Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 3:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मासे फाटक हस्सनाहच्या पुत्रांनी बांधली. त्यांनी तुळया बसविणे, दरवाजे, कड्या व अडसर लावणे आणि गज बसविणे इत्यादी कामे केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मत्स्यवेस हस्सनाच्या पुत्रांनी बांधली; त्यांनी तिला तुळया घातल्या, तिला कवाडे लावली आणि कड्या व अडसर लावले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 हस्सनाच्या मुलांनी मत्स्यवेस बांधली. तुळया घातल्या व दरवाजे बसवले, या दरवाजांना कड्या आणि अडसर घातले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 3:3
11 Iomraidhean Croise  

नंतर त्याने दावीदाच्या नगराची बाहेरील भिंत गीहोन झऱ्याच्या पश्चिमेकडील खोऱ्यात, मासे फाटकाच्या प्रवेशद्वारापर्यंत आणि ओफेलच्या टेकडीला वेढा घालून ती पुन्हा बांधली; त्याने त्या भिंती जास्त उंच केल्या. त्याने यहूदीयामधील सर्व तटबंदी नगरांमध्ये सैन्याचे सेनापती नेमले.


सनाहाचे 3,630,


नंतर एफ्राईम वेशीपासून येशनाह वेस, मत्स्य वेस आणि हनानेल मनोरा पार करून शंभराचा बुरूजावरून आम्ही मेंढेवेशीपर्यंत गेलो आणि तिथून पुढे द्वारपालाच्या वेशीजवळ जाऊन थांबलो.


एक पत्र शाही जंगलाचा व्यवस्थापक आसाफ यांच्यासाठीही द्यावे. त्या पत्रामध्ये मंदिराशेजारी असलेल्या गढीच्या दरवाजांसाठी, शहराच्या कोटासाठी व माझ्या घराला लागणार्‍या तुळयांसाठी लाकूड देण्याबद्दल त्याला आज्ञा द्यावी.” माझ्यावर परमेश्वराची हस्तकृपा असल्यामुळे राजाने या विनंत्या मान्य केल्या.


हक्कोसचा पुत्र उरीयाह, त्याचा पुत्र मरेमोथाने तटाचा पुढचा भाग दुरुस्त केला. त्याच्या शेजारी मशुल्लाम, बेरेख्याहचा पुत्र, जो मशेजबेलचा पुत्र, त्याने दुरुस्ती केली आणि बाअनाहाचा पुत्र सादोक दुरुस्ती करीत होते.


येशनाह वेस पासेआहचा पुत्र यहोयादा व बसोदयाहचा पुत्र मशुल्लाम यांनी दुरुस्त केली. त्यांनी तुळया घातल्या, दरवाजे उभे केले, त्यांना कड्या, अडसर व लोखंडी गज लावले.


सनबल्लट, तोबीयाह, गेशेम अरबी आणि आमच्या इतर शत्रूंना समजले की मी तट बांधण्याचे काम अंदाजे पूर्ण केले आहे व एकही भेग बाकी राहिली नाही—खरेतर वेशींना दरवाजे लावण्याचेच काम राहिलेले होते,


तट बांधल्यावर मी वेशींना दारे लावली. द्वारपाल, संगीतकार व लेवी यांची नेमणूकही केली;


कारण त्यांनी तुझ्या वेशींचे स्तंभ बळकट केले आहेत आणि त्या नगरातील तुझ्या लोकांस आशीर्वाद दिला आहे.


याहवेह जाहीर करतात, “त्या दिवशी मत्स्य वेशीपासून एक मोठी आरोळी ऐकू जाईल, नगरातील नव्या विभागातून विलापाचा ध्वनी, आणि डोंगरातून मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकू येईल;


Lean sinn:

Sanasan


Sanasan