Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 16:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 याहवेह मोशेला म्हणाले, “तुझा भाऊ अहरोन याला सांग की कोश व प्रायश्चिताचे झाकण असलेल्या पडद्यामागील परमपवित्रस्थानात त्याची इच्छा होईल तेव्हा येऊ नये, नाही तर त्याला मरण येईल. कारण दयासनावरील ढगात मी प्रकट होत राहीन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा भाऊ अहरोन ह्याला सांग की, तू भलत्या वेळी पवित्रस्थानात अंतरपटाच्या आत कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नयेस, गेलास तर मरशील, कारण दयासनावरील मेघात मी दर्शन देत जाईन.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा भाऊ अहरोन ह्याच्याशी बोल व त्यास सांग की: त्याने वाटेल त्यावेळी परमपवित्रस्थानात अंतरपटाच्या आत पवित्र कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नये; अहरोन जर तेथे जाईल तर तो मरेल, कारण तेथे दयासनावरील ढगात मी दर्शन देत असतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 16:2
26 Iomraidhean Croise  

मंदिरामध्येच पवित्रस्थान व परमपवित्रस्थान असावे म्हणून मंदिराच्या मागील बाजूला जमिनीपासून छप्परापर्यंत देवदारूच्या फळ्या लावून त्याने तो वेगळा केला.


नंतर याजकांनी याहवेहच्या कराराचा कोश मंदिराच्या आतील पवित्रस्थानी; म्हणजेच परमपवित्रस्थानात आणून त्याच्या नियोजित ठिकाणी, अर्थात् करुबांच्या पंखाखाली ठेवला.


आणि त्या मेघांमुळे याजकांना सेवा करता येईना, कारण याहवेहच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरले होते.


अहरोनाने वर्षातून एकदा वेदीच्या शिंगांवर प्रायश्चित करावे. हे वार्षिक प्रायश्चित येणार्‍या पिढ्यांपर्यंत पापार्पणाच्या रक्ताने करावे. हे याहवेहसाठी परमपवित्र आहे.”


तो धूप त्याने याहवेहसमोर निखार्‍यांवर असा टाकावा की, धूपाच्या धुराने दहा आज्ञांच्या दगडी पाट्या ठेवलेला कोश व त्यावरील दयासन व्यापून जाईल; म्हणजे तो मरणार नाही.


“तुझ्यासाठी हा नेहमीचा नियम असेल: इस्राएली लोकांच्या सर्व पापांसाठी वर्षातून एकदा प्रायश्चित्त करावे.” याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे हे करण्यात आले.


“सातव्या महिन्याचा दहावा दिवस प्रायश्चिताचा दिवस आहे. एक पवित्र मेळावा भरवावा आणि स्वतःचा नकार करावा आणि याहवेहला अन्नार्पण करावे.


शिवाय, सात दिवस सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ रात्रंदिवस राहून, याहवेहने दिलेल्या आज्ञेचे पालन केल्याने तुम्ही मरणार नाही, कारण मला अशी आज्ञा देण्यात आली आहे.”


तेव्हा याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाची काठी कराराच्या नियमाच्या कोशापुढे परत ठेव, बंड करणार्‍यांना चिन्ह म्हणून ती तिथे ठेवावी. अशाने माझ्याविरुद्ध करीत असलेल्या त्यांच्या कुरकुरीचा शेवट होईल, म्हणजे ते मरणार नाहीत.”


परंतु वेदी व आतील पडद्यासंबंधी केवळ तू व तुझ्या पुत्रांनीच याजक म्हणून पवित्रस्थानातील पडद्यामागील आणि वेदीवरील पवित्र सेवा करावी. याजकपणाची सेवा मी तुला भेट म्हणून देत आहे. इतर कोणीही जे पवित्रस्थानाच्या जवळ येतील त्यांना जिवे मारावे.”


आणि ते जेव्हा परमपवित्र वस्तूंच्या जवळ येतात तेव्हा त्यांनी मरू नये पण जगावे म्हणून त्यांच्यासाठी असे करावे: अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी पवित्रस्थानात जावे आणि प्रत्येकाने काय वाहून न्यावे हे त्यांना दाखवावे.


ज्यावेळी छावणी पुढे चालण्यास निघेल, त्यावेळी अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी आत जाऊन आडपडदा खाली काढून तो कराराच्या नियमाच्या कोशावर ठेवावा.


त्याच क्षणाला, पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला, पृथ्वी हादरली, खडक फुटले


आम्हाला ही आशा जिवासाठी नांगर असून स्थिर व अढळ आहे. ती पडद्याच्या मागे आतील मंदिरात प्रवेश करणारी आहे.


आणि जसा महायाजक प्रतिवर्षी जे त्याचे स्वतःचे नाही असे रक्त घेऊन परमपवित्रस्थानात जातो, तसे त्यांना स्वर्गात जाऊन वारंवार स्वतःचे रक्त अर्पण करावयाचे नव्हते.


दुसर्‍या पडद्याच्या मागे एक खोली होती; तिला परमपवित्रस्थान म्हणत असत.


आणि दयासनावर छाया करणारे गौरवी करूबीम होते; पण एवढा तपशील पुरे.


त्यांचे गौरव व सामर्थ्य यातून निघालेल्या धुराने मंदिर भरून गेले. सात देवदूतांचे सात पीडा ओतण्याचे काम संपेपर्यंत कोणालाही मंदिरात जाता आले नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan