Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 26:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल आणि तुमच्यासमोर ते तलवारीने पडतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 तुम्ही आपल्या शत्रूंचा पाठलाग कराल आणि ते तुमच्यापुढे तलवारीने पडतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तुम्ही तुमच्या शत्रूंचा पाठलाग कराल व त्यांचा पराभव कराल. तुम्ही तुमच्या तलवारींनी त्यांचा वध कराल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 26:7
13 Iomraidhean Croise  

जेव्हा अम्मोनी सैन्याला समजले की, अरामी सैन्याने पळ काढला आहे, तेव्हा त्यांनी सुद्धा त्याचा भाऊ अबीशाई याच्यापुढून पळ काढून ते शहरात गेले. तेव्हा योआब यरुशलेमास परत गेला.


इकडे राजाच्या सर्व प्रांतातील इतर यहूदी लोक स्वतःच्या संरक्षणार्थ एकवटले आणि त्यांनी आपल्या सर्व शत्रूंचा संहार केला. त्यांनी पंचाहत्तर हजार लोकांचा वध केला. परंतु त्यांनी कोणाच्या मालमत्तेला हात लावला नाही.


जे याहवेहचा तिरस्कार करतात, ते दबकून गेले असते आणि त्यांना मिळालेली शिक्षा सर्वकाळ टिकली असती.


“ ‘तुमच्यातील जे उर्वरित राहतील, त्यांच्या शत्रूंच्या देशात मी त्यांची अंतःकरणे इतकी भयभीत करेन, की वार्‍याने उडून जाणार्‍या पानांचा आवाजसुद्धा त्यांना असा पळ काढावयास लावील की जणू एखादा तलवार घेऊन त्यांच्या पाठीशी लागला आहे आणि कोणीही त्यांचा पाठलाग करत नसले तरी ते पडतील.


“ ‘मी तुम्हाला शांती देईन म्हणजे तुम्ही निर्धास्तपणे झोप घ्याल. उपद्रव देणारे पशू मी हाकलून देईन आणि तुमच्या देशावर तलवार चालणार नाही.


तुम्हातील पाचजण शंभरांचा व शंभर दहा हजारांचा पाठलाग करून सर्व शत्रूंचा पराजय करतील आणि तुमचे शत्रू तलवारीने तुमच्यासमोर पडतील.


तुमचे शत्रू जेव्हा तुम्हावर हल्ला करतील, तेव्हा याहवेह त्यांचा तुमच्यासमोर पराजय करतील. ते एका दिशेकडून तुमच्यावर चालून येतील, परंतु सात दिशांना पळून जातील.


हे कसे शक्य आहे, केवळ एक मनुष्य हजार लोकांचा, किंवा दोन लोक दहा हजार लोकांचा पाठलाग करू शकतात, जर इस्राएलांच्या खडकाने त्यांना विकून टाकले नसते, जर याहवेहने त्यांना टाकले नसते, तरच असे होऊ शकले असते?


तुमच्यातील एकजण हजारांना पळवून लावतो, कारण याहवेह तुमच्या परमेश्वरांनी तुम्हाला दिलेल्या अभिवचनाप्रमाणे, याहवेह तुमच्यासाठी लढतात,


मग तिथे त्याला गाढवाचे ताजे जाभाड सापडले, त्याने ते उचलले आणि त्याने एक हजार पलिष्ट्यांस ठार केले.


बाराकाने रथांचा आणि सैन्याचा हरोशेथ-हग्गोईमपर्यंत पाठलाग केला आणि सिसेराचे संपूर्ण सैन्य तलवारीने पडले; एकही पुरुष जिवंत राहिला नाही.


तेव्हा नफताली, आशेर व मनश्शेहमधील इस्राएली लोकांना बोलाविले गेले आणि त्यांनी मिद्यान्यांचा पाठलाग केला.


योनाथान आपल्या हातापायांचा वापर करीत वर चढला, त्याच्यामागे त्याचा शस्त्रवाहक चढत गेला. पलिष्टी लोक योनाथानसमोर पडले व त्याचा शस्त्रवाहक त्याच्यामागे पलिष्ट्यांना मारत त्यांच्यामागे गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan