Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




नहेम्या 11:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 यरुशलेमला येणार्‍या प्रांताधिकार्‍यांच्या नावांची यादी पुढे दिली आहे (आता काही इस्राएली, याजक, लेवी, मंदिराचे सेवक व शलोमोनच्या सेवकांचे वंशज यहूदीयाच्या नगरात स्वतःच्या वतनांतच राहिले, प्रत्येकजण निरनिराळ्या नगरातील स्वतःच्या मालकीच्या भूमीवर स्थायी झाला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 यरुशलेमेत राहणारे प्रांतांचे प्रमुख हेच होत; पण इस्राएल लोक, याजक, लेवी, नथीनीम व शलमोनाच्या सेवकांचे वंशज यरुशलेमेत व यहूदातील आपापल्या नगरांत व वतनांत राहत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जे प्रांताचे अधिकारी यरूशलेमात राहिले ते हेच होते. पण काही इस्राएल लोक, याजक, लेवी, मंदिराचे सेवेकरी व शलमोनाच्या सेवकांचे वंशज यहूदातील आपआपल्या नगरामध्ये व वतनात राहत होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




नहेम्या 11:3
14 Iomraidhean Croise  

आता बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने जे लोक धरून बाबेलला नेले होते, त्यातील जे बंदिवासातून प्रांतात परतले, त्यांच्या नावांची ही यादी आहे (ते यरुशलेम व यहूदीया येथे येऊन आपआपल्या गावी परतले.


मंदिराचे सेवकांचे वंशज: झीहाचे, हसूफाचे, तब्बावोथचे,


इतर काही लोक आणि बाकीचे इस्राएल लोक जे आपआपल्या शहरात स्थायिक झाले होते त्यांच्याबरोबर याजक, लेवी, संगीतकार, द्वारपाल व मंदिरसेवक हे सुद्धा आपआपल्या नगरांत स्थायिक झाले.


राहिलेले इस्राएली, याजक व लेवीसह यहूदीयाच्या सर्व नगरात, आपआपल्या घराण्यांची वतने जिथे होती, तिथे राहत असत.


पण यहूदाह व बिन्यामीन यांच्या गोत्रातील इतर सर्व यरुशलेमात राहिले): यहूदीयाच्या गोत्रातील: अथायाह, हा उज्जीयाहचा पुत्र, तो जखर्‍याहचा पुत्र, तो अमर्‍याहचा पुत्र, तो शफाट्याहचा पुत्र, तो महलालेलाचा पुत्र, तो पेरेसाचा वंशज होता;


याजक: यांचे वंशज: यदायाहचे (येशूआच्या पितृकुळातील) 973,


लेवी: यांचे वंशज: येशूआचे (कदमीएलचे कुटुंबातील होदव्याहचे कुटुंबाद्वारे) 74.


मंदिराचे सेवक: खालील लोकांचे वंशज: झीहाचे, हसूफाचे, तब्बावोथचे,


बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने जे लोक धरून नेले होते, त्यातील जे बंदिवासातून प्रांतात परतले त्यांच्या नावांची यादी ही आहे (ते यरुशलेम व यहूदीया येथे येऊन आपआपल्या गावी परतले.


जरूब्बाबेल, येशूआ, नहेम्याह, अजर्‍याह, रामयाह, नहमानी, मर्दखय, बिलशान, मिस्पेरेथ, बिग्वई, नहूम व बाअनाह): यांच्यासोबत परतलेल्या इस्राएली लोकांची नावे ही:


इतर काही लोक आणि बाकीचे इस्राएली लोक जे आपआपल्या शहरात स्थायिक झाले होते त्यांच्याबरोबर याजक, लेवी, संगीतकार, द्वारपाल व मंदिरसेवक हे सुद्धा आपआपल्या नगरांत स्थायिक झाले. सातव्या महिन्यापर्यंत ते यरुशलेमला आपआपल्या नगरात स्थायिक झाले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan