Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 8:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने केले आणि सर्व लोक सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र जमले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले; आणि मंडळी दर्शनमंडपाच्या दाराजवळ जमली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मोशेने केले. मंडळी दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वाराशी जमली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 8:4
19 Iomraidhean Croise  

पवित्रस्थानातील सेवेसाठी त्यांनी निळे, जांभळे व किरमिजी रंगाच्या सुताची विणलेली वस्त्रे बनविली. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे अहरोनासाठी सुद्धा त्यांनी पवित्र वस्त्रे बनविली.


त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या दोरीने कमरबंदाला अशा बांधाव्या की ऊरपट एफोदावरून सरकणार नाही; हे त्यांनी याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे केले.


याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे सेवा करण्यासाठी घालावयाच्या झग्याच्या घेराच्या काठावर घंट्या व डाळिंबे एक सोडून एक असे आळीपाळीने लावले.


कातलेल्या रेशमी तागाचा आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे भरतकाम केलेला कमरबंद होता; जसे याहवेहने मोशेला आज्ञापिले होते.


कुशलतेने विणलेला कमरबंद त्याच्यासारखाच होता; एफोदाशी अखंड असा तो सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा व कातलेल्या रेशमी तागाचा, याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे तो बनविला होता.


मग त्यांनी इस्राएलच्या पुत्रांचे स्मारक म्हणून ती रत्ने एफोदाच्या दोन खांदेपट्ट्यांवर लावली, याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे त्यांनी हे केले.


मग मोशेने अहरोनाच्या पुत्रांना पुढे आणले, त्यांना झगे घातले, कमरपट्टे कसले व फेटे बांधले, याहवेहने मोशेला आज्ञा दिल्यानुसार त्याने हे केले.


याहवेहने आज्ञा दिल्याप्रमाणे मोशेने गोर्‍हा, त्याची कातडी, त्याचे मांस आणि आतडी छावणीबाहेर नेऊन जाळून टाकले.


मग मोशेने मेंढ्याच्या उराचा भाग घेतला, हा समर्पणाच्या गोर्‍ह्याचा त्याचा स्वतःचा वाटा होता, तो त्याने ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसमोर ओवाळले. याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मोशेने हे केले.


आणि सर्व लोकांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ एकत्र कर.”


शिवाय, सात दिवस सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ रात्रंदिवस राहून, याहवेहने दिलेल्या आज्ञेचे पालन केल्याने तुम्ही मरणार नाही, कारण मला अशी आज्ञा देण्यात आली आहे.”


तेव्हा मोशेने सर्व लोकांना म्हटले, “याहवेहने जे करण्यास आज्ञा दिली आहे, ते हेच आहे.”


नंतर त्याच्या डोक्यावर फेटा बांधला. त्या फेट्याच्या पुढील भागी सोन्याची एक पट्टी म्हणजे पवित्र मुद्रा जोडली, याहवेहने मोशेला आज्ञा दिल्यानुसार त्याने हे केले.


आणि मी तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांना सर्वकाही पाळावयास शिकवा आणि मी सदैव, युगाच्या अंतापर्यंत तुमच्याबरोबर आहे.”


जे मला प्रभूपासून प्राप्त झाले ते मी तुम्हाला सोपवून दिले आहे: ज्या रात्री प्रभू येशूंचा विश्वासघात करण्यात आला, त्या रात्री त्यांनी भाकर घेतली,


प्रथम महत्त्वाचे म्हणजे जे मी स्वीकारले तेच तुम्हाला सांगत आलो आहे आणि ते म्हणजे वचनांनुसार: ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावले.


मी देत असलेल्या सर्व आज्ञांचे तुम्ही पालन करावे; त्यात काहीही भर घालू नये किंवा त्यातून काही कमी करू नये.


Lean sinn:

Sanasan


Sanasan