Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 3:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तुम्ही जे माझ्या लोकांचे मांस खाता, त्यांची कातडी सोलता आणि त्यांची हाडे मोडता, आणि पातेल्यात शिजविण्यासाठी मांसाचे तुकडे करावेत तसे त्यांचे तुकडे करता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 तुम्ही माझ्या लोकांचे मांस खाता, त्यांच्यावरचे कातडे सोलून काढतात, बहुगुण्यात टाकलेल्या किंवा कढईत असलेल्या मांसाच्या तुकड्यांप्रमाणे त्यांची हाडे मोडून तुकडे-तुकडे करतात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 जे तुम्ही माझ्या लोकांचे मांस खाता आणि त्यांची कातडी सोलता व त्यांची हाडे मोडता. भांड्यात घालण्यासाठी ज्याप्रमाणे मांस चिरतात, आणि जसे पातेल्यांत घालण्यासाठी त्याचे तुकडे करता, तशी जे तुम्ही त्यांची हाडे ठेचता व त्यांचे तुकडे करता, त्या तुम्हास न्याय कळत नाही काय?

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 3:3
11 Iomraidhean Croise  

दुष्कृत्य करणार्‍यांना हे ठाऊक नाही काय? भाकरी खाण्यासारखे ते माझ्या लोकांना गिळून फस्त करतील. ते कधीही याहवेहला हाक मारत नाहीत.


जेव्हा वाईट लोक मला गिळण्यास माझ्यावर हल्ला करतील, तेव्हा माझे शत्रू व माझे विरोधकच अडखळतील आणि पडतील.


पृथ्वीवरील गरिबांना आणि मानवजातीतील गरजूंना गिळंकृत करण्यासाठी, त्यांचे दात करवतीसारखे आहेत, आणि ज्यांच्या जबड्यामध्ये चाकू ठेवलेले आहेत.


त्यांच्या लोकांच्या वडिलजनांच्या व पुढाऱ्यांच्या विरोधात न्याय करण्यासाठी याहवेह त्यांच्या न्यायसभेत प्रवेश करतात: “तुम्हीच माझ्या द्राक्षमळ्याला उद्ध्वस्त केले आहे; गरिबांपासून लुबाडलेली लूट तुमच्या घरांमध्ये आहे.


माझ्या लोकांना चिरडण्याचे व गरिबांचे चेहरे ठेचण्याचे काय कारण होते?” प्रभू सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात.


ते म्हणतात, ‘तुम्ही आपली घरांची हल्लीच पुनर्बांधणी केली नाही काय? हे शहर एक कढई व आपण त्यातील मांस असे आहोत.’


त्यात मांसाचे तुकडे टाक, सर्वात उत्तम तुकडे; मांडी आणि खांदा. यांच्या उत्तम हाडांनी कढई भर;


जे तुम्ही गरजवंतांना तुडवितात आणि देशाच्या गरिबांना दूर लोटता,


अलीकडे माझे लोक शत्रूसारखे उठले आहेत. जे लोक निष्काळजीपणे जवळून जातात त्यांचे किमती कपडे तुम्ही काढून घेता, जसे युद्धातून परत येणारे पुरुष करतात.


तिच्यामध्ये असलेले तिचे अधिकारी गर्जना करणार्‍या सिंहासारखे आहेत; तिचे शासनकर्ते निशाचर लांडगे आहेत ते सकाळपर्यंत काहीही शिल्लक राहू देत नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan