Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 7:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मी त्यांना म्हणालो, “यरुशलेमच्या वेशी सूर्य बराच उष्ण होईपर्यंत उघडण्यात येऊ नयेत. पहारेकरी कामावर असतानाच, सर्व वेशींना अडसर लावून त्या बंद करण्यात याव्या. तसेच यरुशलेममधील रहिवाशांनाच पहारेकरी म्हणून नेमावे. काहीजण त्यांच्या चौकीवर तर काहींनी त्यांच्या घराजवळच्या भागाचे रक्षण करावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मी त्यांना सांगितले, “उन्हाचा ताप होईपर्यंत यरुशलेमेच्या वेशी उघडू नयेत, लोक काम करीत असता वेशींचे दरवाजे लावून त्यांना अडसर घालावेत, यरुशलेमकरांचे पहारे नेमावेत आणि प्रत्येकाने आपापल्या घरासमोर पहारा करावा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आणि मी त्यांना म्हणालो, “सूर्य तापल्याशिवाय वेशीचे दरवाजे उघडू नयेत. द्वारपाल पहारा देत असताना, दरवाजे लावून त्यांना अडसर घाला. यरूशलेमामध्ये राहणाऱ्यांमधून पहारेकऱ्यांची निवड करा, त्यापैकी काहीजणांना नगराच्या रक्षणासाठी मोक्याच्या जागी ठेवा. आणि इतरांना आपापल्या घराजवळ पहारा करु द्या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 7:3
8 Iomraidhean Croise  

यरुशलेमच्या वेशींवर संध्याकाळचा अंधार पडेपर्यंत सर्व दारे बंद केली जावीत व ती शब्बाथ संपेपर्यंत उघडली जाऊ नयेत असा मी आदेश दिला. मग मी माझी काही माणसे वेशीवर पहारा ठेवण्यासाठी नेमली. यासाठी की कुठल्याही प्रकारचा माल शब्बाथ दिवशी शहरात आणला जाऊ नये.


त्यांच्या शेजारी बिन्यामीन व हश्शूब यांनी आपल्या घरासमोरील भागाची दुरुस्ती केली. त्यांच्या शेजारी मासेयाहचा पुत्र, जो अनन्याहचा पुत्र अजर्‍याहाने आपल्या घराजवळ डागडुजी केली.


मी यरुशलेमच्या शासनाची जबाबदारी माझा भाऊ हनानी व गढीचा अधिपती हनन्याह यांना दिली. हनन्याह अत्यंत विश्वासू असून सर्व लोकांपेक्षा तो परमेश्वराचे भय अधिक बाळगत असे.


शहर मोठे व विस्तृत होते, पण लोकसंख्या थोडी होती आणि जी घरे होती, त्यांची पुनर्बांधणी झाली नव्हती.


याहवेहने घर बांधले नाही, तर बांधकाम करणार्‍यांचे श्रम व्यर्थ आहेत; याहवेहने शहराचे रक्षण केले नाही, तर पहारेकर्‍यांचे जागणे व्यर्थ आहे.


कारण त्यांनी तुझ्या वेशींचे स्तंभ बळकट केले आहेत आणि त्या नगरातील तुझ्या लोकांस आशीर्वाद दिला आहे.


“मेंढरांनी लांडग्यांमध्ये जावे त्याप्रमाणे मी तुम्हाला पाठवित आहे म्हणून तुम्ही सर्पासारखे चतुर आणि कबुतरांसारखे निर्दोष असा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan