Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मीखाह 1:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 पाहा! याहवेह त्यांच्या निवासस्थानातून बाहेर पडत आहेत. ते खाली उतरतात आणि पृथ्वीच्या उंच जागा तुडवितात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 कारण पाहा, परमेश्वर आपल्या स्थानाहून येतो, खाली उतरतो व पृथ्वीच्या उच्च स्थलांवर चालत जातो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 पाहा, परमेश्वर त्याच्या स्थानातून बाहेर येत आहे. तो खाली येणार व पृथ्वीवरील उच्चस्थानावर चालणार.

Faic an caibideil Dèan lethbhreac




मीखाह 1:3
15 Iomraidhean Croise  

जे अहंकारी आहेत त्या सर्वांकडे पाहा आणि त्यांना नम्र कर. दुष्ट जिथे उभे राहतात, तिथेच त्यांना पायाखाली तुडव.


आमचे परमेश्वर तर स्वर्गात आहेत; त्यांना जे योग्य वाटते, तेच ते करतात.


याहवेहचा हात या पर्वतावर राहील; परंतु जसे कडबा खतामध्ये तुडविला जातो, तसे मोआबी त्यांच्या भूमीत तुडविले जातील.


पाहा, पृथ्वीवरील लोकांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा देण्याकरिता, याहवेह त्यांच्या निवासस्थानातून बाहेर येत आहेत तिच्यावर झालेला रक्तपात पृथ्वी प्रगट करेल; तिच्यावर वधलेले यापुढे पृथ्वी लपवून ठेवणार नाही.


मग आत्म्याने मला वर उचलले आणि माझ्या पाठीमागून मोठ्या गर्जनेचा मी आवाज ऐकला, जेव्हा धन्य याहवेहचे वैभव आपल्या स्थानातून उठले.


ज्यांनी पर्वतांची रचना केली, ज्यांनी वारे निर्माण केले, आणि जे आपले विचार मानवजातीला प्रकट करतात, जे प्रभात समयाला अंधकारात बदलतात आणि पर्वताला आपल्या पायाखाली तुडवितात; याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर, हे त्यांचे नाव आहे.


प्रभू, सेनाधीश याहवेह— भूमीला स्पर्श करतात आणि ती विरघळून जाते, आणि त्यामध्ये राहणारे सर्व लोक शोक करतात. संपूर्ण देश नाईल नदीसारखा वर येतो आणि इजिप्तच्या नदीप्रमाणे खाली बुडतो;


सार्वभौम याहवेह माझे सामर्थ्य आहेत; मला उंची गाठण्यास समर्थ करण्यास ते माझी पावले हरणाच्या पावलांसारखी करतील. गायकवर्गाच्या संचालकास सूचना: हे कवन गाताना तंतुवाद्यांची साथ असावी.


त्या दिवशी त्यांचे पाय यरुशलेमच्या पूर्वेस असलेल्या जैतुनाच्या पर्वतावर उभे राहतील आणि जैतूनांचा पर्वत पूर्वपश्चिम दुभागून मध्ये एक मोठे खोरे निर्माण होईल, अर्धा पर्वत उत्तरेकडे व अर्धा पर्वत दक्षिणेकडे सरेल.


याहवेहने त्याला देशातील उंचीवर स्वार केले, आणि शेतातील फळे खायला दिली. खडकातून पाझरणारा मध, आणि डोंगर कपारीतून तेलाचा पौष्टिक आहार पुरविला,


इस्राएला, तू आशीर्वादित आहेस! इतर कोणत्या लोकांना याहवेहने वाचविले आहे काय? तेच तुझी ढाल व तुझे साहाय्य आहेत आणि तुझ्या वैभवाची तलवार आहेत. तुझे शत्रू तुझ्यापुढे थरथर कापतील, आणि तू त्यांची उच्च स्थाने पायाखाली तुडवशील!”


Lean sinn:

Sanasan


Sanasan