Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 7:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 “उपकारस्तुती म्हणून केलेल्या शांत्यर्पणात तेल लावलेल्या बेखमीर जाड भाकरी, बेखमीर व वरून तेल लावलेल्या पातळ पापड्या, नीट मळलेल्या व तेल मिसळलेल्या उत्तम पिठाच्या जाड भाकरी असाव्यात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 त्याला ते उपकारस्तुतीसाठी करायचे असेल तर तेलात मळलेल्या बेखमीर पोळ्या, तेल लावलेल्या बेखमीर चपात्या आणि तेलात मळलेल्या सपिठाच्या तळलेल्या पोळ्या उपकारस्तुतीच्या यज्ञासहित अर्पाव्यात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 त्यास तो शांत्यर्पणाचा यज्ञ उपकारस्तुतीसाठी करावयाचा असेल तर त्याने तेलात मळलेल्या, बेखमीर पोळ्या, तेल लावलेल्या बेखमीर चपात्या आणि तेलात मळलेल्या सपिठाच्या तळलेल्या पोळया उपकारस्तुतीच्या यज्ञासोबत अर्पाव्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 7:12
25 Iomraidhean Croise  

तेव्हा हिज्कीयाह म्हणाला, “तुम्ही आता स्वतःला याहवेहना समर्पित केले आहे. या आणि याहवेहच्या मंदिरात बलिदाने आणि उपकारस्तुतीची अर्पणे आणा.” म्हणून जमलेल्या लोकांनी बलिदाने आणि उपकारस्तुतीची अर्पणे आणली आणि ज्या सर्वांची अंतःकरणापासून इच्छा होती त्यांनी होमार्पणे आणली.


नंतर त्याने याहवेहची वेदी पुनर्स्थापित केली आणि त्यावर शांत्यर्पणे आणि उपकारस्तुतीची अर्पणे केली आणि यहूदीयाला सांगितले की, त्यांनी इस्राएलचे परमेश्वर याहवेहचीच यांचीच सेवा करावी.


या आनंदाच्या दिवशी अनेक मोठमोठी अर्पणे करण्यात आणली, कारण परमेश्वराने त्यांना फार मोठा हर्ष दिला होता. स्त्रिया व मुलांनी देखील आनंद व्यक्त केला. यरुशलेममधील लोकांच्या आनंदाचे निनाद दूरवर ऐकू आले.


याहवेहच्या या अक्षय प्रीतीबद्दल व त्यांनी सर्व मनुष्यास्तव केलेल्या अद्भुतकार्याबद्दल ते त्यांचे उपकारस्मरण करोत.


मी तुम्हाला उपकारस्तुतीचे अर्पण करेन, आणि याहवेहच्या नामाचा धावा करेन.


जो कोणी उपकारस्तुतीचा यज्ञ करतो तो माझे गौरव करतो आणि जो कोणी आपले आचरण यथायोग्य ठेवतो, त्याला मी परमेश्वराचे तारण दाखवेन.”


आनंद व हर्षाचे स्वर, वरांचे आणि वधूंचे आवाज आणि याहवेहला उपकारस्तुतीची अर्पणे आणणार्‍यांची हर्षगीते पुन्हा ऐकू येतील. ते म्हणतील, “याहवेहला धन्यवाद द्या, कारण ते चांगले आहेत; त्यांची प्रीती सर्वकाळ टिकते.” मी हा देश आधी होती तशी समृद्धी परत देऊन पुनर्वसित करेन,’ याहवेह असे म्हणतात.


परमेश्वराच्या वचनांचे पालन कर आणि याहवेहकडे परत ये. त्यांना सांगा: “आमच्या सर्व पापांची क्षमा करा, आणि कृपापूर्वक आमचा स्वीकार करा, म्हणजे आम्ही आमच्या ओठांची फळे वासराच्या अर्पणाप्रमाणे अर्पण करू.


“ ‘जर तुम्ही भट्टीत भाजलेले अन्नार्पण आणता, तर ते उत्तम पिठाचे असावे: बेखमीर जाड भाकरी आणि जैतुनाच्या तेलात मळलेल्या किंवा पातळ बेखमीर भाकरी आणि वर जैतुनाचे तेल लावलेले असे असावे.


जर तुमचे अन्नार्पण तव्यावर भाजलेले असेल तर ते उत्तम पिठापासून तयार केलेले तेलात मिसळलेले आणि बेखमीर असे असावे.


“ज्यावेळी तुम्ही याहवेहला उपकारस्तुतीच्या बलीचा यज्ञ करता तेव्हा अशा प्रकारे करावा की तो तुमच्यावतीने मान्य व्हावा.


उर्वरित भाग अहरोन आणि त्याचे पुत्र खातील, परंतु त्यांनी ते खमीर न घालता पवित्रस्थानात खावे; त्यांनी ते सभामंडपाच्या अंगणात खावे.


उपकारस्तुती करिता अर्पिलेल्या शांत्यर्पणातील यज्ञबलीचे मांस अर्पण केल्या दिवशीच खावे; सकाळपर्यंत त्यातील काही शिल्लक ठेऊ नये.


उपकारस्तुती म्हणून खमिराची भाकरी जाळून टाका आणि तुमच्या स्वैच्छिक अर्पणांची फुशारकी मारा; इस्राएली लोकहो तुम्ही याविषयी बढाई मिरवा, कारण असेच करणे तुम्हाला आवडते.” असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.


त्याबरोबर त्यांचे अन्नार्पण व पेयार्पण आणि एक टोपलीभर सपिठाची आणि बेखमीर भाकरी—जैतुनाच्या तेलात मळलेल्या जाड भाकरी व जैतुनाचे तेल लावलेल्या पातळ भाकरी आणाव्या.


तो येशूंच्या पायाजवळ पालथा पडला आणि त्याने त्यांचे आभार मानले—तो एक शोमरोनी होता.


परमेश्वराचे गौरव करण्यासाठी हा एकटाच आणि तोही परकीय मनुष्य आला काय?”


परमेश्वराचे ज्ञान त्यांना निश्चित होते, पण त्यांनी परमेश्वर म्हणून त्यांचे गौरव केले नाही अथवा त्यांचे आभारही मानले नाहीत. याउलट त्यांचे विचार पोकळ झाले आणि त्यांची मूर्ख मने अंधाराने व्याप्त झाली.


आपले प्रभू येशू ख्रिस्त यांच्या नावाने आपले परमेश्वर आणि पिता यांचे प्रत्येक गोष्टीसाठी नेहमी उपकार माना.


तेव्हा आपण येशूंच्या साहाय्याने परमेश्वराला आपल्या स्तुतीचा यज्ञ—त्यांच्या नावाचे गौरव करणारे आपले मुखफल सतत अर्पण करू या.


तुम्ही सुद्धा, जिवंत दगडांसारखे आत्मिक मंदिर म्हणून बांधले जात आहात, यासाठी की येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराने स्वीकारण्यास योग्य असे आत्मिक यज्ञ अर्पिण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan