Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 1:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 म्हणून मी शोक व आक्रंदन करेन; मी अनवाणी व वस्त्रहीन फिरेन. कोल्ह्यासारखा मी आक्रोश करेन; आणि घुबडाप्रमाणे विव्हळेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 ह्यास्तव मी शोक व आक्रंदन करीन. मी उघडानागडा फिरेन, मी कोल्ह्यांसारखा ओरडेन व शहामृगांसारखा विव्हळेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 या कारणास्तव मी विलाप व आकांत करीन. मी अनवाणी व वस्त्राशिवाय फिरेन. मी कोल्ह्याप्रमाणे मोठ्याने आकांत करीन आणि घुबडाप्रमाणे शोक करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 1:8
19 Iomraidhean Croise  

हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या चौदाव्या वर्षी, अश्शूरचा राजा सन्हेरीबने यहूदीयाच्या सर्व तटबंदीच्या नगरांवर हल्ला केला आणि ती ताब्यात घेतली


जेव्हा मर्दखयाला समजले, ज्या सर्व गोष्टी करण्यात आल्या होत्या, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून, गोणपाट नेसून, अंगाला राख फासून व बाहेर शहरात जाऊन मोठमोठ्याने व अतिशय दुःखाने विलाप केला.


मी कोल्ह्यांचा भाऊ, आणि घुबडाचा सोबती असा झालो आहे.


ओसाड प्रदेशातील घुबडासारखा, भग्नावशेषातील घुबडासारखा मी झालो आहे.


परंतु अरण्यातील प्राणी तिथे राहतील, तरसानी तिची घरे भरून जातील; तिथे घुबडे राहतील, आणि तिथे बोकडे उड्या मारतील.


तरस प्राणी तिच्या गडांवर वस्ती करतील, कोल्हे तिच्या आलिशान राजवाड्यांमध्ये वस्ती करतील. तिची वेळ फार जवळ आली आहे, आणि तिचे दिवस लांबणार नाहीत.


म्हणून सिबमाहच्या द्राक्षवेलींसाठी याजेरसह मीही रडतो. हेशबोन आणि एलिआलेह, मी तुम्हाला अश्रूंनी भिजवितो! तुमच्या पिकलेल्या फळांसाठी आणि तुमच्या कापणीच्या आनंदाचा जयघोष शांत झाला आहे.


यामुळे माझ्या शरीराला यातनेने दुखविले आहे, प्रसूत स्त्रीच्या वेदनांप्रमाणे मला वेदनांनी घेरले आहे. जे काही मी ऐकतो, त्यामुळे मी लटपटून जातो, मी जे काही पाहतो, त्यामुळे मी भांबावून जातो.


म्हणून मी म्हणालो, “माझ्यापासून दूर जा; मला आवेगाने रडू द्या. माझ्या लोकांच्या नाशामुळे माझे सांत्वन करण्याचा प्रयत्न करू नका.”


आत्मसंतुष्ट स्त्रियांनो, थरथर कापा; निश्चिंत असलेल्या कन्यांनो, तुमचा थरकाप होऊ द्या! आपली सुंदर वस्त्रे काढून शोक करण्यासाठी गोणपाट गुंडाळा.


अहो, माझ्या यातना, माझ्या यातना! मला अत्यंत वेदना होत आहेत. अहो, माझ्या ह्रदयाच्या यातना! माझे ह्रदय माझ्यातच धडधडते, मी शांत राहू शकत नाही. कारण मी रणशिंगाचा आवाज ऐकला आहे; मी युद्धाची ललकारी ऐकली आहे.


हाय, हाय! माझे मस्तक पाण्याचे एक स्त्रोत आणि माझे डोळे एक अश्रूंचा झरा असता! तर मी रात्रंदिवस सारखे अश्रू ढाळीत माझ्या घात केलेल्या लोकांकरिता विलाप केला असता.


मी डोंगराविषयी विलाप आणि आक्रोश करेन आणि तसेच रानातल्या निर्जन कुरणाबद्दल विलाप करेन. कारण सर्वकाही ओसाड पडलेले व प्रवास करण्यायोग्य नाहीत, गाईगुरांचे हंबरणे ऐकू येत नाही. पक्षीसुद्धा उडून गेले आहेत. आणि जनावरेही गेली आहेत.


सीयोनातून आक्रंदन ऐकू येत आहे: ‘आमचा किती सत्यानाश झाला आहे! आमच्यावर घोर लज्जा आली आहे! आम्ही आमचा देश सोडून गेले पाहिजे कारण आमच्या घरांची पडझड झाली आहे.’ ”


“मानवपुत्रा, इजिप्तच्या सैन्यासाठी विलाप कर आणि तिला व शक्तिशाली राष्ट्रांच्या कन्यांना खाली गर्तेत जाणार्‍यांबरोबर पृथ्वीच्या खाली हवाली कर.


त्या दिवशी लोकांकरिता तुम्ही चेष्टेचा विषय व्हाल; ते तुम्हाला या विलाप गीताने टोमणे मारतील: ‘आमचा संपूर्ण नाश झाला आहे; माझ्या लोकांच्या मालमत्तेची विभागणी झाली आहे. ते ती माझ्यापासून काढून घेतात! ते आमची शेते बंडखोरांना देतात.’ ”


त्याने आपली वस्त्रे काढली आणि शमुवेलपुढे भविष्यवाणी करू लागला. तो संपूर्ण दिवस व ती रात्र शौल उघडा पडला. त्यावरूनच लोक म्हणतात, “शौलसुद्धा संदेष्ट्यांपैकी एक आहे काय?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan