Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 4:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 तिथे चाळीस दिवस सैतानाने त्यांची परीक्षा घेतली. या दिवसांमध्ये त्यांनी काही खाल्ले नाही आणि ते संपल्यानंतर त्यांना भूक लागली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तेथे सैतानाने त्याची परीक्षा केली. त्या दिवसांत त्याने काही खाल्ले नाही. ते संपल्यावर त्याला भूक लागली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 तेथे सैतानाने त्याची चाळीस दिवस परीक्षा घेतली. त्या दिवसात येशूने काहीही खाल्ले नाही आणि ती वेळ संपल्यानंतर येशूला भूक लागली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 तेथे सैतानाने चाळीस दिवस त्याची परीक्षा घेतली. त्या दिवसांत त्याने काही खाल्‍ले नाही म्हणून ते दिवस संपल्यावर त्याला भूक लागली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 4:2
16 Iomraidhean Croise  

तू आणि स्त्री, तुझी संतती आणि तिची संतती यामध्ये मी शत्रुत्व निर्माण करेन; तिचे संतान तुझे मस्तक चिरडेल आणि तू त्याची टाच फोडशील.”


तेव्हा त्याने उठून अन्नपाणी घेतले. त्या अन्नाच्या शक्तीवर चाळीस दिवस व चाळीस रात्री प्रवास करीत होरेब, तो परमेश्वराच्या डोंगराकडे पोहोचला.


“जा, शूशन नगरातील सर्व यहूदी लोकांना एकत्र गोळा करून तुम्ही सर्वजण माझ्यासाठी उपवास करा. तीन दिवस आणि तीन रात्री अन्न किंवा पाणी पिऊ नका. मी आणि माझ्या दासीदेखील तुम्हासह उपवास करू. मग यानंतर, हे कायद्याविरुद्ध असले तरीही मी राजाला भेटण्यासाठी जाईन, आणि माझा नाश झाला तर होवो.”


मग मोशेने मेघांमधून पर्वतावर प्रवेश केला आणि तो तिथे चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला.


मोशे त्या ठिकाणी भाकरी न खाता किंवा पाणी न पिता चाळीस दिवस व चाळीस रात्र याहवेहबरोबर राहिला आणि त्याने पाट्यांवर कराराचे शब्द, म्हणजेच दहा आज्ञा लिहिल्या.


त्याने निनवेहमध्ये ही घोषणा केली: “राजा आणि त्याच्या सरदारांच्या आदेशानुसार: “कोणत्याही मनुष्याने किंवा पशूने, गुरे किंवा मेंढरांनी, काहीही चाखू नये; त्यांनी काहीही खाऊ किंवा पिऊ नये.


अगदी पहाटेच ते पुन्हा शहराकडे निघाले. रस्त्यात असताना येशूंना भूक लागली.


चाळीस दिवस व चाळीस रात्र त्यांनी उपवास केला, तेव्हा त्यांना भूक लागली.


सैतान येशूंना म्हणाला, “जर तू परमेश्वराचा पुत्र असशील, तर या दगडाला भाकर होण्यास सांग.”


तिथे याकोबाची विहीर होती. येशू, प्रवासाने थकलेले याकोबाच्या विहिरीजवळ बसले. ती भर दुपारची वेळ होती.


नंतर आणखी चाळीस दिवस व चाळीस रात्री मी याहवेहपुढे पालथा पडून राहिलो; मी भाकर खाल्ली नाही आणि पाणीदेखील प्यालो नाही, कारण याहवेहच्या दृष्टीने वाईट आहे, तेच पाप तुम्ही करून त्यांचा क्रोध भडकाविला होता.


म्हणूनच मी याहवेहपुढे चाळीस दिवस व चाळीस रात्र पालथा पडून राहिलो, कारण याहवेह म्हणाले होते की, ते तुमचा नाश करतील.


याहवेहने तुमच्याशी केलेल्या कराराच्या दगडी पाट्या स्वीकारण्यासाठी मी त्या पर्वतावर चढून गेलो होतो. तिथे मी चाळीस दिवस व चाळीस रात्री होतो; त्या काळात मी भाकर खाल्ली नाही आणि पाणीदेखील प्यालो नाही.


कारण त्यांनी स्वतःची परीक्षा होत असताना दुःख भोगले, त्याअर्थी आपलीही परीक्षा होत असताना आपल्याला साहाय्य करावयास ते समर्थ आहेत.


ते असे महायाजक नाहीत जे आपल्या दुर्बलतेविषयी सहानुभूती दर्शविण्यास असमर्थ आहे, परंतु असे आहेत जे सर्वप्रकारे आमच्यासारखेच पारखलेले होते तरी निष्पाप राहिले.


तो पलिष्टी मनुष्य चाळीस दिवस दररोज सकाळी व संध्याकाळी समोर येऊन उभा राहत असे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan