Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 5:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 एखादी व्यक्ती अजाणतेने विधिनियमानुसार अशुद्ध ठरविलेल्या वस्तूला म्हणजेच खाण्यास निषिद्ध असलेल्या ग्रामपशूच्या किंवा वनपशूच्या मृत शरीराला, किंवा सरपटणार्‍या अशुद्ध प्राण्याच्या मृत शरीराला स्पर्श करेल, तर ती व्यक्ती अशुद्ध झाली. निषिद्ध असलेल्या मृत शरीराचा स्पर्श झाला, हे त्या व्यक्तीच्या लक्षात आले, तर ती व्यक्ती दोषी आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 कोणी अशुद्ध वस्तूला म्हणजे अशुद्ध वनपशूच्या शवाला, अशुद्ध ग्रामपशूच्या शवाला अथवा सरपटणार्‍या अशुद्ध प्राण्याच्या शवाला नकळत शिवल्याने अशुद्ध झाला तर तो दोषी ठरेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 किंवा कोणी अशुद्ध वस्तुला किंवा मरण पावलेल्या वनपशुला किंवा अशुद्ध मानलेल्या पाळीव प्राण्याला किंवा सरपटणाऱ्या अशुद्ध प्राण्याच्या शवाला जरी नकळत शिवल्यामुळे अशुद्ध झाला तर तो दोषी ठरेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 5:2
16 Iomraidhean Croise  

स्वतःच्या चुका कोणाला समजणार? माझ्या गुप्त दोषांबद्धल मला क्षमा करून निर्दोष ठरवा.


निघा, निघा, इथून बाहेर पडा! अपवित्र वस्तूला स्पर्श करू नका! तुम्ही जे याहवेहच्या मंदिरातील पात्रांची नेआण करता, इथून बाहेर पडा व स्वतःला शुद्ध करा.


तुम्ही ते अशुद्ध समजावे व ते खाऊ नयेत किंवा त्यांच्या मृतशरीरांना स्पर्शही करू नये.


त्यांचे मांस तुम्ही खाऊ नये किंवा त्यांच्या मृतशरीरांना स्पर्श करू नये; ते तुमच्यासाठी अशुद्ध आहेत.


जर संपूर्ण इस्राएली लोकांकडून अजाणतेने पाप घडले, आणि याहवेहनी निषिद्ध केलेल्यापैकी एखादी गोष्ट केली, ते केलेले जरी समुदायाला माहीत नसेल, पण जेव्हा त्यांना त्यांची चूक समजून येईल,


“अजाणतेने याहवेहने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य केल्याचे पाप कोणाकडून घडले, तरी ते दोषी ठरतील आणि त्याकरिता ते जबाबदार असतील.


कोणत्याही प्रकारच्या मानवी अशुद्धतेस कोणतीही व्यक्ती अजाणतेने स्पर्श करेल आणि ते अशुद्ध झाले आहेत हे त्यांना समजणार नाही, परंतु नंतर त्यांना त्यांचा दोष समजून आल्यास;


किंवा जर कोणता व्यक्ती अविचाराने शपथ घेतो, मग ती शपथ चांगली असो वा वाईट असो, नंतर आपण ती शपथ अज्ञानाने घेतली हे त्याला कळून आले, तेव्हा तो दोषी ठरेल.


जर कोणी विधिनियमांनुसार अशुद्ध वस्तूला स्पर्श करेल—मानवासंबंधीची अशुद्धता किंवा अशुद्ध पशू वा सरपटणार्‍या अशुद्ध पशूला स्पर्श करेल व नंतर याहवेहस अर्पित शांत्यर्पणाचे सेवन करेल, त्याचा लोकातून उच्छेद व्हावा.’ ”


मग हाग्गयाने त्यांना विचारले, “समजा, कोणी एखाद्या प्रेताला शिवले आणि विधिनियमानुसार तो अपवित्र झाला आणि नंतर त्याचा स्पर्श या वस्तूंना झाला, तर ते अपवित्र होते काय?” याजकांनी उत्तर दिले, “होय, ते अपवित्र होते.”


अशुद्ध व्यक्ती ज्या वस्तूला स्पर्श करेल ती अशुद्ध होईल आणि जो कोणी त्या वस्तूला स्पर्श करेल त्यानेही संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावे.”


“तुमचा धिक्कार असो! कारण तुम्ही खुणा नसलेल्या कबरांसारखे आहात, लोकांना त्यावरून चालताना त्यांना माहीत होत नाही.”


यास्तव, “त्यांच्यामधून निघा आणि त्यांच्यापासून स्वतःला वेगळे करा; प्रभूने म्हटले आहे त्यांच्या अशुद्ध वस्तूला स्पर्श करू नका, म्हणजे मी तुमचे स्वागत करेन.”


डुकरे देखील अशुद्ध आहेत; त्यांचे खूर जरी दुभागलेले आहेत, तरी ते रवंथ करीत नाहीत, त्यांचे मांस तुम्ही खाऊ नये किंवा त्यांच्या मृतशरीरांना स्पर्श करू नये.


Lean sinn:

Sanasan


Sanasan