Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 8:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 नंतर त्याने अहरोनाला ऊरस्त्राण घातले व त्यात उरीम व थुम्मीम ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मग त्याने त्याच्यावर ऊरपट बांधला आणि त्याच्यात उरीम व थुम्मीम ठेवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग मोशेने त्याच्यावर ऊरपट बांधला आणि त्याच्यात उरीम व थुम्मीम ठेवले;

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 8:8
13 Iomraidhean Croise  

राज्यपालांनी उरीम व थुम्मीम यांचा उपयोग करताना इतर याजक असल्याशिवाय त्यांना अर्पणांतील अन्नाचा याजकांचा वाटा घेण्यास परवानगी दिली नाही.


यास्तव राज्यपालांनी उरीम व थुम्मीम यांचा उपयोग करताना इतर याजक असल्याशिवाय त्यांना अर्पणातील अन्नाचा याजकांचा वाटा घेण्यास परवानगी दिली नाही.


“त्यांनी याजक या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्यांना पवित्र करण्यासाठी असेच करावे: एक निर्दोष गोर्‍हा व दोन मेंढे घ्यावेत.


तू मला आपल्या हृदयावर मोहर लावल्याप्रमाणे ठेव, मुद्रेप्रमाणे आपल्या भुजांवर मला ठेव; कारण मृत्यूप्रमाणेच प्रीती प्रबळ आहे, तिचा हेवा कबरेप्रमाणे आहे. तिचे उद्रेक अग्निज्वालेप्रमाणे उसळतात, ते खरोखर आगीचे लोळच असतात.


त्यांनी नीतिमत्वास त्यांचे चिलखत म्हणून चढविले आणि त्यांच्या मस्तकावर तारणाचे शिरस्त्राण घातले; सूडरूपी वस्त्र परिधान केला आवेश हा अंगरखा म्हणून स्वतःला पांघरले.


त्याने एलअज़ार याजकापुढे उभे राहावे, जो याहवेहसमोर उरीमविषयी विचारेल. त्याच्या आज्ञेनुसार तो व सर्व इस्राएली समाज बाहेर जाईल व त्याच्या आज्ञेनुसार आत येतील.”


म्हणून सत्यरूपी कमरबंदाने आपली कंबर बांधा, नीतिमत्वाचे ऊरस्त्राण घेऊन स्थिर उभे राहा.


मग तो लेवी विषयी म्हणाला: “तुमचे उरीम व थुम्मीम, तुमच्या विश्वसनीय लोकांच्या अधिकारात कायम राहोत. ज्यांची तुम्ही मस्सा येथे परीक्षा घेतली; आणि मरीबाहच्या झर्‍याजवळ तुम्ही त्यांच्याशी झुंज दिली.


परंतु जे आपण दिवसाचे आहोत, ते आपण संयमी असावे, विश्वास आणि प्रीतीचे चिलखत धारण करावे आणि तारणाची आशा हे शिरस्त्राण धारण करावे.


माझे याजक व्हावे, धूप जाळावे, माझ्या वेदीकडे जावे व माझ्या समक्षतेत एफोद घालावा म्हणून इस्राएलच्या सर्व गोत्रांतून मी तुझ्या पूर्वजांना निवडले. त्याचप्रमाणे इस्राएल लोकांनी दिलेले सर्व अन्नार्पण मी तुझ्या पूर्वजांच्या कुटुंबांला दिले.


शौलाने याहवेहला विचारले, परंतु याहवेहने त्याला स्वप्ने किंवा उरीम किंवा संदेष्टे या कोणत्याही द्वारे उत्तर दिले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan