Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 24:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 “इस्राएली लोकांना आज्ञा दे की दिवे अखंड पेटत राहावे म्हणून त्यांनी कुटून काढलेले जैतुनाचे शुद्ध तेल तुझ्याकडे आणावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “इस्राएल लोकांना आज्ञा कर की, दीप सतत तेवत राहून उजेड मिळावा म्हणून जैतुनाचे हातकुटीचे निरे तेल त्यांनी तुझ्याकडे घेऊन यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 “इस्राएल लोकांस आज्ञा कर की, दीप सतत तेवत राहून प्रकाश मिळावा म्हणून जैतूनाचे हातकुटीचे शुद्ध तेल त्यांनी तुझ्याकडे घेऊन यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 24:2
27 Iomraidhean Croise  

रोज सकाळी आणि संध्याकाळी ते याहवेह यांना होमार्पणे आणि सुगंधी धूप अर्पण करतात. ते विधिपूर्वक स्वच्छ केलेल्या टेबलावर भाकरी ठेवतात आणि दररोज संध्याकाळी सोन्याच्या दीपमाळेवर दीप लावतात. आम्ही आमचे परमेश्वर याहवेहना हव्या असणाऱ्या गोष्टींचे पालन करीत आहोत. परंतु तुम्ही त्यांना सोडून दिले आहे.


तुमचे वचन माझ्या पावलांकरिता दिवा व माझ्या मार्गावरील प्रकाश आहे.


तुमचे वचन उलगडल्याने प्रकाश मिळतो; ते साध्याभोळ्यांना शहाणपण देते.


शुद्ध सोन्याचे दीपस्तंभ व त्याच्या दिव्यांची रांग व त्याची सर्व उपकरणे आणि प्रकाशासाठी जैतुनाचे तेल;


त्याने सभामंडपामध्ये मेजासमोर, निवासमंडपाच्या दक्षिण दिशेला दीपस्तंभ ठेवला


कारण ही आज्ञा एक दीपक आहे, आणि हे शिक्षण म्हणजे प्रकाश आहे; आणि ही सुधारणा व बोधवचने जीवनाचे मार्ग आहेत.


याहवेहचा आत्मा त्यांच्यावर विसावेल— शहाणपणाचा आणि समंजसपणाचा आत्मा, सल्ला आणि पराक्रमाचा आत्मा, ज्ञानाचा आत्मा आणि याहवेहच्या भयाचा आत्मा—


परमेश्वराच्या सूचनेचा आणि चेतावणीच्या साक्षीचा सल्ला घ्या. जर कोणी या शब्दाप्रमाणे बोलत नसेल तर त्यांच्याकडे पहाटेचा प्रकाश नाही.


याहवेह मोशेला म्हणाले,


सभामंडपातील जे पडदे कराराच्या कोशाला झाकतात, त्याच्याबाहेर अहरोनाने संध्याकाळपासून सकाळपर्यंत याहवेहसमोर दिवे सतत पेटत ठेवावेत, हा नियम पिढ्यान् पिढ्या असावा.


अंधारात राहणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला; मृत्युछायेच्या दरीत बसलेल्यांवर प्रकाश उदय पावला आहे.”


याचप्रकारे लोकांनी तुमची चांगली कामे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे म्हणून तुमचा प्रकाश उजळू द्या.


जे अंधारात जगत आहेत, जे मरणाच्या छायेत आहेत त्यांच्यावर प्रकाश पडावा आणि, आमच्या पायांना शांतीच्या मार्गाचे मार्गदर्शन प्राप्त व्हावे.”


“तुम्ही सेवेसाठी सज्ज व्हा व आपले दिवे जळत राहू द्या,


त्यांच्यामध्ये जीवन होते आणि तेच जीवन संपूर्ण मनुष्यजातीला प्रकाश देत होते.


जो खरा प्रकाश प्रत्येकाला प्रकाश देतो तो जगात येणार होता.


योहान एक ज्वलंत दिवा होता आणि तुम्ही त्याच्या प्रकाशाचा आनंद घेण्याचे मान्य केले.


येशू पुन्हा लोकांशी बोलले आणि म्हणाले, “मी जगाचा प्रकाश आहे. जो कोणी माझ्यामागे येतो तो कधीही अंधारात चालणार नाही, परंतु त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”


यासाठी की त्यांचे डोळे उघडावेत आणि त्यांनी अंधकारातून प्रकाशाकडे, सैतानाच्या अधिकाराऐवजी परमेश्वराच्या सत्याकडे यावे, म्हणजे त्यांना पापक्षमा मिळेल आणि माझ्यावरील विश्वासामुळे जे पवित्र केलेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांना वतन मिळावे.’


कारण, “अंधकारातून प्रकाश हो,” असे जे परमेश्वर बोलले, त्यांनी येशू ख्रिस्ताच्या मुखावरील ज्ञानाच्या तेजाचा प्रकाश आमच्या अंतःकरणात दिला आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan