Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 1:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 “म्हणून मी शोमरोनला मातीचा ढिगारा, द्राक्षमळे लावण्याची जागा करेन. मी तिचे दगड खोऱ्यात टाकेन आणि तिचा पाया उघडा करेन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 ह्यामुळे मी शोमरोनास शेतातील दगडांच्या ढिगारासारखे करीन; तिला द्राक्षीच्या मळ्यासारखे करीन; मी तिचे दगड खोर्‍यात फेकून देईन, तिचे पाये उघडे करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 “म्हणून मी शोमरोनला शेतातल्या ढिगाप्रमाणे करीन, ती द्राक्षमळे लावण्याच्या जागेप्रमाणे होईल.” मी तिचे दगड दरीत ढकलून देईन, आणि तिचे पाये उघडे करीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 1:6
19 Iomraidhean Croise  

जर तो शहरात निघून गेला, तर सर्व इस्राएली लोक त्या शहराकडे दोऱ्या आणतील आणि तिथे एकही खडा राहणार नाही तोपर्यंत आम्ही ते खाली दरीत ओढून नेऊ.”


तिसर्‍या वर्षांच्या शेवटी अश्शूरच्या लोकांनी ते घेतले. शोमरोन हे हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या सहाव्या वर्षी आणि इस्राएलचा राजा होशेच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी ताब्यात घेण्यात आले.


हिज्कीयाह राजाच्या कारकिर्दीच्या चवथ्या वर्षी, म्हणजे इस्राएलाचा राजा एलाहचा पुत्र होशेच्या कारकिर्दीच्या सातव्या वर्षी, अश्शूरच्या शल्मनेसर राजाने शोमरोनवर आक्रमण केले आणि त्याला वेढा घातला.


“ ‘हे तू ऐकले नव्हते काय? याचा निश्चय मी फार पूर्वीच केलेला होता. या घटना मी प्राचीन काळातच योजून ठेवल्या होत्या; आता मी त्या अंमलात आणल्या आहेत, जी तटबंदीची शहरे तू उद्ध्वस्त करून त्यांचा दगडांचा ढिगारा केलास.


दिमिष्का विरुद्ध भविष्यवाणी: “पहा, दिमिष्क आता शहर असे राहणार नाही परंतु ते नाशवंत वस्तूंचा ढिगारा असे होईल.


ते तुमच्या तटबंदीच्या उंच भिंती खाली पाडतील आणि त्या खाली येतील; ते त्यांना खाली जमिनीवर आणून, पूर्ण धुळीत मिळवतील.


तुम्ही शहराला दगडविटांच्या तुकड्यांचा ढीग बनविले, तटबंदी असलेले नगर उद्ध्वस्त केले, परकियांचे किल्ले आता नगर म्हणून अस्तित्वात नाहीत. ते परत कधीही बांधले जाणार नाही.


शोमरोनच्या डोंगरावर तू पुन्हा आपले द्राक्षमळे लावशील; शेतकरी ते मळे लावतील व स्वतःची फळे खाण्याचा आनंद उपभोगतील.


“हे संहारक पर्वता, तू जो संपूर्ण पृथ्वीचा विध्वंस करतो, मी तुझ्याविरुद्ध आहे,” याहवेह जाहीर करतात, “मी माझा हात तुझ्याविरुद्ध उगारेन, तुला कडेलोट करेन, आणि तुला भस्म झालेला डोंगर करेन.


बाबिलोन भग्नावशेषाचा ढिगारा होईल, तिथे कोल्ह्यांचा संचार होईल, ते भयानकतेचा व तिरस्काराचा विषय होतील, जिथे कोणीही राहत नाही असे ठिकाण.


“मी यरुशलेमला उद्ध्वस्त करून त्याचा ढिगारा करेन, आणि त्यात कोल्ह्यांची विवरे होतील. यहूदीयातील नगरे उजाड करेन तिथे कोणीही वस्ती करू शकणार नाही.”


सोन्याची चमक कशी नाहीशी झाली आहे, उत्तम सोने निस्तेज झाले आहे! पवित्र रत्ने प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यात विखुरली आहेत.


तुम्ही चुन्याचा लेप लावलेली भिंत मी पाडून टाकेन आणि ती धुळीस मिळवेन, म्हणजे तिचा पाया उघडा पडेल. जेव्हा ती पडेल तेव्हा तिच्याबरोबर तुमचाही नाश होईल; आणि तुम्ही जाणाल की मीच याहवेह आहे.


शोमरोनच्या लोकांनी त्यांचा दोष वाहिलाच पाहिजे, कारण त्यांनी त्यांच्या परमेश्वराविरुद्ध बंड केले. ते तलवारीने पडतील; त्यांची बालके जमिनीवर आपटली जातील, आणि त्यांच्या गर्भवती स्त्रियांना चिरून टाकण्यात येईल.”


तुम्ही गरिबांच्या पेंढ्यावरही कर लावता आणि त्यांच्या धान्यावरही कर लावता. म्हणून जरी स्वतःसाठी चिरेबंदी भवन बांधले असतील तरी त्यामध्ये कधीही राहणार नाही, किंवा तुम्ही लावत असलेल्या भरघोस पीक देणार्‍या रमणीय जरी तुम्ही कसदार द्राक्षमळा लावला तरी त्यातील द्राक्षारस कधीच पिऊ शकणार नाही.


सार्वभौम याहवेहनी स्वतः शपथ घेतली आहे—याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर घोषणा करतात: “याकोबाच्या गर्वाचा मी तिरस्कार करतो आणि त्यांचे किल्ले मी घृणास्पद मानतो; मी या शहराला आणि तिच्यातील सर्वकाही शत्रूंच्या हाती देईन.”


म्हणून तुमच्यामुळे, सीयोन शेताप्रमाणे नांगरला जाईल, यरुशलेम दगडांचा ढिगारा होईल, मंदिराच्या टेकडीवर दाटीने झाडेझुडपे वाढतील.


तुम्ही आपल्या लोकांना तारण्यास व अभिषिक्तांना वाचविण्यासाठी बाहेर पडलात. तुम्ही दुष्ट भूमीच्या पुढाऱ्यांचा चुराडा केला आणि त्यांना डोक्यापासून पायांपर्यंत विवस्त्र केले. सेला


येशू त्यांना म्हणाले, “हे सर्व तुम्ही आता पाहत आहात ना? मी तुम्हाला खचित सांगतो की, एका दगडावर दुसरा दगड राहणार नाही. प्रत्येक दगड खाली पडेल.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan