लेवीय 2:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आणि अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांच्याकडे ते आणावे. याजक मूठभर पीठ आणि तेल घेतील, त्याचबरोबर सर्व धूप स्मरणाचा भाग म्हणून वेदीवर एकत्र जाळतील, हे अन्नार्पण, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मग त्याने ते अहरोनाचे मुलगे जे याजक त्याच्याकडे आणावे; त्यातून मूठभर सपीठ, तेल व सगळा धूप घेऊन याजकाने स्मारकभाग म्हणून वेदीवर त्याचा होम करावा. हे परमेश्वराप्रीत्यर्थ सुवासिक हव्य होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मग त्याने ते अर्पण अहरोनाच्या याजक मुलांकडे आणावे; त्यांनी त्यातून मूठभर सपीठ, तेल व सगळा धूप घेऊन परमेश्वराच्या चांगुलपणाबद्दल स्मरणाचा भाग म्हणून वेदीवर त्याचा होम करावा. हे परमेश्वरासाठी सुवासिक हव्य होय. हे अग्नीद्वारे केलेले होमार्पण होय. Faic an caibideil |
परंतु जो वेदीवर बैल अर्पण करतो, त्याने ते अर्पण नरबली देण्यासारखेच असते, जो कोणी वेदीवर कोकर्याचे होमार्पण करतो तो अशा व्यक्तीसारखा आहे, जो कुत्र्याची मान मोडतो; जो कोणी अन्नार्पण करतो, तो डुकराचे रक्त अर्पण करणाऱ्यासारखा आहे, आणि जो कोणी स्मरणार्थ धूप जाळतो तो एखाद्या मूर्तिपूजकासारखा आहे. त्यांनी आपले मार्ग निवडले आहेत, ते त्यांच्या घृणास्पद गोष्टी करण्यामध्ये धन्यता मानतात;