Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 4:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 आपले सोबती व शोमरोनचे सेनाधिकारी यांच्यादेखत थट्टा करीत तो म्हणाला, “हे दुबळे यहूदी काय करीत आहेत? ते तटाची पुनर्बांधणी करू शकतील काय? ते अर्पणे वाहू शकतील काय? एका दिवसात ते कामे संपवू शकतील काय? मातीच्या ढिगार्‍यातून उपसून काढलेल्या दगडात ते प्राण घालू शकतील काय—ते तर पार जळून गेलेले दगड!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तो आपले बांधव व शोमरोनचे सैन्य ह्यांच्यासमोर म्हणाला, “हे दुर्बळ यहूदी काय करणार? ते तटबंदी करणार काय? ते यज्ञ करणार काय? ते एका दिवसात सर्व काम आटोपणार काय? आच खाल्लेले पाषाण मातीच्या ढिगार्‍यातून निवडून घेऊन ते पुन्हा कामास लागण्याजोगे करतील काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 सनबल्लटाने आपले भाऊबंद आणि शोमरोन येथील सैन्य यांच्या उपस्थितीत, तो म्हणाला, “हे दुबळे यहूदी काय करत आहेत? ते आपणासाठी नगर स्थापित करतील काय? ते यज्ञ करतील काय? एका दिवसात सगळे बांधकाम पुरे करतील काय? या उकिरड्यातून आणि घाणीतून ते पुन्हा दगडांना सजीव करतील काय?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 4:2
17 Iomraidhean Croise  

नंतर तेथील स्थानिक रहिवाशांनी यहूदीयातील लोकांना निराश करण्याचा व घाबरविण्याचा प्रयत्न केला.


यरुशलेमच्या नवीन तटाच्या समर्पणविधीमध्ये भाग घेण्यासाठी देशातील सर्वच लेवी जिथे कुठे असतील तिथून शोधून यरुशलेम येथे पाचारण करण्यात आले, जेणेकरून या विधीमध्ये त्यांनी भाग घेऊन साह्य करावे, झांजा, सारंग्या, वीणा यांच्या संगीतासह गीते गाऊन उपकारस्तुती करावी आणि हा आनंदोत्सवाचा सोहळा साजरा करावा.


या आनंदाच्या दिवशी अनेक मोठमोठी अर्पणे करण्यात आणली, कारण परमेश्वराने त्यांना फार मोठा हर्ष दिला होता. स्त्रिया व मुलांनी देखील आनंद व्यक्त केला. यरुशलेममधील लोकांच्या आनंदाचे निनाद दूरवर ऐकू आले.


नंतर यहूदीयाचे लोक म्हणाले, “कामकऱ्यांची शक्ती घटत चालली आहे आणि दगडविटांचे इतके खच पडले आहेत की पुढील भिंत बांधणे अशक्यच वाटते.”


शेवटी बावन्न दिवसांच्या अवधीत, एलूल महिन्याच्या पंचविसाव्या दिवशी तट बांधून तयार झाला.


ते म्हणतात, “चला, आपण इस्राएली राष्ट्रांचा समूळ नाश करू या; त्यांच्या अस्तित्वाची आठवण देखील आपण नष्ट करून टाकू.”


“यहूदीयाचा राजा हिज्कीयाह, याच्या कारकिर्दीत मोरेशेथ येथील संदेष्टा मीखाहने संदेश दिला, ‘सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: “ ‘सीयोन शेताप्रमाणे नांगरला जाईल, यरुशलेम दगडांचा ढिगारा होईल, मंदिराच्या टेकडीवर दाटीने झाडेझुडपे वाढतील.’


“लोक काय म्हणतात ते तुझ्या लक्षात आले आहे काय, ते म्हणतात, ‘याहवेहने निवडलेल्या यहूदीया व इस्राएल राज्यांचा त्याग केला’? म्हणून ते माझ्या लोकांची घृणा करतात आणि त्यांना एक राष्ट्र म्हणून ओळखत नाहीत.


“हे जाणा आणि समजून घ्या: यरुशलेमची पुनर्स्थापना आणि पुनर्बांधणी करण्यासाठी सात ‘सप्तके’ आणि बासष्ट ‘सप्तके’ निश्चित केली आहेत. ते शब्द बाहेर येण्यापासून तो अभिषिक्त शासनकर्ता होईपर्यंतचा वेळ ठरविला आहे. अडचणीच्या वेळी रस्त्यावर आणि खंदकाने पुन्हा बांधले जाईल,


हे याहवेह, मी तुमची किर्ती ऐकली आहे; मी तुमच्या कृत्यामुळे भयप्रद झालो आहे. आमच्या दिवसातही त्या कार्याची पुनरावृत्ती करा, आमच्या काळात त्या प्रसिद्ध होऊ द्या; क्रोधित असतानाही कृपेची आठवण असू द्या.


त्या दिवशी याहवेह यरुशलेमच्या रहिवाशांचे रक्षण करतील, जेणेकरून त्यांच्यातील अत्यंत दुर्बलदेखील दावीद राजासारखे होतील, महापराक्रमी ठरतील. आणि दावीदाचे राजघराणे परमेश्वरासारखे होईल, त्यांच्या अग्रभागी चालणार्‍या याहवेहच्या दूतासारखे होईल.


“ही सुरुवात अगदी लहान असली तरी तिला तुच्छ मानण्यास कोण धजावेल, कारण याहवेहचे सात नेत्र संपूर्ण पृथ्वीभर फिरतात व जरूब्बाबेलाच्या हातात शिखरशिला आहे, हे पाहून हर्षाने प्रफुल्लित होतात?”


तरी जगाच्या दृष्टीने जे सुज्ञ आहेत अशांना लाजविण्याकरिता परमेश्वराने मूर्खपणाच्या गोष्टी निवडल्या; आणि सशक्तांना लाजविण्याकरिता त्यांनी जगातील दुर्बल गोष्टी निवडल्या.


Lean sinn:

Sanasan


Sanasan