नहेम्या 3:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 मुख्य याजक एल्याशीब आणि इतर याजकांनी काम सुरू करून मेंढे वेस परत बांधली. ती समर्पित केली आणि तिला दारे लावली, हनानेल मनोऱ्यापासून शंभराचा बुरूज येथपर्यंत बांधकाम केले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 मग मुख्य याजक एल्याशीब व त्याचे याजकबांधव उठून मेंढेवेस बांधू लागले; त्यांनी तिची प्रतिष्ठापना करून तिला कवाडेही लावली; हमेआ बुरुजापर्यंत, हनानेल बुरुजापर्यंत त्यांनी तिची प्रतिष्ठापना केली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 मग मुख्य याजक एल्याशीब आपल्या याजक भावांबरोबर उठला आणि त्यांनी मेंढेवेस बांधली. त्यांनी ती पवित्र करून दरवाजे त्याच्याजागी बसवले. हमेआ बुरुजापर्यंत आणि हनानेल बुरुजापर्यंत ती त्यांनी पवित्र केली. Faic an caibideil |
यहूदीयाच्या उत्तरेकडील सीमेपासून म्हणजे गेबापासून ते दक्षिणेकडील सीमेपर्यंतची म्हणजे रिम्मोन पर्यंतची सर्व भूमी अराबासारखी शुष्क होईल, परंतु यरुशलेम उंचावल्या जाईल, बिन्यामीनच्या वेशीपासून पहिल्या वेशीपर्यंत व कोपर्याच्या वेशीपर्यंत आणि हनानेलाच्या बुरुजापासून शाही द्राक्षकुंडांपर्यंत असेल व या स्थानावर ते अचल राहील.