Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 8:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 त्याने अहरोनास अंगरखा घातला, कंबरपट्टा कसला, झगा घातला, झग्यावर एफोद घातले, एफोदावर सुशोभित केलेला कमरबंद त्याच्या सभोवती बांधला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मग त्याने त्याला अंगरखा घातला, कमरेला कमरबंद कसला, झगा घातला, त्याच्यावर एफोद घातले आणि एफोदावर कुशलतेने विणलेली पट्टी आवळली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 मग त्याने अहरोनाला विणलेला सदरा घातला, त्याच्या कमरेला कमरबंद बांधला; मग त्यास झगा घातला, नंतर त्याच्यावर एफोद चढवला आणि त्यावर कुशलतेने विणलेली पट्टी आवळून बांधली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 8:7
12 Iomraidhean Croise  

अहरोन तुझा भाऊ याला सन्मान आणि गौरव मिळावा म्हणून त्याच्यासाठी पवित्र वस्त्रे तयार करावी.


त्यांनी जी वस्त्रे बनवावी ती ही: ऊरपट, एफोद, एक झगा, भरतकाम केलेला अंगरखा, फेटा व कमरबंद. त्यांनी ही पवित्र वस्त्रे तुझा भाऊ अहरोन व त्याच्या पुत्रांसाठी बनवावी, यासाठी की याजक म्हणून त्यांनी माझी सेवा करावी.


“एफोद सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि बारीक कातलेल्या रेशमी तागाचा, कुशल कारागिराच्या हातांनी बनवा.


वस्त्रे घ्या आणि अहरोनास अंगरखा व त्याबरोबर एफोदाचा झगा, एफोद, ऊरपट हे परिधान करावे. त्यावर कुशलतेने विणलेल्या कमरपट्ट्याने एफोद बांधावा;


मी याहवेहमध्ये अत्यानंदित होतो; माझा आत्मा माझ्या परमेश्वरात हर्षोल्हासित होतो. जसे वराचे मस्तक याजकाप्रमाणे विभूषित केले जाते, किंवा वधू दागिन्यांनी स्वतःला अलंकृत करते, तशी त्यांनी मला तारणाची वस्त्रे नेसविली आहेत आणि नीतिमत्वाच्या अंगरख्याने मला आच्छादले आहे.


सीयोनातील जे सर्व शोक करतात त्यांना— राखेऐवजी सौंदर्याचा मुकुट, विलापाऐवजी आनंदाचे तेल, निराशेच्या आत्म्याऐवजी स्तुतीचे वस्त्र बहाल करण्यासाठी. कारण त्यांचे गौरव प्रकट करण्यासाठी ते नीतिमत्तेचे एला वृक्ष याहवेहने स्वतः रोपलेले असे संबोधले जातील.


जेव्हा कधी याजक पवित्रस्थानात प्रवेश करतात, तेव्हा जी वस्त्रे घालून ते सेवा करतात ती पवित्रस्थानात ठेवल्याशिवाय त्यांनी बाहेरील अंगणात जाऊ नये, कारण ती पवित्र वस्त्रे आहेत. लोकांकडे जाण्यासाठी ठरलेल्या ठिकाणी जाण्याअगोदर याजकांनी दुसरी वस्त्रे घालावी.”


यापेक्षा, प्रभू येशू ख्रिस्तांना परिधान करा व देहाच्या वासनांचा उपभोग घेण्याचा विचार करू नका.


परमेश्वराचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणार्‍यांना दिले आहे, त्यात यहूदी व गैरयहूदी असा भेद केलेला नाही,


ज्या आपण सर्वांनी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे, त्या आपण ख्रिस्ताला परिधान केले आहे.


माझे याजक व्हावे, धूप जाळावे, माझ्या वेदीकडे जावे व माझ्या समक्षतेत एफोद घालावा म्हणून इस्राएलच्या सर्व गोत्रांतून मी तुझ्या पूर्वजांना निवडले. त्याचप्रमाणे इस्राएल लोकांनी दिलेले सर्व अन्नार्पण मी तुझ्या पूर्वजांच्या कुटुंबांला दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan