Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 2:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 ही पहिली जनगणना क्विरीनिय हा सीरियाचा राज्यपाल असताना घेण्यात आली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 क्‍विरीनिय हा सूरियाचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 ही पहिली नावनोंदणी होती जेव्हा क्वीरीनिय हा सिरीया प्रांताचा राज्यपाल होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 क्विरीनिय हा सूरियाचा राज्यपाल असताना ही पहिली नावनोंदणी झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 2:2
9 Iomraidhean Croise  

त्याचा वृतांत गालील प्रांताच्या सीमेपलीकडेही पसरत गेला. त्यामुळे सीरियासारख्या दूरदूरच्या ठिकाणाहूनही आजारी लोक बरे होण्यासाठी त्यांच्याकडे येऊ लागले. कसल्याही प्रकारचा आजार किंवा वेदना झालेले, भूतग्रस्त किंवा झटके येत असलेले, तसेच पक्षघात झालेले लोक, या सर्वांना त्यांनी बरे केले.


त्या दिवसात कैसर औगुस्ताने सर्व जगातील रोमी लोकांची शिरगणती करावी असा हुकूम काढला.


तेव्हा प्रत्येकजण आपआपल्या गावी नोंदणी करण्यासाठी गेले.


तिबिर्य कैसराच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी—ज्यावेळी पिलात यहूदीयाचा राज्यपाल होता, हेरोद गालील प्रांताचा, त्याचा भाऊ फिलिप्प इतुरीया व त्राखोनीतीचा आणि लूसनिया अबिलेनेचा शासक होता.


सेर्गियोस पौलुस नावाच्या राज्यपालाचा तो एक सेवक होता. सेर्गियोस पौलुस हा बुद्धिमान व ज्ञानी मनुष्य होता. या राज्यपालाने बर्णबा व शौलना बोलाविले, कारण परमेश्वराचे वचन ऐकण्याची त्याची इच्छा होती.


गल्लियो अखया प्रांताचा राज्यपाल झाला, तेव्हा पौलाला तिथून घालवून द्यावे म्हणून करिंथ येथील यहूद्यांनी एकजूट होऊन त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला न्यायालयात आणले.


महाराज, राज्यपाल फेलिक्स यास: क्लौडियस लुसियाचा: सलाम.


तेव्हा राजा, राज्यपाल, बर्णीका व इतर सर्वजण जाण्यासाठी उभे राहिले.


त्याच्यानंतर शिरगणतीच्या वेळी, गालीलकर यहूदाह पुढे आला आणि त्याने एका टोळीस बंडास प्रवृत्त केले. परंतु तो सुद्धा मारला गेला आणि त्याच्या अनुयायांचीही पांगापांग झाली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan