Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




मलाखी 1:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 परंतु मी एसावाचा द्वेष केला आणि त्याचा डोंगराळ प्रदेश टाकाऊ भूमी केला व त्याचे वतन रानातील कोल्ह्यांकरिता सोडले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 एसावाचा द्वेष केला, त्याचे पर्वत उजाड केले व त्याचे वतन रानातल्या कोल्ह्यांना दिले.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 आणि मी एसावचा स्वीकार केला नाही. मी त्याच्या डोंगरी प्रदेशांचा नाश केला. एसावच्या देशाचा नाश झाला, आता तिथे फक्त रानटी कोल्हे राहतात.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




मलाखी 1:3
26 Iomraidhean Croise  

याहवेहने तिला सांगितले, “तुझ्या उदरात दोन राष्ट्रे आहेत, तुझ्या उदरातील हे दोन वंश वेगळे होतील; एकजण दुसर्‍यापेक्षा बलवान होईल, मोठा लहान्याची सेवा करेल.”


तप्त झालेली वाळू एक जलाशय होईल, आणि तहानलेल्या जमिनीवर उफाळणारे झरे येतील. जिथे कधी कोल्हे निजले, त्या जागी बोरू व लव्हाळे यासहित गवत उगवेल.


परंतु मी एसावला पूर्णपणे विवस्त्र करेन; मी त्याची लपण्याची ठिकाणे उघडी करेन, म्हणजे तो स्वतःला गुप्त ठेऊ शकणार नाही. त्याचे शस्त्रधारी पुरुष, तसेच त्यांचे मित्रगण व शेजारीदेखील नष्ट झाले आहेत, म्हणून तिथे असे म्हणणारा कोणीही राहिलेला नाही,


एदोमविरुद्ध याहवेहचा संकल्प काय आहे ते ऐका. तेमानमध्ये राहणार्‍या लोकांविरुद्ध त्यांची काय योजना आहे, हे ऐकून घ्या. त्यांच्या कळपातील तरुणांना फरफटत ओढत नेण्यात येईल. त्यांच्या कुरणांना या दुर्दैवाने भयंकर धक्का बसेल.


हासोरात कोल्हे संचार करतील, ते कायमचे ओसाड होईल. तिथे पुन्हा कोणीही राहणार नाही; मनुष्य तिथे वस्ती करणार नाही.”


एदोम्यांविषयी: सर्वसमर्थ याहवेह असे म्हणतात: “तेमान प्रांतात आता शहाणपणा राहिलेला नाही का? शहाण्या मनुष्यातून बोध नाहीसा झाला आहे काय? त्यांच्यातील समंजसपणा क्षय पावला आहे काय?


ददान प्रदेशातील रहिवाशांनो, मागे वळा व पलायन करा, खोल गुहेत जाऊन लपा, कारण मी जेव्हा त्याला शिक्षा करेन, तेव्हा मी एसावावर अरिष्ट आणेन.


बाबिलोन भग्नावशेषाचा ढिगारा होईल, तिथे कोल्ह्यांचा संचार होईल, ते भयानकतेचा व तिरस्काराचा विषय होतील, जिथे कोणीही राहत नाही असे ठिकाण.


“मी यरुशलेमला उद्ध्वस्त करून त्याचा ढिगारा करेन, आणि त्यात कोल्ह्यांची विवरे होतील. यहूदीयातील नगरे उजाड करेन तिथे कोणीही वस्ती करू शकणार नाही.”


सीयोनकन्ये, तुझी शिक्षा संपेल, ते तुझा बंदिवास वाढविणार नाहीत. पण एदोम कन्ये, तुझ्या पापांची ते तुला शिक्षा देतील, आणि तुझी दुष्टता उघडकीस आणतील.


म्हणून सार्वभौम याहवेह असे म्हणतात: माझ्या उंचावलेल्या हाताने मी शपथ घेतो की, तुमच्या सभोवती असलेली राष्ट्रे देखील अपमान सहन करतील.


मी तुझ्याविषयी विचार करतो आणि मी तुझ्याकडे कृपादृष्टीने पाहीन; तुझ्यावर नांगरणी व पेरणी होईल,


इजिप्त देश उजाड होईल आणि एदोम देश ओसाड होईल, कारण त्यांनी यहूदीयाच्या लोकांवर अत्याचार केला त्यांच्या देशात त्यांनी निर्दोष रक्त पाडले आहे.


तुझा भाऊ याकोब याच्यावर केलेल्या अत्याचारामुळे, तू लाजेने झाकून जाशील; आणि तुझा कायमचा नाश करण्यात येईल.


“जो कोणी माझ्याकडे येतो आणि जर आपले आईवडील, पत्नी आणि मुले, भाऊ व बहिणी किंबहुना स्वतःच्या जिवाचाही द्वेष करणार नाही तर तो माझा शिष्य होऊ शकणार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan