Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 4:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 सर्व राष्ट्रे आपआपल्या दैवतांच्या नावाने चालतील, पण आम्ही नेहमी याहवेह आमच्या परमेश्वराच्या नावाने चालत राहू.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 सर्व राष्ट्रे आपापल्या दैवतांच्या नावाने चालत आहेत; पण आम्ही परमेश्वर आमचा देव ह्याच्या नावाने सदासर्वकाळ चालू.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 कारण सर्व लोक, प्रत्येकजण आपापल्या देवाच्या नावाने चालतात. पण आम्ही आमचा देव परमेश्वर याच्या नावात सदासर्वकाळ चालू.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 4:5
19 Iomraidhean Croise  

अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा याहवेहने त्याला दर्शन देऊन म्हटले, “मी सर्वसमर्थ परमेश्वर आहे. माझ्यापुढे विश्वासयोग्य आणि निर्दोष राहा.


तरीसुद्धा, प्रत्येक राष्ट्रांतून आलेल्या लोकांनी आपआपले दैवत बनविले, आणि शोमरोनी लोकांनी बांधलेल्या उच्चस्थानी त्यांची स्थापना केली, प्रत्येक राष्ट्रांतून आलेल्या लोकांनी आपआपल्या नगरात असेच केले.


ते आजवर याहवेहची उपासना करीत नाही किंवा याहवेहने ज्यांचे नाव इस्राएल असे ठेवले त्या याकोबाच्या वंशजांना जे विधी आणि नियम, कायदे आणि आज्ञा दिल्या त्याचे ते पालन करत नाहीत.


आता मला माहीत आहे: याहवेह आपल्या अभिषिक्तास विजय प्रदान करतात; पवित्र स्वर्गातून त्यांच्या तारणदात्या उजव्या हाताच्या सामर्थ्याने त्याला उत्तर देतात.


कारण हेच आमचे सनातन परमेश्वर आहेत; ते अखेरपर्यंत आमचे मार्गदर्शक राहतील.


मी येईन आणि प्रभू याहवेहच्या महान कार्याची घोषणा करेन; मी तुमच्या, केवळ तुमच्याच, नीतियुक्त कृत्यांची घोषणा करेन.


याकोबाच्या वंशजा ये, आपण याहवेहच्या प्रकाशात चालू.


याहवेह, आमच्या परमेश्वरा, आम्ही केवळ तुमच्या नावाचा आदर करतो. तुमच्याशिवाय इतर प्रभूंनी आमच्यावर राज्य केले आहे,


होय, याहवेह, तुमच्या नियमांना अनुसरून चालत असताना, आम्ही तुमची वाट पाहतो; तुमचे नाव आणि किर्ती हीच आमच्या अंतःकरणाची इच्छा आहे.


मी त्यांच्याबरोबर अनंतकाळचा करार करेन: मी त्यांचे कल्याण करणे कधीही थांबविणार नाही, त्यांना माझे भय धरण्यास प्रोत्साहित करेन, जेणेकरून ते माझ्यापासून कधीही विमुख होणार नाहीत.


मी याहवेहमध्ये त्यांना सामर्थ्यवान करेन आणि त्यांच्या नामामध्ये ते सुरक्षितपणे जगतील,” असे याहवेह जाहीर करतात.


मागील काळात, त्यांनी सर्व राष्ट्रांना त्यांच्या मर्जीप्रमाणे वागू दिले;


याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञेचे पालन करा आणि त्यांच्या ज्या आज्ञा आणि विधी आज मी तुम्हाला देत आहे, ते सर्व तुम्ही पाळावे.”


तर जसे, तुम्ही ख्रिस्त येशूंना प्रभू म्हणून स्वीकारले तसेच त्यांच्यामध्ये आपले जीवन जगत राहा.


आणि जी काही कृती तुम्ही कराल व जे बोलाल, ते सर्व आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आणि त्यांच्याद्वारे परमेश्वर जो पिता त्यांची उपकारस्तुती करा.


परंतु याहवेहची सेवा करणे तुम्हाला अप्रिय वाटत असेल, तर तुम्ही कोणाची सेवा करणार ते आजच ठरवा, फरात नदीच्या पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या दैवतांची सेवा केली ती की ज्या अमोरी लोकांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या दैवतांची? परंतु मी आणि माझे घराणे, आम्ही याहवेहची सेवा करणार.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan