Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 7:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 “परंतु यज्ञबलीचे अर्पण नवसाचे अथवा स्वैच्छिक असेल, तर अर्पणातील भाग त्या दिवशीच खावे, पण उरलेले भाग दुसर्‍या दिवशी खाण्यास हरकत नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 पण यज्ञबलीचे अर्पण नवसाचे अथवा स्वखुशीचे असेल तर ज्या दिवशी ते तो अर्पण करील त्या दिवशी ते खावे; आणि जे काही त्यातले उरेल ते दुसर्‍या दिवशीही खावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 यज्ञबलीचे अर्पण नवसाचे किंवा स्वखुशीचे असेल तर ज्या दिवशी तो ते अर्पील त्यादिवशीच त्याने ते खावे आणि जर त्यातून काही उरेल तर त्याने दुसऱ्या दिवशीही खावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 7:16
17 Iomraidhean Croise  

मी याहवेहस केलेले नवस त्यांच्या सर्व लोकांसमक्ष जाहीर रीतीने फेडीन.


मी याहवेहस केलेले नवस त्यांच्या सर्व लोकांसमक्ष जाहीर रीतीने फेडीन.


मी तुमच्या मंदिरात होमार्पणे घेऊन, माझे नवस फेडण्यासाठी येणार आहे—


याहवेहने मोशेद्वारे जे काम आज्ञापिले होते त्यासाठी इस्राएली लोकांमधील सर्व इच्छुक पुरुष व स्त्रियांनी याहवेहकरिता स्वखुशीने अर्पणे आणली.


आज मी माझी वचने पूर्ण केली आहेत, आणि माझ्या घरी शांत्यर्पण आहे.


“ ‘जेव्हा राजपुत्र याहवेहला स्वैच्छिक अर्पण आणतो; ते होमार्पण असो वा शांत्यर्पण; त्याच्यासाठी पूर्वेकडील द्वार उघडावे. तो करतो त्याचप्रमाणे त्याचे होमार्पण किंवा शांत्यर्पण तो शब्बाथ दिवशी करेल. मग तो बाहेर जाईल आणि तो बाहेर गेल्यानंतर, द्वार बंद केले जाईल.


तुम्ही एखाद्या गोर्‍ह्याला किंवा मेंढ्याला, एखादा अवयव जास्त वा कमी असेल, तर तो प्राणी स्वखुशीचे अर्पण म्हणून चालेल, पण शपथपूर्तीचे अर्पण म्हणून तो अर्पण करता येणार नाही.


“ज्यावेळी तुम्ही याहवेहला उपकारस्तुतीच्या बलीचा यज्ञ करता तेव्हा अशा प्रकारे करावा की तो तुमच्यावतीने मान्य व्हावा.


ही अर्पणे याहवेहच्या शब्बाथांच्या व्यतिरिक्त आहेत आणि हे यज्ञ तुम्ही परमेश्वराला अर्पण करता त्या तुमच्या देणग्या आणि नवस फेडावयाची अर्पणे आणि स्वैच्छिक अर्पणे त्या व्यतिरिक्त आहेत.)


पाहा, पर्वतांवरून संदेशवाहक येत आहेत, ज्यांची पावले एक शुभवार्ता आणत आहेत, जे शांतीची घोषणा करतात! हे यहूदाह, तू तुझे सण साजरे कर, आणि तुझे नवस फेड. कारण आता कोणी दुष्ट लोक तुझ्यावर आक्रमण करणार नाहीत; त्यांचा कायमचा उच्छेद होईल.


आणि याहवेहसाठी सुवास म्हणून आपली खिल्लारे व गुरे यातून तुम्ही याहवेहसाठी अन्नार्पण कराल, मग ते होमार्पण किंवा यज्ञ असो, विशेष नवस असो किंवा स्वखुशीचे अर्पण किंवा सणाचे अर्पण असो.


तेव्हाच तुम्ही तुमची सर्व होमार्पणे, यज्ञार्पणे, दशांश, नवसाची अर्पणे व स्वेच्छार्पणे—याहवेह तुमचे परमेश्वर स्वतःच्या नावाचे निवासस्थान म्हणून ज्या ठिकाणाची निवड करतील तिथे आणावीत.


धान्य, द्राक्षारस व तेलाचे दशांश, गुरांचे प्रथमवत्स, नवसफेडीच्या वस्तू, स्वेच्छार्पणे व इतर अर्पणे या परमेश्वराला वाहिलेल्या अर्पणातून काहीही आपल्या नगरात खाऊ नये.


परंतु जी पवित्र अर्पणे करावयाची असतील व नवसाची दाने द्यावयाची असतील, ती घेऊन तुम्ही याहवेह जे स्थान निवडील, त्या स्थानी जावे.


तिथेच तुम्ही आपली होमार्पणे, यज्ञार्पणे, तुमचे दशांश व विशेष भेटी, नवस फेडण्यासाठी आणलेली अर्पणे आणि तुमची स्वेच्छार्पणे आणि तुमच्या गुरांची व शेरडामेंढरांची प्रथम वत्सांची अर्पणे आणावीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan