Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 10:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 मग मोशेने अहरोनाचा चुलता उज्जीएलाचे पुत्र मिशाएल व एलसाफान यांना बोलावून सांगितले, “तुम्ही इकडे या आणि पवित्र स्थानासमोरील तुमच्या भावांची शरीरे उचलून छावणीबाहेर न्या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 मग अहरोनाचा चुलता उज्जीयेल ह्याचे मुलगे मीशाएल व एलसाफान ह्यांना मोशेने बोलावून सांगितले की, “तुम्ही इकडे येऊन तुमच्या बांधवांना पवित्रस्थानासमोरून उचलून छावणीबाहेर घेऊन जा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 अहरोनाचा चुलता उज्जियेल ह्याला मिशाएल व एलसाफान असे दोन पुत्र होते. मोशे त्या मुलांना म्हणाला, “या पवित्रस्थानाच्या भागाकडे जा व तुमच्या बांधवांची प्रेते पवित्र स्थानासमोरून उचलून छावणीबाहेर घेऊन जा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 10:4
10 Iomraidhean Croise  

कोहाथाचे पुत्र: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल.


आता छावणीबाहेर थोड्या दूर अंतरावर मोशे एक तंबू उभारीत असे, त्याला तो “सभामंडप असे म्हणे.” ज्याला याहवेहशी बोलायचे असेल तो छावणीबाहेर असलेल्या त्या सभामंडपाकडे जात असे.


कोहाथाच्या पुत्रांची नावे: अम्राम, इसहार, हेब्रोन व उज्जीएल. (कोहाथ एकशे तेहतीस वर्षे जगला.)


उज्जीएलाच्या पुत्रांची नावे: मिशाएल, एलसाफान व सिथ्री.


कोहाथाची कुळे: अम्राम, इसहार, हेब्रोन आणि उज्जीएल.


उज्जीएलचा पुत्र एलीजाफान हा कोहाथी कुळांचा पुढारी होता.


ते गावाच्या वेशीजवळ आले असता एका मुलाची प्रेतयात्रा बाहेर पडत होती व तो आपल्या विधवा आईचा एकुलता एक पुत्र होता. तिच्याबरोबर गावातील मोठा लोकसमूह होता.


नंतर काही तरुण पुरुष पुढे आले आणि त्यांनी त्याचा मृतदेह गुंडाळला व बाहेर नेऊन पुरून टाकला.


भक्तिमान लोकांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी मोठा शोक केला


Lean sinn:

Sanasan


Sanasan