Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 4:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 पण शेवटच्या दिवसात याहवेहच्या मंदिराचे पर्वत बळकट व उंच असे स्थापित केले जातील; सर्व पर्वतांपेक्षा ते उंचावले जातील, आणि लोकांचा लोंढा त्याकडे एकत्र येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 शेवटल्या दिवसांत असे होईल की, परमेश्वराच्या मंदिराचा डोंगर पर्वतांच्या माथ्यावर स्थापण्यात येईल आणि सर्व डोंगरांहून तो उंच होऊन त्याकडे राष्ट्रे लोटतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 परंतु नंतरच्या दिवसात असे होईल की, परमेश्वराच्या घराचा पर्वत, इतर पर्वतांवर स्थापित केला जाईल व तो डोंगरावर उंचावला जाईल. आणि लोकांचा प्रवाह त्याकडे येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 4:1
53 Iomraidhean Croise  

नंतर याकोबाने आपल्या सर्व मुलांना बोलावून म्हटले: “असे माझ्याभोवती गोळा व्हा, म्हणजे पुढे भविष्यकाळात तुमचे काय होणार आहे ते मी तुम्हाला सांगेन.


यहूदाहपासून राजदंड कधीही वेगळा होणार नाही, किंवा अधिकाराची काठी त्याच्या पायामधून निघून जाणार नाही, ज्याचे जे आहे तो येईपर्यंत, राष्ट्रे त्याची आज्ञा पाळतील.


तुझी सेना युद्ध समयी स्वेच्छेने तुला साथ देईल. प्रातःकाळाच्या गर्भातून जन्मलेल्या दवाप्रमाणे पवित्रतेने सुशोभित होऊन तुझे तरुण तुझ्याकडे येतील.


सर्व राष्ट्रे याहवेहस स्मरण करतील; दिगंतरीचे लोक त्यांच्याकडे वळतील; आणि राष्ट्रातील सर्व कुटुंब त्यांच्यासमोर नतमस्तक होतील.


याहवेह महान आहेत, आमच्या परमेश्वराच्या नगरामध्ये, त्यांच्या पवित्र पर्वतावर ते सर्वोच्च स्तुतीस पात्र आहेत.


हे प्रभू, तुम्ही निर्माण केलेली सर्व राष्ट्रे, तुमच्यासमोर सन्मानाप्रत येतील व तुमची आराधना करतील; तुमच्या पवित्र नामाची थोरवी गातील.


आणि त्या दिवशी मोठा कर्णा वाजू लागेल. ज्यांचा अश्शूरमध्ये नाश होत होता आणि जे इजिप्तमध्ये बंदिवासात गेले होते, ते येतील आणि यरुशलेममधील पवित्र पर्वतावर याहवेहची उपासना करतील.


मी उत्तरेला म्हणेन, ‘त्यांना सोडून द्या!’ आणि दक्षिणेला म्हणेन, ‘त्यांना धरून ठेवू नका.’ माझ्या पुत्रांना दूरवरून आणि पृथ्वीच्या कोपऱ्यातून माझ्या कन्यांना घेऊन या—


ते म्हणतात, “याकोबाच्या कुळांना पुनर्स्थापित करणे आणि माझ्या अवशिष्ट इस्राएलच्या लोकांना परत आणणे, हे करण्यासाठी माझा सेवक होणे, हे काम फारच लहानसे आहे, तर पृथ्वीच्या दिगंतापर्यंत माझे तारण पोचवावे यासाठी मी तुला गैरयहूदीयांसाठी त्यांचा प्रकाश व्हावा असेही करेन.”


“आपले तंबू प्रशस्त कर, तुझ्या तंबूच्या कनातीचा विस्तार वाढव, हात आवरू नको; दोरबंद लांब कर, खुंट्या मजबूत कर.


अशांना मी माझ्या पवित्र पर्वतावर आणेन आणि माझ्या प्रार्थना मंदिरामध्ये त्यांना आनंदित करेन. त्यांच्या होमार्पणे व अर्पणांचा माझ्या वेदीवर स्वीकार केला जाईल; कारण माझ्या घराला सर्व राष्ट्रांसाठी प्रार्थनेचे घर असे म्हणतील.”


याहवेह, माझे सामर्थ्य व माझे दुर्ग, संकटकाळच्या वेळी माझा आश्रय, जगातील सर्व राष्ट्रे अगदी शेवटापासून तुमच्याकडे येऊन म्हणतील, “आमच्या पूर्वजांकडे खोट्या दैवतांशिवाय काहीही नव्हते, व्यर्थ मूर्ती, ज्या त्यांचे काही भले करू शकल्या नाही.


“यहूदीयाचा राजा हिज्कीयाह, याच्या कारकिर्दीत मोरेशेथ येथील संदेष्टा मीखाहने संदेश दिला, ‘सर्वसमर्थ याहवेह म्हणतात: “ ‘सीयोन शेताप्रमाणे नांगरला जाईल, यरुशलेम दगडांचा ढिगारा होईल, मंदिराच्या टेकडीवर दाटीने झाडेझुडपे वाढतील.’


त्यावेळी ते यरुशलेमला याहवेहचे सिंहासन असे म्हणतील, आणि याहवेहच्या नावाला आदर देण्यासाठी सर्व राष्ट्रे तिथे तिच्याकडे येतील. ते त्यांच्या हृदयाच्या हट्टीपणाने चालणार नाहीत.


ते येतील आणि सीयोनाच्या टेकड्यांवर हर्षगीते गातील; याहवेहच्या विपुल पुरवठ्यासाठी— धान्य, नवा द्राक्षारस, आणि जैतुनाचे तेल, गुरातील व कळपातील पिल्लांसाठी आनंद करतील. भरपूर पाणी दिलेल्या बागेप्रमाणे ते होतील आणि त्यांची सर्व दुःखे नाहीशी होतील.


“परंतु मी मोआबच्या समृद्धीची येत्या दिवसात पुन्हा भरपाई करेन,” असे याहवेह म्हणतात. मोआबाच्या न्यायाचे भाकीत येथे संपते.


मेघांनी देशाला झाकून टाकावे, तसे तू माझ्या इस्राएली लोकांवर हल्ला करशील. येणार्‍या दिवसांत, हे गोग, मी तुला माझ्या देशाच्या विरुद्ध आणेन, म्हणजे तुझ्याद्वारे राष्ट्रांच्या दृष्टीत जेव्हा मी पवित्र मानला जाईल तेव्हा ते मला जाणतील.


परमेश्वराच्या दृष्टान्तांमध्ये याहवेहनी मला इस्राएल देशात नेले आणि एका अत्यंत उंच पर्वतावर ठेवले. त्याच्या दक्षिणेकडे काही इमारती होत्या, ज्या शहरासारख्या दिसत होत्या.


“मंदिराचा हा नियम आहे: पर्वतांच्या माथ्याच्या सभोवतालचा सर्व भाग परमपवित्र असणार. मंदिराचा नियम असाच आहे.


आता मी येथे भविष्यात तुझ्या लोकांसोबत काय होणार आहे ते समजविण्यासाठी आलो आहे, कारण हा दृष्टान्त पूर्ण होण्यास बराच वेळ आहे.”


परंतु स्वर्गामधील परमेश्वर गूढ रहस्ये प्रकट करतात. येणार्‍या दिवसात काय घडणार ते त्यांनीच नबुखद्नेस्सर राजाला दाखविले आहे. तुम्ही आपल्या बिछान्यावर पडले असता तुमचे स्वप्न आणि दृष्टान्त जे तुमच्या मनातून पार झाले ते हे आहेत:


मग लोखंड, माती, कास्य, चांदी आणि सोने यांचे तुकडे तुकडे झाले आणि ते उन्हाळ्यात खळ्यातील भुशाप्रमाणे झाले. वाऱ्याने त्यांना अशा प्रकारे उडवून दिले की त्यांचा एक छोटासा तुकडाही शिल्लक राहिला नाही. पण ज्या दगडाने पुतळा उलथून टाकला, त्या दगडाचा एक प्रचंड डोंगर झाला व त्याने सर्व पृथ्वी झाकून टाकली.


“त्या राजांच्या काळात, स्वर्गातील परमेश्वर एक राज्य स्थापन करतील, ज्याचा नाश होणार नाही किंवा इतर कोणीही त्याच्यावर राज्य करू शकणार नाही. हे त्या सर्व राज्यांना चिरडून टाकेल आणि त्यांचा नाश करेल, परंतु ते स्वतःच कायम टिकून राहील.


त्याला अधिकार, गौरव व सार्वभौम सामर्थ्य देण्यात आले; सर्व राष्ट्रांनी आणि प्रत्येक सर्व भाषा बोलणार्‍यांनी त्याची उपासना केली. त्याचे सामर्थ्य शाश्वतचे आहे, जे कधीही ढळणार नाही आणि त्याचा कधी अंत होत नाही आणि म्हणून त्याचे राज्य हे असे राज्य आहे, ज्याचा कधीही नाश होणार नाही.


तरी परमोच्च परमेश्वराच्या पवित्र जणांना राज्य मिळेल आणि ते सदासर्वकाळ त्याच्या ताब्यात राहतील—होय, सदासर्वकाळ.’


जोपर्यंत सनातन पुरुष येईपर्यंत आणि परमोच्च परमेश्वराच्या पवित्र लोकांच्या बाजूने निर्णय घोषित होईपर्यंत, त्यांनी राज्य ताब्यात घेण्याची वेळ आली.


मग परमोच्च परमेश्वराच्या पवित्र लोकांना आकाशाखाली असलेल्या राज्यांचे सार्वभौमत्व, सामर्थ्य आणि महानता देण्यात येईल. त्यांचे राज्य सनातन राज्य आहे आणि सर्व शासक त्यांची सेवा करतील व त्यांच्या आज्ञा पाळतील.’


त्यानंतर इस्राएली लोक परत येतील आणि याहवेह त्यांच्या परमेश्वराला आणि त्यांचा राजा दावीदाचा शोध घेतील. अखेरच्या काळात याहवेहकडे ते थरथर कापत आणि त्यांच्या आशीर्वादासाठी येतील.


म्हणून तुमच्यामुळे, सीयोन शेताप्रमाणे नांगरला जाईल, यरुशलेम दगडांचा ढिगारा होईल, मंदिराच्या टेकडीवर दाटीने झाडेझुडपे वाढतील.


यहूदीयाच्या उत्तरेकडील सीमेपासून म्हणजे गेबापासून ते दक्षिणेकडील सीमेपर्यंतची म्हणजे रिम्मोन पर्यंतची सर्व भूमी अराबासारखी शुष्क होईल, परंतु यरुशलेम उंचावल्या जाईल, बिन्यामीनच्या वेशीपासून पहिल्या वेशीपर्यंत व कोपर्‍याच्या वेशीपर्यंत आणि हनानेलाच्या बुरुजापासून शाही द्राक्षकुंडांपर्यंत असेल व या स्थानावर ते अचल राहील.


“त्या दिवसात अनेक राष्ट्रे याहवेहकडे वळतील. मी तुम्हामध्ये वस्ती करेन मग तुम्हाला कळेल की सर्वसमर्थ याहवेहने मला पाठविले आहे.


याहवेह असे म्हणतात: “मी सीयोनात परत जाईन आणि यरुशलेमात वास्तव्य करेन. मग यरुशलेमला विश्वासू नगरी आणि सर्वसमर्थ याहवेहच्या पर्वतास पवित्रगिरी असे म्हणतील.”


“जिथून सूर्य उगवतो व जिथे तो मावळतो तिथपर्यंतच्या सर्व राष्ट्रांमध्ये माझे नाम महान केले जाईल. प्रत्येक ठिकाणी माझ्या सन्मानार्थ सुवासिक धूप जाळण्यात येईल व शुद्ध अर्पणे वाहण्यात येतील, कारण माझे नाम सर्व राष्ट्रांमध्ये थोर होईल,” सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.


“ ‘परमेश्वर म्हणतात, शेवटच्या दिवसात, मी माझा आत्मा सर्व लोकांवर ओतेन. तुमचे पुत्र व तुमच्या कन्या भविष्यवाणी करतील, व तुमचे वृद्ध स्वप्ने पाहतील, तुमचे तरुण दृष्टान्त पाहतील.


पण आता या शेवटच्या दिवसांमध्ये, ते त्यांच्या पुत्राद्वारे आपल्याशी बोलले आहेत व त्यांना सर्व गोष्टींचे वारस केले आहे आणि त्यांच्या द्वारेच जग निर्माण केले आहे.


सर्वात प्रथम तुम्ही हे समजून घ्या की, शेवटच्या दिवसात थट्टा करणारे येतील, थट्टा करतील आणि स्वतःच्या वाईट वासनांच्या मागे लागतील.


कारण त्याचवेळी सातव्या देवदूताने आपला रणशिंग वाजविला, त्याबरोबर स्वर्गातून अनेक प्रचंड ध्वनी झाले, त्या वाण्या म्हणत होत्या: “जगाचे राज्य आमच्या प्रभूचे आणि त्यांच्या ख्रिस्ताचे झाले आहे, ते युगानुयुग राज्य करतील.”


हे प्रभू, असा कोण आहे जो तुमचे भय धरणार नाही, आणि तुमच्या नावाचे गौरव करणार नाही? कारण तुम्हीच पवित्र आहात! सर्व राष्ट्रे येऊन तुमची आराधना करतील, कारण तुमची न्याय्य कृत्ये प्रकट झाली आहेत.”


नंतर ज्यांना न्याय करण्याचे अधिकार देण्यात आले होते त्यांना मी राजासनावर बसलेले पाहिले. आणि येशूंच्या साक्षीमुळे व परमेश्वराच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद करण्यात आला त्यांचे आत्मे पहिले आणि त्यांनी त्या पशूला किंवा त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते किंवा आपल्या कपाळावर व हातावर त्याची खूणही घेतली नव्हती. ते पुन्हा जिवंत झाले होते व त्यांनी ख्रिस्तासह एक हजार वर्षे राज्य केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan