Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 26:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तर मी तुमच्यासोबत हे करेन: तुम्हाला एकाएकी भयंकर भीतीने ग्रासून टाकेन, तुम्हाला क्षयरोग होईल व असे भयंकर ज्वर तुम्हाला पछाडतील की त्यामुळे तुमचे नेत्र अंधुक होतील आणि तुमची शक्ती कोमेजून जाईल. तुम्ही केलेली धान्याची पेरणी व्यर्थ जाईल, कारण तुमचे पीक तुमचे शत्रू खाऊन टाकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तर मी तुमचे काय करीन ते ऐका : मी तुम्हांला घाबरे करीन, क्षयरोग व ताप ह्यांनी मी तुम्हांला पिडीन; त्यामुळे तुमचे डोळे क्षीण होतील व तुमचा जीव झुरणीस लागेल; तुम्ही बियाणे पेराल पण ते व्यर्थ जाईल, कारण त्याचे उत्पन्न तुमचे शत्रू खाऊन टाकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 जर तुम्ही तसे कराल तर मग तुम्हावर भयंकर संकटे येतील असे मी करीन; क्षयरोग व ताप ह्यानी मी तुम्हास पीडीन; ती तुमची दृष्टी नष्ट करतील, व तुमचा जीव घेतील; तुम्ही बियाणे पेराल पण तुम्हास यश मिळणार नाही तुम्हास पीक मिळणार नाही आणि तुमचे शत्रू तुमचे धान्य खाऊन टाकतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 26:16
35 Iomraidhean Croise  

“जेव्हा देशावर दुष्काळ किंवा पीडा येते किंवा पिके करपवून टाकणारा वारा किंवा भेरड, टोळ किंवा नाकतोडे आले किंवा शत्रूने त्यांच्या एखाद्या शहराला वेढा घातला, असे कोणतेही अरिष्ट किंवा रोग आला,


आतंक त्याला चहूकडून घेरून आहे आणि त्याच्या प्रत्येक पावलांवर कुत्र्यांचे भय आहे.


बाण त्याच्या पाठीतून तो ओढून काढेल, आणि त्याचे चमकणारे टोक त्याच्या पित्ताशयातून बाहेर येईल. तो भीतीने ग्रस्त होईल.


तर ज्याची पेरणी मी केली, त्याची कापणी दुसरा कोणी करो, आणि माझे पीक उपटून टाकले जावो.


त्यांच्यावर अन्यायी मनुष्य अधिकारी म्हणून नियुक्त करा; आरोप लावणारा त्याच्या उजव्या हातास उभा ठेवा.


क्षणार्धात त्यांच्या नाश होईल, भयानकता त्यांच्या वाट्याला येईल.


म्हणून त्यांनी त्यांचे आयुष्य निरर्थक केले आणि घोर भीतीने त्यांची वर्षे व्यापून टाकली.


ते म्हणाले, “जर तुम्ही याहवेह, तुमच्या परमेश्वराचा शब्द काळजीपूर्वक ऐकाल व त्यांच्या नजरेत जे योग्य ते कराल, जर त्यांच्या आज्ञांकडे लक्ष देऊन त्यांचे सर्व नियम पाळाल, तर मी इजिप्तवर ज्या पीडा आणल्या होत्या, त्या तुमच्यावर आणणार नाही, कारण मी याहवेह, तुम्हाला आरोग्य देणारा आहे.”


याहवेहचा शाप दुष्ट मनुष्याच्या घरावर असतो, परंतु नीतिमानाचे घर ते आशीर्वादित करतात.


बंदिवानांमध्‍ये लपून बसणे, किंवा मेलेल्यांमध्ये पडून राहाणे या वाचून काहीही उरणार नाही. हे सर्व करूनही त्यांचा संताप अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.


आपल्या उजव्या हाताने आणि त्यांच्या सामर्थ्यशाली भुजेने याहवेहने शपथ वाहिली आहे: “यापुढे मी कधीही तुझे धान्य, त्यांचे अन्न म्हणून तुझ्या शत्रूंच्या स्वाधीन करणार नाही, आणि तू परिश्रम करून काढलेला नवा द्राक्षारस, परकीय येऊन कधीही पिणार नाहीत.


आता दावीदाच्या वंशजांना असे सांगण्यात आले, “अरामने एफ्राईमशी युती केली आहे;” तेव्हा जंगलातील झाडे जशी वाऱ्याने हादरली जातात तशीच आहाज आणि त्याच्या लोकांची मने हादरली.


माझे लोक गहू पेरतील पण काट्यांची कापणी करतील; ते कष्ट करून स्वतःला झिजवतील, पण त्याचा काही फायदा होणार नाही. कारण याहवेहच्या भयंकर क्रोधामुळे ते लज्जेचे पीक गोळा करतील.”


“मी त्यांच्यावर चार प्रकारचे संहारक नेमणार आहे,” याहवेहने असे म्हटले, “ठार करण्यासाठी तलवार, फरपटून नेण्यासाठी कुत्री, खाऊन नष्ट करण्यासाठी पक्षी व हिंस्र श्वापदे.


मी त्यांच्या विधवांची संख्या समुद्राच्या वाळूपेक्षा अगणित करेन. मी त्यांच्या तरुणांच्या आईविरुद्ध भर दुपारी मृत्यूचा विनाशक पाठवेन; अचानक त्यांच्यावर वेदना आणि क्लेश ओढवतील,


याहवेह असे म्हणतात: मी तुला स्वतःकरिता व तुझ्या मित्राकरिता दहशत असे करेन; ते सर्व शत्रूंच्या तलवारींनी बळी पडलेले तू आपल्या नजरेने पाहशील. मी संपूर्ण यहूदीया प्रांत बाबेलच्या राजाच्या स्वाधीन करेन, तो या लोकांना गुलाम करून बाबेलला नेईल किंवा त्यांना ठार मारेल.


ते तुमची उपज व अन्न गिळंकृत करतील, तुमचे पुत्र व कन्या यांना गिळंकृत करतील, गाईगुरे व शेळ्यामेंढ्यांचे कळप हे देखील गिळंकृत करतील, आणि तुमची द्राक्षे व अंजिरेही गिळंकृत करतील. त्यांच्या तलवारीने ते तुमची जी भिस्त म्हणून तुम्ही समजता ती तटबंदीची नगरे ते नाश करतील.


तुम्ही आपले पागोटे आपल्या डोक्यावर आणि तुमची पायतणे तुमच्या पायात असू द्यावीत. तुम्ही शोक करू नये किंवा रडू नये, तर तुमच्या पापांमुळे तुम्ही झुराल व आपसातच कण्हाल.


“मानवपुत्रा, इस्राएली लोकांना सांग, ‘तुम्ही असे म्हणता: “आमचे अपराध व पापे आम्हावर भारी आहेत आणि त्यामुळे आम्ही नाश पावत आहोत. मग आम्ही कसे जगू शकतो?” ’


तुम्ही गरिबांच्या पेंढ्यावरही कर लावता आणि त्यांच्या धान्यावरही कर लावता. म्हणून जरी स्वतःसाठी चिरेबंदी भवन बांधले असतील तरी त्यामध्ये कधीही राहणार नाही, किंवा तुम्ही लावत असलेल्या भरघोस पीक देणार्‍या रमणीय जरी तुम्ही कसदार द्राक्षमळा लावला तरी त्यातील द्राक्षारस कधीच पिऊ शकणार नाही.


तू पेरणी करशील पण कापणी करणार नाही; तुम्ही जैतून फळे तुडवाल, पण ते तेल वापरणार नाही, तू द्राक्षे चिरडशील, पण त्याचा द्राक्षारस पिणार नाही.


तुम्ही पुष्कळ पेरणी केली, पण कापणी मात्र फारच थोडीच केली. तुम्ही जेवता, पण ते कधीही पुरेसे नसते. तुम्ही पीता, पण तुमची तहान भागत नाही. तुम्ही वस्त्र घालता, पण तुम्हाला ऊब मिळत नाही. तुम्ही वेतन मिळविता, पण तुम्ही ते पुष्कळ भोके असलेल्या खिशांमध्ये ठेवता.”


जे लोक यरुशलेमविरुद्ध लढले, त्या सर्व लोकांवर याहवेह ही मरी पाठवतील: स्वतःच्या पायावर उभे असतानाच त्यांचे मांस सडत जाईल; त्यांचे डोळे त्यांच्या खाचेत सडतील, आणि त्यांच्या जिभा त्यांच्या तोंडातच सडतील.


“हे लक्षात ठेवा की मी तुमच्या मुलांना धमकावेन आणि तुम्ही मला सणासाठी अर्पण म्हणून आणलेल्या पशूंची विष्ठा मी तुमच्या मुखांना फाशीन आणि तुम्हाला तसेच जाऊ देईन.


तुमचा नाश होईपर्यंत ते तुमच्या गुराचे वत्स व तुमच्या भूमीचा उपज खाऊन टाकतील. तुमचे धान्य, नवीन द्राक्षारस, जैतुनाचे तेल, वासरे आणि कोकरे ही सर्व नाहीशी करून तुमचा पूर्णपणे नाश करतील.


घराबाहेर शत्रूंची तलवार त्यांना निर्वंश करेल; आणि घराच्या आत ते भयाक्रान्त होतील. तरुण पुरुष व तरुण स्त्रिया, वृद्ध आणि बालके नाश पावतील.


जिवंत परमेश्वराच्या हातात सापडणे फार भयंकर आहे.


याहवेहचा दूत आला आणि ओफराह येथील एला वृक्षाखाली बसला. तो वृक्ष अबियेजरी योआशच्या मालकीचा होता, जिथे त्याचा पुत्र गिदोन मिद्यानी लोकांपासून वाचविण्यासाठी द्राक्षकुंडात गहू मळत होता.


तुमच्यापैकी ज्यांना मी माझ्या वेदीवरील सेवा करण्यापासून दूर करणार नाही, त्यांच्यापैकी तुझी मात्र नजर मी क्षीण करेन व तुझ्या शक्तीचा नाश करेन आणि तुझे सर्व वंशज भर तारुण्यात मरतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan