Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 1:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 सन्माननीय थियफिल, तुमच्यासाठी एक अचूक व अधिकृत वृतांत लिहून काढावा, हे मनात ठेऊन मी स्वतःसुद्धा प्रत्येक गोष्टीचा अगदी सुरुवातीपासून बारकाईने व काळजीपूर्वक शोध केला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ह्यास्तव, थियफील महाराज, मलाही वाटले की, सर्व गोष्टींचा मुळापासून नीट शोध केल्यामुळे मी त्या आपल्याला अनुक्रमाने लिहाव्यात;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 म्हणून हे थियफिला महाराज, मी सर्व गोष्टींचा मुळापासून चांगला शोध केल्यामुळे मलाही हे बरे वाटले की, या सर्व घटनांविषयीची माहिती आपणाला व्यवस्थित पणे माहिती लिहावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

3 म्हणूनच, महाशय, ह्या सर्व माहितीचा मुळापासून काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतर मी विचार केला की, त्या आपणासाठी व्यवस्थितपणे लिहून काढणे उचित ठरेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 1:3
17 Iomraidhean Croise  

याहवेह, माझ्या परमेश्वरा, तुम्ही अनेक चमत्कार केलेले आहेत; आमच्यासाठी तुम्ही केलेल्या योजनेची तुलना करता येत नाही; त्याबद्दल बोलावयाचे झाले तर त्यांची मोजदाद करता येणार नाही.


तुम्ही हे करीत असता मी गप्प राहिलो, तेव्हा तुम्हाला वाटले की मी तुमच्यासारखाच आहे, परंतु आता तुम्हाला शासन करण्याचा काळ आला आहे; तुमचे आरोप मी तुमच्यापुढे ठेवणार.


प्रामाणिक असणे आणि सत्य बोलणे तुला शिकविले नाही काय म्हणजे ज्यांच्याकडे तू काम करतोस त्यांच्यासाठी खरा अहवाल आणू शकशील?


उपदेशक केवळ सुज्ञच नाही, तर त्याने लोकांनाही विद्या शिकवली. त्याने विचार करून शोध केला आणि अनेक म्हणी रचल्या.


आम्हामध्ये ज्या घटना घडल्या त्यांचा वृतांत संग्रहित करण्याचे काम अनेकांनी हाती घेतले.


थियफिल महोदय, मी माझ्या पहिल्या ग्रंथात, येशूंनी जे कार्य करण्यास आणि शिक्षण देण्यास सुरुवात केली त्या दिवसापासून,


त्यावर पेत्राने सुरुवातीपासून, सर्वगोष्टी सविस्तर सांगितल्या:


“माझा न्याय असा आहे की, जे गैरयहूदी परमेश्वराकडे वळत आहेत, त्यांच्यासाठी कठीण होईल असे आपण करू नये.


तेव्हा आम्ही सर्वांनी ठरविले की आमचे प्रिय बंधू बर्णबा व पौल यांच्याबरोबर काही जणांना निवडून तुमच्याकडे पाठवावे.


पवित्र आत्म्याला आणि आम्हाला हेच योग्य वाटले की, ज्या आवश्यक गोष्टींशिवाय तुमच्यावर ओझे टाकले जाऊ नये त्या अशा आहेत:


अंत्युखियामध्ये थोडा काळ घालविल्यानंतर, तिथून पौल बाहेर पडला आणि गलातीया व फ्रुगिया या प्रांतामधून ठिकठिकाणी प्रवास करीत तेथील सर्व शिष्यांना त्याने प्रोत्साहित केले.


महाराज, राज्यपाल फेलिक्स यास: क्लौडियस लुसियाचा: सलाम.


यामुळे आम्ही सर्वठिकाणी आणि प्रत्येक प्रकारे कृतज्ञतेने व मनापासून स्वागत करतो आणि श्रेष्ठ फेलिक्स आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत.


परंतु पौलाने उत्तर केले, “अत्यंत थोर फेस्त महाराज, मी वेडा नाही, मी सत्य व वैचारिकदृष्ट्या योग्य तेच सांगत आहे.


आता बंधू अपुल्लोसासंबंधी: त्याने बंधुजनांबरोबर तुमच्याकडे येण्याची मी त्याला खूप विनंती केली. परंतु आताच तुम्हाकडे यावे अशी त्याची मुळीच इच्छा नव्हती, परंतु संधी मिळेल तेव्हा तो येईल.


पण माझ्या मते ती जशी आहे तशी राहिली तर ती अधिक सुखी होईल—आणि मला असे वाटते की माझ्यातही परमेश्वराचा आत्मा वास करतो.


जर तू या गोष्टी बंधू भगिनींना समजावून सांगितल्या, तर विश्वासाच्या वचनांनी आणि ज्या चांगल्या शिक्षणाला तू अनुसरले आहेस तसे पोषण होत असलेला ख्रिस्त येशूंचा चांगला सेवक होशील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan