Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 2:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 योसेफसुद्धा दावीदाच्या घराण्यातील व वंशातील असल्यामुळे, तो यहूदीया प्रांतातील गालीलातील नासरेथ या दावीदाच्या गावी बेथलेहेम येथे वर गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालीलातील नासरेथ गावाहून वर यहूदीयातील दाविदाच्या बेथलहेम गावी गेला,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 मग योसेफसुद्धा गालील प्रांतातील नासरेथ गांवाहून यहूदीया प्रांतातील दाविदाच्या बेथलेहेम या गावी गेला कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

4 योसेफ हा दावीदच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालीलमधील नासरेथ गावाहून यहुदियातील दावीदच्या बेथलेहेम गावी गेला,

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 2:4
24 Iomraidhean Croise  

अशाप्रकारे राहेल मरण पावली आणि एफ्राथच्या (म्हणजे बेथलेहेमकडे) जाणार्‍या वाटेवर तिला मूठमाती देण्यात आली.


मी पद्दन-अराम येथून परत येत होतो आणि कनान देशात एफ्राथपासून थोड्याच अंतरावर होतो, तेव्हा राहेलच्या मृत्यूचे दुःख माझ्यावर पडले आणि मी तिला एफ्राथ गावाच्या थोड्या अंतरावर पुरले” (म्हणजे बेथलेहेम).


“परंतु, तू हे बेथलेहेम एफ्राथा, तू जरी यहूदीयाच्या वंशजांपैकी सर्वात लहान आहेस, तरी तुझ्यातून माझ्यासाठी इस्राएलचा शासक उदय पावेल, ज्याची उत्पत्ती प्राचीन काळातील आहे.”


परंतु हे त्याने ठरविल्यानंतर, प्रभूचा एक दूत त्याला स्वप्नात प्रकट झाला आणि म्हणाला, “दावीदाच्या पुत्रा योसेफा, आपली पत्नी म्हणून मरीयेला घरी नेण्यास भिऊ नकोस, कारण तिच्या गर्भामध्ये जो आहे तो पवित्र आत्म्याकडून आहे.


आणि ते नासरेथ या गावात राहिले. संदेष्ट्यांनी केलेले भविष्य पूर्ण झाले ते असे: “त्यांना नासरेथकर म्हणतील.”


तेव्हा प्रत्येकजण आपआपल्या गावी नोंदणी करण्यासाठी गेले.


नाव नोंदणीसाठी त्याने आपली भावी वधू मरीया हिला बरोबर घेतले कारण तिला लवकरच बाळ होणे अपेक्षित होते.


ज्या नासरेथ गावी त्यांची वाढ झाली होती, तिथे ते आले व नेहमीप्रमाणे शब्बाथ दिवशी आपल्या प्रथेप्रमाणे सभागृहामध्ये पवित्रशास्त्र वाचण्यासाठी उभे राहिले.


त्यावर नाथानाएलाने विचारले, “नासरेथ! तिथून काही चांगले निघू शकेल काय?” यावर फिलिप्पाने त्याला म्हटले, “तू ये आणि पाहा.”


शास्त्रलेख असे सांगत नाही का, दावीदाच्या कुळात, बेथलेहेममध्ये, जिथे दावीद राहिला तिथून ख्रिस्त येईल?”


त्या दोन्ही स्त्रिया बेथलेहेम येईपर्यंत चालत राहिल्या. जेव्हा त्या बेथलेहेम येथे पोहोचल्या, तेव्हा त्यांच्यामुळे ते संपूर्ण नगर गोंधळून गेले आणि स्त्रियांनी आश्चर्याने उद्गार काढले, “ही खरोखरच नाओमी आहे काय?”


त्याचवेळेस बवाज बेथलेहेमातून आला आणि कापणी करणार्‍यांचे क्षेमकुशल विचारले, तो म्हणाला, “याहवेह तुम्हाबरोबर असो!” त्यांनी प्रत्युत्तर दिले, “याहवेह तुम्हाला आशीर्वाद देवो!”


तेव्हा वडीलजन आणि वेशीत आलेले सर्व लोक म्हणाले, “होय, आम्ही साक्षीदार आहोत. राहेल आणि लेआ, ज्यांनी एकत्र मिळून इस्राएलचे कुटुंब तयार केले, त्याप्रमाणेच याहवेह आता तुझ्या घरात येत असलेल्या या स्त्रीचे करो. तुला एफ्राथामध्ये स्थान मिळो आणि तू बेथलेहेमात प्रसिद्ध व्हावेस.


तिथे राहणाऱ्या स्त्रिया म्हणाल्या, “आता नाओमीला मुलगा आहे!” आणि त्यांनी त्याचे नाव ओबेद ठेवले. जो इशायाचा पिता, जो दावीद राजाचा पिता होता.


याहवेह शमुवेलला म्हणाले, “मी शौलाला इस्राएलाचा राजा म्हणून नाकारले आहे, तर तू कुठवर त्याच्यासाठी शोक करीत राहणार? तुझे शिंग तेलाने भर आणि चल; मी तुला बेथलेहेमकर इशाय याच्याकडे पाठवित आहे. मी त्याच्या एका पुत्राला राजा म्हणून निवडले आहे.”


याहवेहने सांगितल्याप्रमाणे शमुवेलने केले. जेव्हा शमुवेल बेथलेहेमला पोहोचला, तेव्हा त्या नगराचे वडीलजन थरथर कापत त्यांना भेटले. त्यांनी विचारले, “आपण शांतीने आला आहात काय?”


दावीद यहूदीयातील बेथलेहेम येथील एफ्राथी गोत्रातील इशायाचा पुत्र होता. इशायला आठ पुत्र होते आणि शौल राजाच्या कारकिर्दीत तो खूप वृद्ध झाला होता.


शौलाने दावीदाला विचारले, “हे तरुणा, तू कोणाचा पुत्र आहेस?” दावीद म्हणाला, “आपला सेवक इशाय बेथलेहेमकर याचा मी पुत्र आहे.”


जर माझी अनुपस्थिती तुझ्या पित्याला जाणवली, तर त्यांना सांग, ‘दावीदाला त्याच्या गावाकडे, बेथलेहेमकडे तातडीने जायचे होते, कारण त्याच्या संपूर्ण कुळासाठी वार्षिक यज्ञ आहे.’


Lean sinn:

Sanasan


Sanasan