Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 8:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 सकाळपासून दुपारपर्यंत त्याने जल वेशीसमोरील चौकाच्या दिशेने आपले मुख करून समजण्यास समर्थ असे जितके लोक होते त्यासर्वांच्या समक्षतेत वाचन केले. सर्व लोकांनी नियमशास्त्र लक्षपूर्वक ऐकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्यातील वचने त्याने पहाटपासून दोन प्रहरपर्यंत पाणीवेशीसमोरच्या चौकात स्त्रीपुरुषांपुढे व ज्यांना ऐकून समजण्याचे सामर्थ्य होते त्यांच्यापुढे वाचली, आणि सर्व लोकांनी नियमशास्त्राचा ग्रंथ कान देऊन ऐकला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 एज्राने या नियमशास्त्रातून पहाटेपासून दुपारपर्यंत मोठया आवाजात वाचून दाखवले. एज्रा पाणीवेशीसमोरच्या मोकळया चौकाकडे तोंड करून उभा होता. समस्त स्त्रीपुरुषांना आणि वाचलेले ऐकून समजत होते इतपत मोठे असलेल्या सर्वापुढे त्याने वाचले. सर्व लोकांनी नियमशास्त्राचे हे पठण काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन ऐकले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 8:3
25 Iomraidhean Croise  

त्यांच्या सहकारी इस्राएली म्हणजे सरदारांसोबत एकत्र आले व त्यांनी परमेश्वराचा सेवक मोशेद्वारे मिळालेले परमेश्वराचे नियम अनुसरण्याची व याहवेह आमच्या प्रभूच्या आज्ञा, आदेश व कायदे काळजीपूर्वकरित्या पाळण्याची शपथ घेतली आणि पाळल्या नाहीत तर परमेश्वराचा श्राप स्वतःवर बंधनकारक केला.


त्याच दिवशी, मोशेचे नियमशास्त्र मोठ्याने वाचण्यात येत असताना, लोकांना एक विधान ऐकावयास मिळाले. त्यात असे लिहिले होते की अम्मोनी व मोआबींना परमेश्वराच्या सभामध्ये प्रवेश करण्याची कधीही परवानगी देण्यात येऊ नये,


आता सर्व लोक जल वेशीसमोरील चौकात एकत्र जमले. आणि त्यांनी नियम शिकविणारा शिक्षक एज्राला विनंती केली की याहवेहने इस्राएली लोकांना दिलेले मोशेचे नियमशास्त्र त्याने बाहेर आणून सर्वांना वाचून दाखवावे.


सणाच्या या दिवसांच्या काळात, पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत एज्रा परमेश्वराच्या नियमशास्त्राचे वाचन करीत असे. सात दिवस सण साजरा केल्यानंतर आठव्या दिवशी मोशेच्या नियमशास्त्राला अनुसरून महासभा घेण्यात आली.


त्या प्रसंगासाठी खास तयार केलेल्या उंच लाकडी चौकटीवर एज्रा शिक्षक उभा राहिला. त्याच्या उजवीकडे मत्तिथ्याह, शमा, अनायाह, उरीयाह, हिल्कियाह व मासेयाह हे उभे होते; व त्याच्या डावीकडे पदायाह, मिशाएल, मल्कीयाह, हाशूम, हश्बद्दानाह, जखर्‍याह व मशुल्लाम हे उभे होते.


एज्राने पुस्तक उघडले. प्रत्येकजण त्याला पाहू शकत होता, कारण तो इतरांपेक्षा जास्त उंचीवर उभा होता; तो उघडीत असताना सर्वजण उभे राहिले


स्वतः दावीद त्यांना ‘प्रभू’ असे म्हणतो तर तो त्याचा पुत्र कसा असू शकेल?” जमलेला मोठा जमाव येशूंचे भाषण मोठ्या आनंदाने ऐकत होता.


परंतु त्यांना कोणताही मार्ग सापडत नव्हता. कारण सर्व लोक येशूंचे मन लावून ऐकत होते.


यास्तव तुम्ही कसे ऐकता याविषयी काळजी घ्या. ज्यांच्याजवळ आहे त्यांना अधिक दिले जाईल; ज्यांच्याजवळ नाही, जे त्यांच्याजवळ आहे असे त्यांना वाटते ते देखील त्यांच्यापासून काढून घेतले जाईल.”


नेहमीप्रमाणे नियमशास्त्र व संदेष्ट्यांच्या ग्रंथातून वाचल्यानंतर, सभागृहातील पुढार्‍यांनी त्यांना म्हटले: “बंधूंनो, आपल्याजवळ लोकांसाठी काही उत्तेजनपर वचन असेल तर कृपा करून आम्हास सांगा.”


यरुशलेममधील लोकांनी व त्यांच्या शासकांनी येशूंना ओळखले नाही, त्यांना दोषी ठरवून संदेष्ट्यांच्या त्या शब्दांची पूर्तता केली, ज्या शब्दांचे वाचन प्रत्येक शब्बाथ दिवशी त्यांच्यामध्ये केले जात होते.


कारण प्राचीन काळापासून मोशेच्या नियमशास्त्राचा प्रत्येक शहरामध्ये प्रचार केला जाऊ लागला आणि प्रत्येक शब्बाथ दिवशी सभागृहामध्ये त्याचे वाचन होऊ लागले.”


त्या ऐकणार्‍या स्त्रियांमध्ये थुवतीरा शहराची लुदिया नावाची कोणी एक स्त्री होती. ती जांभळ्या वस्त्रांचा व्यवसाय करीत असे, ती परमेश्वराची उपासना करणारी होती. पौलाच्या संदेशाचा स्वीकार करण्यासाठी प्रभूने तिचे हृदय उघडले.


आता बिरुया येथील यहूदी थेस्सलनीकातील लोकांपेक्षा थोर चरित्राचे होते, त्यांनी संदेश मोठ्या उत्सुकतेने ऐकला पौलाची विधाने खरी आहेत की नाहीत, हे ते प्रतिदिवशी वचनांची तपासणी करून पाहात असत.


मग तो पुन्हा वरच्या मजल्यावर गेला आणि त्याने भाकर मोडून खाल्ली. पहाट होईपर्यंत बोलत राहिल्यावर तो रवाना झाला.


आठवड्याच्या पहिल्या दिवशी आम्ही भाकर मोडण्याकरिता एकत्रित आलो. पौल लोकांबरोबर बोलला आणि दुसर्‍या दिवशी तो जाणार होता, म्हणून मध्यरात्र होईपर्यंत बोलतच राहिला.


तेव्हा पौलाला भेटण्यासाठी त्यांनी एक दिवस ठरविला आणि फार मोठ्या संख्येने तो राहत होता त्या ठिकाणी आले. तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत, धर्मशास्त्रातून म्हणजे मोशेचे नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ यामधून परमेश्वराच्या राज्याविषयी आणि येशूंविषयी शिक्षण देऊन प्रमाण पटवीत राहिला.


नंतर मोशेने हे संपूर्ण नियमशास्त्र लिहिले आणि याहवेहच्या कराराचे कोश वाहणाऱ्या लेवीय याजकांना आणि इस्राएली लोकांच्या वडीलजनांना दिले.


परमेश्वराचे आम्ही निरंतर आभार मानतो, कारण जेव्हा तुम्ही आमच्याकडून परमेश्वराचे वचन ऐकले, तेव्हा तुम्ही ते मानवाचे म्हणून नाही, परंतु परमेश्वराचे सत्यवचन म्हणून स्वीकारले, जे वास्तविकतेचे आहे आणि तेच तुमच्यामध्ये कार्य करीत आहे.


यहोशुआने संपूर्ण इस्राएली मंडळी, स्त्रिया आणि मुलेबाळे आणि जे परदेशीय त्यांच्यामध्ये राहत होते यांना, मोशेने दिलेल्या सर्व आज्ञातील वाचून दाखविण्यात आल्या, एकही शब्द न वाचता सोडला नाही.


ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ते ऐको.


ज्याला ऐकावयास कान आहेत तो, आत्मा मंडळ्यास काय म्हणतो ऐको.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan