Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 4:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 येशूंनी उत्तर दिले, “असे लिहिले आहे, ‘केवळ प्रभू तुझ्या परमेश्वरांनाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’ ”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 येशूने त्याला उत्तर दिले, “‘[अरे सैताना, माझ्या मागे हो, कारण,] परमेश्वर तुझा देव ह्याला नमन कर व त्याचीच सेवा कर,’ असे शास्त्रात लिहिले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे. प्रभू तुझा देव याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच सेवा कर.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

8 येशूने त्याला उत्तर दिले, “‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याला नमन कर व त्याचीच आराधना कर’, असे धर्मशास्त्रात लिहिले आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 4:8
14 Iomraidhean Croise  

आणि हिज्कीयाहने याहवेहला प्रार्थना केली: “अहो याहवेह इस्राएलांचे परमेश्वर, करुबांच्या सिंहासनावर आरूढ असलेल्या परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांचे तुम्ही एकमेव परमेश्वर आहात. स्वर्ग व पृथ्वी तुम्हीच उत्पन्न केली आहे.


त्यांना समजू द्या की, ज्यांचे नाव याहवेह आहे— तेच या समस्त पृथ्वीचे एकमेव परमश्रेष्ठ स्वामी आहेत.


उन्मताची नजर नमविली जाईल, आणि मनुष्याचा गर्व उतरविला जाईल; त्या दिवशी याहवेह एकटेच गौरविले जातील.


तेव्हा येशू पेत्राकडे वळून म्हणाले, “अरे सैताना, माझ्या दृष्टिआड हो! तू मला अडखळण आहे. तुझे मन परमेश्वराच्या गोष्टींकडे नाही, परंतु केवळ मनुष्याच्या गोष्टींकडे आहे.”


येशूंनी त्याला म्हटले, “अरे सैताना, माझ्यापासून दूर जा! असे लिहिले आहे: ‘केवळ प्रभू परमेश्वरालाच नमन कर आणि त्यांचीच सेवा कर.’”


पण येशूंनी उत्तर दिले, “असे लिहिले आहे: ‘मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही.’ ”


जर तू माझी उपासना करशील, तर हे सगळे तुझेच होईल.”


याहवेह तुमच्या परमेश्वराचे तुम्ही भय बाळगा, त्यांची सेवा करा, त्यांना बिलगून राहा आणि त्यांच्याच नावाने शपथ घ्या.


तुम्ही याहवेह आपल्या परमेश्वराचे भय बाळगावे, फक्त त्यांचीच सेवा करावी आणि त्यांच्याच नावाने शपथ वाहवी.


तुम्ही स्वतः परमेश्वराच्या अधीन व्हा. सैतानाचा विरोध करा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल;


विश्वासामध्ये दृढ उभे राहून त्याचा विरोध करा, कारण तुम्हाला माहीत आहे की, जगभरातील विश्वासी लोकांच्या कुटुंबांना अशाच प्रकारची दुःखे भोगावी लागत आहेत.


तेव्हा त्याला नमन करावे म्हणून मी त्याच्या पायांवर पडलो. पण त्याने मला म्हटले, “असे करू नको! कारण मी तुझ्यासारखा आणि येशूंवरील आपल्या विश्वासाची साक्ष देणार्‍या तुझ्या बांधवांसारखाच परमेश्वराचा एक सेवक आहे, परमेश्वरालाच नमन कर! कारण येशूंची साक्ष देणे हाच संदेशाचा आत्मा आहे.”


परंतु तो मला म्हणाला, “असे करू नकोस. संदेष्टे व या पुस्तकातील वचने पाळणारे लोक यांच्या सोबतीचा मी सेवकबंधू आहे. तू परमेश्वराची आराधना कर.”


आणि शमुवेल सर्व इस्राएली लोकांना म्हणाला, “जर तुम्ही तुमच्या संपूर्ण हृदयाने याहवेहकडे परत वळत आहात, तर तुम्ही अन्य दैवते व अष्टारोथचा त्याग करा; आणि याहवेहकडे चित्त लावून केवळ त्यांचीच सेवा करा; म्हणजे याहवेह तुम्हाला पलिष्ट्यांच्या हातातून सोडवतील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan