Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 5:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 जर पाहिलेल्या किंवा माहीत झालेल्या गोष्टींबद्दल साक्ष देण्यासाठी सार्वजनिकरित्या केलेला आरोप जे ऐकतात पण काही बोलत नाहीत, तर ते पाप करतात, त्यांना जबाबदार धरले जाईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 साक्षीदाराने पाहिलेल्या किंवा त्याला माहीत असलेल्या बाबींविषयी त्याला प्रतिज्ञेवर विचारले असता त्याने ती न सांगण्याचे पाप केल्यास त्या अन्यायाबद्दल त्याने शिक्षा भोगावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 जर एखाद्याने इतरास सांगण्यासारखी साक्ष ऐकली किंवा त्याने काही पाहिले किंवा ऐकले तर त्या बाबीसंबंधी त्याने साक्ष द्यावी; तो जर साक्ष द्यावयाचे नाकारील तर पाहिलेले किंवा माहित असलेले न सांगण्याचे पाप केल्यामुळे तो दोषी ठरेल;

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 5:1
22 Iomraidhean Croise  

राजाने त्याला म्हटले, “मी तुला किती वेळा शपथ देऊन सांगावे की याहवेहच्या नावाने तू मला केवळ जे सत्य तेच सांगावे?”


“जेव्हा कोणी आपल्या शेजार्‍याचा अपराध करेल व त्यांना शपथ घ्यावी लागली, तर ते आपल्या वेदीसमोर या मंदिरात शपथ घेतील,


राजाने त्याला म्हटले, “मी तुला किती वेळा शपथ देऊन सांगावे की याहवेहच्या नावाने तू मला केवळ जे सत्य तेच सांगावे?”


माझे दोष इतके भारी आहेत की ते वाहून नेणे अशक्य आहे.


तर शेजार्‍याने दुसर्‍याच्या जनावरावर हात टाकला नाही हे सिद्ध करण्यासाठी त्याने याहवेहसमोर शपथ घ्यावी. मालकाला यावर विश्वास ठेवावा लागणार आणि त्यासाठी कोणतीही रक्कम भरून द्यायची गरज नाही.


चोरांचे साथीदार स्वतःचेच शत्रू आहेत; ते शपथ घेतात आणि सत्य सांगण्याचे धैर्य करत नाहीत.


कारण असे होऊ नये, कि मी श्रीमंत झालो तर तुम्हाला विसरेन आणि म्हणेन, ‘याहवेह कोण आहे?’ किंवा दरिद्री झालो तर कदाचित मी चोरी करेन आणि माझ्या परमेश्वराच्या नावाची निंदा होईल.”


वेदना सहन केल्यानंतर, तो जीवनाचा प्रकाश बघेल आणि समाधान पावेल; माझा नीतिमान सेवक त्याच्या सुज्ञतेमुळे अनेकांना निर्दोष ठरवेल, आणि त्यांची पापे स्वतःवर लादून घेईल.


सर्व देश व्यभिचाऱ्यांनी व्यापून टाकला आहे; कारण शाप त्यांच्यावर येऊन भूमी ओसाड झाली आहे. अरण्यातील हिरवीगार कुरणे वाळून गेली आहेत, कारण संदेष्टे दुष्कर्मे करतात आणि त्यांचे सामर्थ्य अयोग्य रीतीने वापरतात.


जो पाप करतो तोच मरेल. आपल्या आईवडिलांचा दोष त्यांची संतती वाहणार नाही किंवा आईवडील आपल्या संततीचा दोष वाहणार नाहीत. नीतिमानाचे नीतिमत्व त्यांच्यासाठी मोजले जाईल आणि दुष्टाची दुष्टता त्यांच्याविरुद्ध मोजली जाईल.


कारण सर्वजण माझे आहेत, आईवडील व लेकरे; दोघेही एकसारखे माझेच आहेत. जे पाप करतील तेच मरतील.


पण जर त्याने आपली वस्त्रे धुतली नाहीत व स्नान केले नाही, तर तो दोषीच राहील.’ ”


जो कोणी ते खाईल तो दोषी ठरेल, कारण ज्यागोष्टी याहवेहला पवित्र आहेत, त्याला त्यांनी अपवित्र केले आहे. अशा व्यक्तीला त्यांच्या लोकांमधून बहिष्कृत करावे.


“ ‘एखाद्या व्यक्तीने आपल्या बहिणीबरोबर मग ती त्याच्या पित्याची किंवा आईची कन्या असो, विवाह केला आणि त्यांनी शारीरिक संबंध ठेवले, तर ते अपमानास्पद आहे. त्यांना जाहीरपणे लोकांमधून काढून टाकावे. कारण त्याने आपल्या बहिणीचा अपमान केला आहे आणि त्यासाठी तोच जबाबदार राहील.


“इस्राएली लोकांस सांग की जो कोणी अजाणतेने पाप करून याहवेहच्या नियमानुसार निषिद्ध कृत्ये करत असेल, तर त्याच्यासाठी हे नियम आहेत.”


“याहवेहशी अविश्वासूपणा करून त्यांची कोणतीही पवित्र वस्तू चुकून दूषित करून कोणी पापी ठरला, तर त्याने दोषार्पण म्हणून, तू ठरवशील तितक्या निवासमंडपातील चांदीच्या शेकेलांच्या ठरलेल्या किमतीचा एक निर्दोष मेंढा आणावा.


“अजाणतेने याहवेहने निषिद्ध ठरवलेले एखादे कृत्य केल्याचे पाप कोणाकडून घडले, तरी ते दोषी ठरतील आणि त्याकरिता ते जबाबदार असतील.


शांत्यर्पणाच्या मांसापैकी काही मांस तिसर्‍या दिवशी खाल्ले, तर ज्याने ते अर्पण केले असेल त्याला स्वीकारले जाणार नाही. त्याचे त्यांना काहीच श्रेय मिळणार नाही, कारण ते अशुद्ध झाले आहे; त्यापैकी काहीही खाणारा व्यक्ती जबाबदार धरला जाईल.


पण जो कोणी विधीनुसार शुद्ध असला आणि प्रवासात नसला, तरीही वल्हांडण पाळीत नाही तर त्यांना आपल्या लोकांतून काढून टाकले जावे, कारण त्यांनी नेमलेल्या वेळेस याहवेहला अर्पण सादर केले नाही. त्यांच्या पापाचा परिणाम त्यांना भोगावा लागेल.


पण येशू शांत राहिले. नंतर महायाजकाने त्यांना विचारले, “जिवंत परमेश्वराच्या नावाने शपथ घालून मी तुला विचारतो की, परमेश्वराचा पुत्र ख्रिस्त तो तू आहेस का?”


त्यांच्या शरीरामध्ये त्या क्रूसावर, “त्यांनी स्वतः आमची पापे वाहिली” यासाठी की, आपण पापी स्वभाव सोडून नीतिमत्वासाठी जीवन जगावे; “त्यांना झालेल्या जखमांच्याद्वारे तुम्ही बरे झाले आहात.”


तो आपल्या आईला म्हणाला, “तुझी अकराशे शेकेल चांदीची नाणी कोणीतरी चोरली असे तुला वाटत होते त्याबद्दल तू चोराला शाप देत होतीस ती चांदीची नाणी मीच चोरली होती.” तेव्हा त्याची आई म्हणाली, “माझ्या मुला, याहवेह तुला आशीर्वाद देवो!”


Lean sinn:

Sanasan


Sanasan