Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 4:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 प्रत्येकजण आपआपल्या द्राक्षवेलीखाली आणि आपआपल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल, आणि कोणीही त्यांना घाबरविणार नाही, कारण सर्वसमर्थ याहवेहने म्हटले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांना घाबरवणार नाही; कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 त्याऐवजी, प्रत्येक मनुष्य आपल्या द्राक्षवेलीखाली आणि आपल्या अंजिराच्या झाडाखाली बसेल. त्यांना कोणीही घाबरवणार नाही. कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 4:4
25 Iomraidhean Croise  

शलोमोनच्या जीवनभरात यहूदीया आणि इस्राएलचे लोक, दानपासून बेअर-शेबापर्यंत सुरक्षित होते, प्रत्येकजण आपआपल्या द्राक्षवेली व अंजिराच्या झाडाखाली होते.


जसे याहवेहने माझे पिता दावीदाला सांगितले होते, ‘तुझा पुत्र, ज्याला मी तुझ्या जागी तुझ्या राजासनावर बसवेन तो माझ्या नावासाठी मंदिर बांधेल.’ म्हणून याहवेह माझ्या परमेश्वराच्या नावासाठी मी मंदिर बांधावे अशी मी इच्छा बाळगतो.


तू निर्भयपणे झोपशील, कोणी तुला घाबरवून टाकणार नाही, आणि अनेकजण तुझ्या समर्थनाची अपेक्षा करतील.


मग पर्वत लोकांना समृद्धी प्रदान करो, आणि डोंगर नीतिमत्वाची फळे उत्पादित करो.


अचानक आलेल्या संकटाला तू भिऊ नकोस, किंवा दुष्टांचा नाश होत असला तरी भिऊ नकोस;


परंतु जर तुम्ही विरोध कराल आणि विद्रोह कराल, तर तुमचा तलवारीने नाश केला जाईल.” कारण हे शब्द याहवेहच्या मुखातील आहेत.


अरोएरची शहरे ओसाड होतील आणि ते कळपांना विश्रांती घेण्यासाठी सोडले जाईल, तिथे त्यांना घाबरविणारा कोणीही नसेल.


सर्वसमर्थ याहवेह घोषित करतात, “त्या दिवशी मजबूतपणे ठोकलेली पाचर डळमळीत होईल; ती उचकटून जाईल व निखळून जमिनीवर पडेल, तिच्यावर आधारलेले सर्व ओझे खाली पडेल.” ही याहवेहची वाणी आहे.


हे याहवेह, ते त्यांच्या संकटात असताना तुमच्याकडे आले; जेव्हा तुम्ही त्यांना शिस्त लावली, तेव्हा ते कुजबुजत थोडीफार प्रार्थना करू शकत होते.


शांती नीतिमत्तेचे फळ असेल; नीतिमत्तेचे कार्य तर सार्वकालिक शांतता आणि धैर्य आहे.


“हिज्कीयाहचे ऐकू नका. अश्शूरचे महराज असे म्हणतात: माझ्यासोबत शांतता प्रस्थापित करा आणि माझ्याकडे या. मग तुम्ही आपल्या प्रत्येक द्राक्षवेलीचे आणि अंजिराचे फळ खाल आणि आपल्या विहिरीचे पाणी प्याल,


आणि याहवेहचे गौरव प्रगट होईल, आणि सर्व लोक ते एकत्र पाहतील. कारण याहवेहच्या मुखाने हे बोलले आहे.”


तुम्ही नीतिमत्तेने प्रस्थापित व्हाल: जुलूमशाही तुमच्यापासून दूर राहील; तुम्हाला काहीही भयभीत करू शकणार नाही. दहशत तुमच्यापासून दूर करण्यात येईल; ती तुमच्याजवळ येणार नाही.


तर याहवेहमध्ये तुम्हाला आनंद प्राप्त होईल, आणि मी तुम्हाला या भूतलाच्या उच्चस्थानी विजयाने चालवेन आणि तुमचा पिता याकोबाच्या वतनातील उपजावर मेजवानी देईन.” ही याहवेहच्या मुखातील वचने आहेत.


त्यांची काळजी घेण्यासाठी मी असे मेंढपाळ नेमीन, जे त्यांचे संगोपन करतील, व त्यांना पुन्हा भीती आणि दहशत वाटण्याचे कारण राहणार नाही, तसेच त्यातील कोणी हरविणारही नाही,” असे याहवेह जाहीर करतात.


“ ‘म्हणून भिऊ नको! याकोबा, माझ्या सेवका; हे इस्राएला, निराश होऊ नको,’ याहवेह असे जाहीर करतात. ‘मी तुला निश्चितच दूरच्या देशातून, व तुझ्या वंशजांना त्यांच्या बंदिवासातून वाचवेन. याकोबाला परत शांती व संरक्षण लाभेल आणि त्यांना कोणीही भयभीत करणार नाही.’


“ ‘मी त्यांच्याशी शांतीचा करार करेन आणि क्रूर श्वापदांपासून देशाची सुटका करेन म्हणजे ते अरण्यात राहू शकतील आणि जंगलात सुरक्षित झोपतील.


ते यापुढे राष्ट्रांची लूट होणार नाहीत व हिंस्र पशू त्यांना फाडून खाणार नाहीत. ते सुरक्षिततेत राहतील आणि कोणीही त्यांना घाबरविणार नाही.


तू म्हणशील, “तट नसलेल्या गावांवर मी आक्रमण करेन; शांतीच्या व निश्चिंत असलेल्या लोकांवर मी हल्ला करेन; ते सर्व तटाशिवाय व दरवाजे व कुंपणाशिवाय राहतात.


जेव्हा ते त्यांच्या देशात सुरक्षित राहतील आणि त्यांना घाबरविण्यास कोणीही नसेल, तेव्हा त्यांची लज्जा व मला दाखविलेले सर्व अविश्वासूपण ते विसरून जातील.


“ ‘मी तुम्हाला शांती देईन म्हणजे तुम्ही निर्धास्तपणे झोप घ्याल. उपद्रव देणारे पशू मी हाकलून देईन आणि तुमच्या देशावर तलवार चालणार नाही.


म्हणून प्रसूती वेदनेत असलेली एका मुलाला जन्म देईपर्यंत आणि तिचे बाकीचे भाऊ परत इस्राएल लोकांमध्ये येईपर्यंत इस्राएलचा त्याग केला जाईल.


इस्राएलमधील उरलेले कोणतेही दुष्कृत्य करणार नाहीत; ते असत्य बोलणार नाहीत. लबाडी करणारी जीभ त्यांच्या मुखात असणार नाही. ते अन्न सेवन करून विसावा घेतील आणि त्यांना कोणीही भीती दाखविणार नाही.”


“ ‘त्या दिवशी तुम्ही तुमच्या शेजार्‍यांना तुमच्या द्राक्षलतेच्या व अंजिराच्या झाडाखाली बसण्यास आमंत्रित करणार,’ सर्वसमर्थ याहवेह असे जाहीर करतात.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan