Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लूककृत शुभवर्तमान 1:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 या घटनांचे वृतांत प्रत्यक्षात स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या प्रथम साक्षीदारांनी व परमेश्वराच्या वचनाची सेवा करणार्‍यांनी आमच्याकडे सोपविलेले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 ह्यांनी आम्हांला सांगून ठेवलेला वृत्तान्त लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्यांनी त्या जशा आम्हास सोपवून दिल्या त्या तशाच सांगाव्या म्हणून त्यांविषयीचा वृत्तांत अनुक्रमाने लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

2 ज्यांनी ह्या गोष्टी सुरुवातीपासून प्रत्यक्ष पाहिल्या व हा संदेश प्रसारित केला, त्यांनी सांगितल्याप्रमाणे हे लिहिण्याचे काम करण्यात आले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लूककृत शुभवर्तमान 1:2
25 Iomraidhean Croise  

परमेश्वराचे पुत्र येशू ख्रिस्त, यांच्याबद्दलच्या शुभवार्तेचा प्रारंभ.


मग शिष्य सर्वत्र संदेश सांगत फिरले, प्रभू त्यांच्याबरोबर कार्य करीत होते आणि जी चिन्हे झाली त्यावरून त्यांचे वचन सत्य असल्याची खात्री होत होती.


शेतकरी वचनाची पेरणी करतो.


तुम्ही या सर्व गोष्टींचे साक्षी आहात.


परंतु तुम्हीदेखील साक्ष दिलीच पाहिजे, कारण आरंभापासून तुम्ही मजबरोबर राहिला आहात.


मी तुम्हाला हे सांगत आहे, ते यासाठी की जेव्हा ते घडेल, तेव्हा तुम्हाला आठवेल की मी आधी तुम्हाला त्यासंबंधी इशारा दिला होता. मी या गोष्टी यापूर्वी तुम्हाला सांगितल्या नाहीत, कारण मी प्रत्यक्ष तुम्हाबरोबर होतो,


त्यांचे क्लेश संपल्यानंतर, त्यांनी आपण जिवंत आहोत हे पुष्कळ खात्रीलायक पुराव्यांनी सिद्ध केले. चाळीस दिवसांच्या काळात ते स्वतः त्यांना प्रकट झाले आणि परमेश्वराच्या राज्यासंबंधी बोलले.


परंतु जेव्हा पवित्र आत्मा तुम्हावर येईल तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि तुम्ही यरुशलेममध्ये आणि सर्व यहूदीयात आणि शोमरोनात आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत माझे साक्षीदार व्हाल.”


आणि पेर्गा येथे वचनाचा प्रचार केल्यानंतर ते खाली अत्तलिया येथे गेले.


त्यानंतर पौल आणि त्याचे सहकारी यांनी फ्रुगिया आणि गलातीया प्रांतातून सगळीकडे प्रवास केला, कारण आशिया प्रांतात जाऊन परमेश्वराच्या वचनाचा प्रचार करू नये असे पवित्र आत्म्याकडून त्यांना सांगण्यात आले होते.


आता बिरुया येथील यहूदी थेस्सलनीकातील लोकांपेक्षा थोर चरित्राचे होते, त्यांनी संदेश मोठ्या उत्सुकतेने ऐकला पौलाची विधाने खरी आहेत की नाहीत, हे ते प्रतिदिवशी वचनांची तपासणी करून पाहात असत.


आता उठून आपल्या पायांवर उभा राहा. मी तुला यासाठी दर्शन दिले आहे की जे तू माझ्याविषयी पाहिले व जे प्रकट होणार आहे त्याविषयी तुला सेवक व साक्षी नेमावे.


ज्यागोष्टी आम्ही पाहिल्या आणि ऐकल्या आहेत, त्याबद्दल सांगण्याचे आम्ही थांबविणार नाही.”


आता जे पांगलेले होते त्यांनी जिथे कुठे ते गेले तिथे शुभवार्तेच्या वचनाचा प्रसार केला.


की गैरयहूदीयांसाठी मी ख्रिस्त येशूंचा सेवक व्हावे. त्यांनी मला परमेश्वराची शुभवार्ता जाहीर करण्यासाठी याजकपण सोपविले आहे, यासाठी की गैरयहूदीयांना पवित्र आत्म्याने वेगळे केलेले व परमेश्वराला ग्रहणीय यज्ञ म्हणून अर्पण करावे.


ख्रिस्ताचे सेवक आणि परमेश्वराने जे गुप्त रहस्य प्रकट केले आहे त्याचे कारभारी असे आम्हाला समजावे.


ज्या तारणाची प्रभूने प्रथम घोषणा केली आणि ऐकणार्‍यांनी आम्हाला पुष्टी दिली, त्या महान तारणाची आपण उपेक्षा केली, तर आपण कसे निभावू?


तुमच्यामध्ये जे वडील आहेत त्यांना मी एक सहवडील आणि ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी, तो मी सुद्धा पुढे प्रकट होणार्‍या गौरवाचा वाटेकरी असेन, हा बोध करतो:


चातुर्याने कल्पिलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य आणि आगमन यासंबंधाने कळविले होते असे नाही, परंतु आम्ही त्यांच्या वैभवाचे साक्षी आहोत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan