Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 2:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 म्हणून याहवेह म्हणतात: “मी या लोकांविरुद्ध विपत्ती योजत आहे, ज्यापासून तुम्ही स्वतःला वाचवू शकत नाही. तुम्ही पुन्हा कधीही गर्वाने चालणार नाही, कारण तो आपत्तीचा काळ असेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 म्हणून परमेश्वर म्हणतो, पाहा, ह्या वंशाचे अनिष्ट मी योजत आहे; त्याच्या जोखडाखालून तुम्हांला आपली मान काढता येणार नाही; तुम्हांला मान वर करून चालता येणार नाही; कारण प्रसंग वाईट आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 ह्यास्तव परमेश्वर असे म्हणतो, “पाहा! या कुळाविरुद्ध विपत्ती आणण्याचे योजीत आहे, ज्यामधून तुम्ही तुमची मान काढू शकणार नाही, आणि तुम्ही गर्वाने चालणार नाही. कारण ही वाईट वेळ आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 2:3
29 Iomraidhean Croise  

निर्दयी नाहीसे होतील, आणि उपहास करणारे दिसेनासे होतील, वाईट नजर ठेवणाऱ्याचा सर्वांचा नाश होईल—


याहवेह म्हणतात, “सीयोनातील स्त्रिया गर्विष्ठ आहेत, त्या मान उडवीत चालतात, चंचल नेत्रकटाक्षांनी मन वेधतात, पायातल्या पैजणांचा छुमछुम आवाज करीत, कंबर मटकत छोटी छोटी पावले टाकून चालतात.


धिक्कार असो, जे असे म्हणतात, “परमेश्वराला घाई करू द्या; त्यांना त्यांचे काम लवकर करू द्या म्हणजे आपल्याला ते पाहता येईल. इस्राएलच्या पवित्र परमेश्वराची योजना— ती जवळ येऊ द्या, ती दृष्टीस पडू द्या, म्हणजे आम्हाला ती कळेल.”


“म्हणून आता यहूदीयातील लोकांना आणि जे यरुशलेममध्ये राहतात, त्यांना सांग, ‘याहवेहचा संदेश ऐका: पाहा! मी तुमच्यासाठी विपत्ती तयार करीत आहे आणि तुमच्याविरुद्ध योजना आखीत आहे. म्हणून तुम्ही प्रत्येकजण दुष्ट मार्गापासून वळा, व तुमचे मार्ग व तुमचे आचरण सुधारा.’


हा संदेश मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह यास सांगितला. मी म्हणालो, “बाबेलच्या राजाचे जू आपल्या मानेवर ठेव; त्याची व त्याच्या लोकांची सेवा कर, म्हणजे तुम्ही जगाल.


“म्हणून याहवेह असे म्हणतात: तुम्ही माझी आज्ञा पाळली नाही; तुमच्या स्वतःच्या लोकांची मुक्तता करण्याची घोषणा करीत नाही. म्हणून मी आता तुमची ‘मुक्तता’ करेन, असे याहवेह जाहीर करतात—युद्ध, दुष्काळ व मरी यांच्याद्वारे तुम्हाला मरणाची ‘मुक्तता’ मिळेल. सर्व जगातील राज्यात मी तुम्हाला घृणास्पद असे करेन.


यहूदीने तीन-चार रकाने वाचून संपवली की राजा वाचलेला भाग लेखनिकाच्या चाकूने तेवढा कापून विस्तवात टाकी. असे संपूर्ण चर्मपत्र जळून नष्ट झाले.


होशयाहचा पुत्र अजर्‍याह, कारेहचा पुत्र योहानान व इतर सर्व गर्विष्ठ माणसे यिर्मयाहला म्हणाली: “तू खोटे बोलतोस! ‘तुम्ही इजिप्तला जाऊन तिथे वसती करू नये,’ असे आम्हाला सांगण्यास तुला आमचे परमेश्वर याहवेहने पाठविले नाही.


जिथे कुठेही मी या राष्ट्राला हद्दपार केले, या दुष्ट राष्ट्रातील सर्व वाचलेल्या लोकांना जगण्यापेक्षा मेलेले बरे असे वाटेल, असे सर्वसमर्थ याहवेह म्हणतात.’


माझी पापे गुलामगिरीचे जोखड बनली आहेत; त्यांच्या हातांनी ती एकत्र विणली गेली आहेत. ती माझ्या गळ्यात अडकविण्यात आली आहेत, आणि प्रभूने माझी शक्ती खचविली आहे. मी ज्यांचा सामना करू शकत नाही, त्यांच्या हाती मला दिले आहे.


याहवेहने योजल्यानुसार केले आहे; त्यांनी त्यांचे वचन पूर्ण केले, जे संकल्प त्यांनी फार पूर्वी जाहीर केले होते. त्यांनी दयामाया न दाखविता तुम्हाला जमीनदोस्त केले आहे, तुमची स्थिती बघून तुमच्या शत्रूचे समाधान केले आहे, त्यांनी तुमच्या शत्रूंचे शिंग उंचावले आहे.


पाठलाग करणारे आमच्या अगदी जवळ येऊन पोचले आहेत. आम्ही अत्यंत थकलो आहोत व आम्हाला आराम असा नाहीच.


आता मी, नबुखद्नेस्सर, स्वर्गाच्या राजाधिराजाची स्तुती, गौरव व सन्मान करतो, कारण ते जे काही करतात ते योग्य करतात आणि त्यांचे सर्व मार्ग न्याय्य आहेत. आणि जे गर्वाने चालतात त्यांना ते नम्र करण्यास समर्थ आहेत.


चपळ निसटून जाणार नाहीत, शक्तिमानाला आपले सामर्थ्य लावता येणार नाही, आणि वीराला आपला जीव वाचविता येणार नाही.


इस्राएलच्या लोकांनो, हे वचन ऐका, जे याहवेह तुमच्याविरुद्ध बोलले आहेत—त्या संपूर्ण घराण्याविरुद्ध आहे ज्यांना मी इजिप्तमधून बाहेर आणले आहे:


“पृथ्वीवरील सर्व राष्ट्रातील लोकांमधून मी फक्त तुझीच निवड केली आहे; म्हणून तुझ्या सर्व पापांबद्दल मी तुला शिक्षा करेन.”


अशा वेळी जे शहाणे आहेत ते मौन धरतात, कारण वेळ वाईट आहे.


जे वाईट कृत्याची योजना करतात, जे आपल्या अंथरुणावर कट रचतात, त्यांचा धिक्कार असो! पहाट होताच ते त्यांचा कट पूर्ण करतात कारण हे सामर्थ्य त्यांच्या हातात असते.


त्यांनी माझ्याकरिता त्यांचा जीवही धोक्यात घातला; आणि केवळ मीच नाही, तर गैरयहूदीयांच्या सर्व मंडळ्याही त्यांचे ऋणी आहेत.


दिवस कठीण आहेत, म्हणून प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या.


म्हणून तुम्ही याहवेहने पाठविलेल्या तुमच्या शत्रूंचे गुलाम व्हाल आणि तुम्ही भुकेले, तहानलेले, नग्न आणि अत्यंत गरीब असे व्हाल आणि ते तुमचा नाश करेपर्यंत तुमच्या मानेवर लोखंडी जू ठेवण्यात येईल.


कारण जे कोणी दयावान नाहीत त्यांचा न्याय दयेवाचून होईल. दया न्यायावर विजय मिळविते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan