Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 10:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 “तू सभामंडपात जाशील तेव्हा द्राक्षारस किंवा कोणतेही आंबवलेले पेय पिऊन तिथे जाऊ नकोस, नाहीतर तू मरशील. हा नियम तुझ्या पुत्रांना व त्यांच्या पुत्र पौत्रांना पिढ्यान् पिढ्या लागू आहे,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 “जेव्हा जेव्हा तुम्ही, म्हणजे तू व तुझे मुलगे दर्शनमंडपात जाणार असाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षारस अथवा मद्य पिऊ नये; प्याल तर मराल; हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 “जेव्हा तू व तुझे पुत्र तुम्ही दर्शनमंडपामध्ये जाल तेव्हा तुमच्यापैकी कोणीही द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नये; प्याल तर मराल! हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढया कायमचा विधि आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 10:9
17 Iomraidhean Croise  

सभामंडपातील जे पडदे कराराच्या कोशाला झाकतात त्याच्याबाहेर, अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी याहवेहसमोर संध्याकाळपासून सकाळपर्यंत दिवे पेटत ठेवावे. इस्राएलात हा विधी पिढ्यान् पिढ्या असावा.”


मद्य चेष्टा करते आणि मदिरा मोठमोठ्याने भांडणे काढते; तिच्यामुळे जे पथभ्रष्ट होतात ते शहाणे नाहीत.


आणि हे सुद्धा मद्य पिऊन लटपटतात आणि मद्यापासून झोकांड्या देतात: याजक आणि संदेष्टे मद्यामुळे डगमगतात आणि द्राक्षमद्याने अस्थिर होतात. आणि मद्यापासून झोकांड्या देतात ते दृष्टान्त पाहत असताना लटपटतात, निर्णय देताना ते अडखळतात.


आतील अंगणात जाताना कोणत्याही याजकाने द्राक्षारस पिऊ नये.


जुना द्राक्षारस आणि नवीन द्राक्षारस त्यांचा समंजसपणा दूर करतात.


मग याहवेहने अहरोनाला आज्ञा दिली,


“ ‘भावी पिढीसाठी हे विधी सर्वकाळासाठी आहेत, जिथे कुठे तुम्ही राहाल: तुम्ही कोणतीही चरबी किंवा कोणतेही रक्त सेवन करू नये.’ ”


नंतर याजकाने ते हेलावणीचे अर्पण म्हणून याहवेहपुढे ओवाळावे; ते पवित्र आहे; त्याचबरोबर ओवाळलेला उराचा भाग आणि सादर केलेला मांडीचा भाग याजकासाठी असावा. यानंतर नाजीर द्राक्षारस पिऊ शकतो.


तर त्या नाजीरांनी द्राक्षारस व इतर आंबलेले पेय वर्ज्य करावे आणि त्यांनी द्राक्षारसाचा शिरका किंवा इतर आंबलेले पेय पिऊ नये. त्यांनी द्राक्षाचा रस पिऊ नये किंवा द्राक्षे किंवा मनुकेही खाऊ नयेत.


तो प्रभूच्या दृष्टीने अतिमहान होईल. तो कधीही द्राक्षारस किंवा मद्य पिणार नाही आणि मातेच्या गर्भात असतानाच तो पवित्र आत्म्याने भरून जाईल.


मद्यपान करून धुंद होऊ नका, ज्यामुळे अनीती वाढते. त्याऐवजी आत्म्याने परिपूर्ण व्हा.


तो मद्यपी अथवा भांडखोर नसावा, तर तो सौम्य व दयाळू असावा, तो पैशावर प्रीती करणारा नसावा.


मंडळीतील सेवकही आदरयोग्य व निष्कपट असावेत. ते मद्यपान करणारे नसावे व अप्रामाणिकपणे पैसा मिळविणारे नसावे.


यापुढे पाणीच पीत राहू नकोस, तर कधीकधी तू थोडासा द्राक्षारस घेत जा, कारण पोटाच्या विकाराने तू वारंवार आजारी असतोस.


अध्यक्ष हे परमेश्वराच्या घराचे कारभारी आहेत म्हणून त्यांचे जीवन निर्दोष असावे. तर स्वच्छंदी अथवा लवकर रागास येणारे, मद्यपी अथवा भांडखोर, किंवा अनीतीने धन मिळविणारे नसावेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan