षण करावे म्हणजे इस्राएल लोकांच्या मंडळीवर संकट येणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




गणना 1:53
26 Iomraidhean Croise  

याप्रमाणे याहवेहच्या मंदिरात लेवी सभामंडपाची आणि पवित्रस्थानाची काळजी घेत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडीत असत आणि त्यांचे नातलग अहरोनाचे वंशज यांच्या मदतनीसाचे काम करीत असत.


“आमच्याविषयी म्हणाल, याहवेह हे आमचे परमेश्वर आहेत आणि आम्ही त्यांना सोडले नाही. जे याजक याहवेहची सेवा करीत आहेत ते अहरोनाचे पुत्र आहेत आणि लेवीय त्यांना मदत करतात.


रोज सकाळी आणि संध्याकाळी ते याहवेह यांना होमार्पणे आणि सुगंधी धूप अर्पण करतात. ते विधिपूर्वक स्वच्छ केलेल्या टेबलावर भाकरी ठेवतात आणि दररोज संध्याकाळी सोन्याच्या दीपमाळेवर दीप लावतात. आम्ही आमचे परमेश्वर याहवेहना हव्या असणाऱ्या गोष्टींचे पालन करीत आहोत. परंतु तुम्ही त्यांना सोडून दिले आहे.


म्हणून सर्वसमर्थ याहवेह संदेष्ट्यांबद्धल असे म्हणतात: “मी त्यांना खावयास कडू दवणा देईन व प्यावयास विषारी पाणी देईन, कारण यरुशलेमच्या संदेष्ट्यांमुळेच देवहीनता देश व्यापून टाकीत आहे.”


संदेष्टे खोटी भविष्यवाणी करतात, याजक स्वतःचेच अधिकार चालवितात, आणि माझ्या लोकांना ते आवडते. पण शेवटी तुम्ही काय करणार आहात?


मग मोशे अहरोन व त्याचे पुत्र एलअज़ार व इथामार यांना म्हणाला, “तुमचे केस न विंचरलेले असे मोकळे सोडू नका व तुमची वस्त्रे कधी फाडू नका, नाहीतर तुम्ही मराल आणि याहवेह तुम्हा सर्व समुदायावर रागावतील. परंतु तुमचे नातेवाईक, सर्व इस्राएली लोक याहवेहनी अग्नीने नाश केलेल्या लोकांबद्दल शोक करतील.


परंतु कराराच्या नियमाचा निवासमंडप; त्यातील सामुग्री व त्यासंबंधाचे जे काही आहे त्यावर लेवींची प्रमुख म्हणून नेमणूक कर. त्यांनी निवासमंडप व त्यातील सामुग्री वाहून न्यावी; त्यांनी त्याची काळजी घ्यावी व त्याभोवती आपला डेरा उभारावा.


याहवेहने मोशेला जसे आज्ञापिले होते, त्याप्रमाणे इस्राएली लोकांनी सर्वकाही केले.


नंतर मोशे अहरोनाला म्हणाला, “त्वरा कर. एक धुपाटणे घे. वेदीवरील अग्नी त्यावर ठेव. त्यावर धूप टाक आणि लोकांसाठी प्रायश्चित्त कर. कारण याहवेहचा कोप त्यांच्यावर भडकला आहे आणि पीडा सुरू झाली आहे.”


तुम्ही याहवेहच्या निवासमंडपाची सेवा करावी, मंडळीपुढे राहून तिची सेवा करावी म्हणून इस्राएली लोकांच्या परमेश्वराने तुम्हाला इस्राएलच्या इतर लोकांमधून वेगळे केले आहे आणि आपल्याजवळ घेतले ते तुम्हाला पुरेसे नाही काय?


मोशेने त्या काठ्या कराराच्या नियमाच्या मंडपात याहवेहसमोर ठेवल्या.


मग सभामंडप व लेव्यांची छावणी सर्व छावण्यांच्या मध्यभागी असणार. ज्या क्रमाने ते डेरा देऊन राहतात त्याच क्रमाने, आपल्या झेंड्याखाली आपआपल्या जागेवर त्यांनी निघावे.


गेर्षोनी कुळांनी निवासमंडपाच्या मागे पश्चिमेकडे डेरा द्यावा.


कोहाथी कुळांनी निवासमंडपाच्या दक्षिणेकडे डेरे द्यायचे होते.


अबीहाईलाचा पुत्र जूरीएल हा मरारी घराण्यांच्या कुळांचा पुढारी होता. त्यांनी निवासमंडपाच्या उत्तरेला डेरे द्यायचे होते.


मोशे आणि अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी निवासमंडपाच्या पूर्वेला, सूर्योदयाच्या दिशेने, सभामंडपासमोर डेरा द्यायचा होता. इस्राएली लोकांच्या वतीने पवित्रस्थानाची काळजी घेण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. इतर कोणीही पवित्रस्थानाजवळ आले तर त्याला जिवे मारले जावे.


इस्राएली लोकांच्या अर्ध्या हिश्श्यातून माणसे असो किंवा गुरे, गाढवे, मेंढरे किंवा इतर जनावरे यापैकी याहवेहसाठी खंडणी म्हणून पन्नासापैकी एक याप्रमाणे ते वेगळे कर. व लेवी लोक, जे याहवेहच्या निवासमंडपाच्या देखरेखीसाठी जबाबदार आहेत त्यांना द्यावे.”


याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे इस्राएली लोकांच्या वाट्यातील पन्नासापैकी एक, लोक आणि जनावरे असे मोशेने निवडून ते लेवी लोकांना दिले, जे याहवेहच्या निवासमंडपाच्या देखरेखीसाठी जबाबदार होते.


मी लेव्यांना सर्व इस्राएली लोकांमधून अहरोन व त्याच्या पुत्रांना भेट म्हणून दिले आहे, यासाठी की इस्राएली लोकांच्या वतीने त्यांनी सभामंडपात सेवा करावी व त्यांच्यासाठी प्रायश्चित करावे, म्हणजे इस्राएली लोक पवित्रस्थानाकडे जातील, तेव्हा कोणतीही पीडा त्यांचा नाश करणार नाही.


तू वचनाची घोषणा करीत राहा. वेळी अवेळी त्यामध्ये तत्पर राहा. सर्व सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखव, निषेध कर आणि बोध कर.


परंतु परमेश्वराने बेथ-शेमेशमधील काही रहिवाशांवर प्रहार केला व सत्तर लोकांना मारून टाकले, कारण त्यांनी याहवेहच्या कोशात डोकावून पाहिले. आणि याहवेहने त्यांना मोठ्या दंडाने मारले म्हणून लोकांनी शोक केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan