गणना 1:50 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती50 परंतु कराराच्या नियमाचा निवासमंडप; त्यातील सामुग्री व त्यासंबंधाचे जे काही आहे त्यावर लेवींची प्रमुख म्हणून नेमणूक कर. त्यांनी निवासमंडप व त्यातील सामुग्री वाहून न्यावी; त्यांनी त्याची काळजी घ्यावी व त्याभोवती आपला डेरा उभारावा. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)50 तर साक्षपटाच्या निवासमंडपावर, त्यातील सर्व सामानावर व त्यासंबंधाचे जे काही असेल त्यावर लेव्यांना अधिकारी नेमून ठेव; निवासमंडप आणि त्यातील सर्व सामान त्यांनी वाहून न्यावे, त्यासंबंधीच त्यांनी सेवा करावी व आपले डेरे निवासमंडपाभोवती ठोकावेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी50 लेवी लोकांस सांग की साक्षपटाच्या निवासमंडपावर व त्याबरोबर त्यातील सर्व वस्तूंवर त्याचे जे आहे त्यावर त्यांना नेम. त्यांनी निवासमंडप व त्यातील सर्व वस्तू वाहून न्याव्यात. त्यांनी आपले तंबू निवासमंडपाभोवती उभारावेत आणि त्याची निगा राखावी. Faic an caibideil |
“नंतर अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी सर्व पवित्र साहित्य व पवित्र उपकरणे यावर आच्छादन घालण्याचे काम संपविल्यावर, जेव्हा छावणी पुढे जाण्यास सज्ज होईल, त्याचवेळी कोहाथी कुळाने ते वाहून नेण्यास पुढे यावे. परंतु त्यांनी पवित्र वस्तूंना स्पर्श करू नये, नाहीतर ते मरतील. कोहाथी लोकांनी सभामंडपातील वस्तू वाहून न्यावयाच्या आहेत.