Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 10:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 तेव्हा मोशे अहरोनास म्हणाला, “याहवेहने जे सांगितले ते असे: “ ‘जे माझ्याजवळ येतात त्यांना मी दाखवेन की मी पवित्र आहे; सर्व लोकांसमक्ष माझे गौरव होईल.’ ” यावर अहरोन शांत राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 ह्या बाबतीत मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वराने सांगितले ते हे : जे माझ्याजवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल आणि सर्व लोकांसमक्ष माझा गौरव होईल.” तेव्हा अहरोन चूप राहिला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 मग मोशे अहरोनाला म्हणाला, “परमेश्वर म्हणतो, ‘जे याजक माझ्याजवळ येतील. त्यांनी माझा मान राखलाच पाहिजे, मी पवित्र आहे हे त्यांना व सर्व लोकांस समजलेच पाहिजे. तेव्हा अहरोन, नादाब व अबीहू ह्यांच्या विषयी काहीही न बोलता गप्प राहिला.’”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 10:3
46 Iomraidhean Croise  

ही गोष्ट तुमच्यापासून दूर असो—की तुम्ही दुष्टांच्या बरोबर नीतिमान लोकांनाही मारून टाकावे, नीतिमान आणि दुष्टांना सारखेच लेखावे हे तुमच्यापासून दूर असो! सर्व पृथ्वीचे न्यायाधीश, जे योग्य ते करणार नाहीत का?”


यावर इय्योब म्हणाला, “तू एखाद्या मूर्ख स्त्रीसारखी बोलत आहेस, परमेश्वरापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय?” या सर्व गोष्टीत, इय्योबाने आपल्या शब्दाद्वारे पाप केले नाही.


तुमच्या भीतीने माझा देह थरथर कापतो; मला तुमच्या विधिनियमाचा दरारा वाटतो.


त्यांनी त्यांच्या लोकांचे शिंग उभारले आहे, ते त्यांच्या सर्व नीतिमान भक्तांना, त्यांच्या अंतःकरणासमीप, त्यांना अत्यंत प्रिय अशा इस्राएली लोकांना स्तवन पात्र केले आहे. याहवेहचे स्तवन करा.


तुमचा चाबूक माझ्यापासून दूर करा; तुमच्या हाताच्या प्रहाराने मी म्लान झालो आहे.


मी शांत राहिलो; मी माझे तोंड उघडले नाही, कारण तुम्हीच हे केले आहे.


ते म्हणतात, “शांत व्हा आणि मीच परमेश्वर आहे, हे जाणा; राष्ट्रांमध्ये माझी महिमा होईल. पृथ्वीवर माझी महिमा होईल.”


सात्विकांच्या सभेत एकत्र पवित्र परमेश्वराचे भय दिसून येते. त्यांच्याभोवती असणार्‍या सर्वांपेक्षा ते अधिक भयावह आहेत.


हे याहवेह, तुमच्या आज्ञा अटळ आहेत; पवित्रता हे तुमच्या भवनाचे अनंतकाळचे आभूषण आहे.


मी इजिप्तच्या लोकांची मने कठीण करेन आणि ते त्यांच्यामागे समुद्राच्या आत येतील. मग फारोह, त्याचे सर्व सैनिक, रथ व घोडेस्वार यांच्याकडून मी माझे गौरव करून घेईन.


मी फारोहचे मन कठीण करेन, म्हणजे तो त्यांचा पाठलाग करेल. पण फारोह व त्याच्या सैन्याकडून मी माझे गौरव करून घेईन आणि इजिप्तच्या प्रजेला समजेल की, मी याहवेह आहे.” मग इस्राएली लोकांनी तसे केले.


याहवेहची सेवा करावयास जे याजक जवळ येतात त्यांनी सुद्धा स्वतःला पवित्र करावे, नाहीतर याहवेह त्यांच्याविरुद्ध भडकतील.”


याहवेहने उत्तर दिले, “खाली जा आणि अहरोनाला तुझ्याबरोबर घेऊन ये. परंतु याजकांनी व लोकांनी याहवेहकडे सीमा ओलांडून येऊ नये, नाहीतर याहवेह त्यांच्याविरुद्ध भडकतील.”


“याजक म्हणून माझी सेवा करावी म्हणून अहरोन व त्याच्या पुत्रांना अभिषेक करून त्यांना पवित्र कर.


हिज्कीयाहने यशायाहास उत्तर दिले, “तुम्ही बोललेले याहवेह यांचे वचन चांगले आहे,” कारण त्याने असा विचार केला, “माझ्या आयुष्यभर शांती आणि सुरक्षितता असेल.”


ते मला म्हणाले, “तू माझा सेवक आहेस; इस्राएला, तुझ्यामध्ये मी माझे गौरव प्रकट करेन.”


निघा, निघा, इथून बाहेर पडा! अपवित्र वस्तूला स्पर्श करू नका! तुम्ही जे याहवेहच्या मंदिरातील पात्रांची नेआण करता, इथून बाहेर पडा व स्वतःला शुद्ध करा.


जेव्हा मी तुम्हाला राष्ट्रांतून बाहेर आणेन आणि ज्या देशांमध्ये तुमची पांगापांग झाली तिथून मी तुम्हाला एकत्र करेन, तेव्हा सुवासिक धुपाप्रमाणे मी तुम्हाला स्वीकारेन आणि मी तुमच्याद्वारे राष्ट्रांदेखत पवित्र मानला जाईन.


आणि म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: “ ‘हे सीदोन नगरी, मी तुझ्याविरुद्ध आहे, आणि तुझ्यामध्ये मी माझे गौरव प्रकट करेन. जेव्हा मी तुला शिक्षेने पिडेन, आणि तुझ्यात मी पवित्र मानला जाईन तेव्हा तू जाणशील की मीच याहवेह आहे.


मेघांनी देशाला झाकून टाकावे, तसे तू माझ्या इस्राएली लोकांवर हल्ला करशील. येणार्‍या दिवसांत, हे गोग, मी तुला माझ्या देशाच्या विरुद्ध आणेन, म्हणजे तुझ्याद्वारे राष्ट्रांच्या दृष्टीत जेव्हा मी पवित्र मानला जाईल तेव्हा ते मला जाणतील.


आणि उत्तरेकडे तोंड असलेली खोली वेदीचे राखण करणार्‍या याजकांसाठी आहे. हे सादोकचे पुत्र आहेत, केवळ तेच लेवी आहेत, जे याहवेहची सेवा करताना याहवेहसमोर येऊ शकतात.”


तेव्हा तो मनुष्य मला म्हणाला, “मंदिराच्या अंगणासमोर उत्तर व दक्षिणेच्या बाजूला असलेल्या खोल्या याजकांच्या खोल्या आहेत, तिथे जे याजक याहवेहसमोर जातात ते परमपवित्र अर्पणे; म्हणजेच धान्यार्पणे, पापार्पणे आणि दोषार्पणे खातील; कारण ते ठिकाण पवित्र आहे.


त्यामुळे तो त्याच्या लोकांमध्ये त्याचे वंशज अशुद्ध करणार नाही. मी याहवेह आहे, जो त्याला पवित्र करतो.’ ”


“अहरोनास सांग, ‘पिढ्यान् पिढ्या त्याच्या कुळातील शरीराने अपंग असलेल्या कोणीही अन्नार्पण करण्यासाठी परमेश्वराजवळ येऊ नये.


तो अहरोन याजकाचा वंशज असला, तरी शारीरिक व्यंग असल्यामुळे त्याने याहवेहला अन्न अर्पिण्यास जाऊ नये; त्याच्यात कमतरता आहे; त्याने त्याच्या परमेश्वराजवळ अन्नार्पण करण्यासाठी जाऊ नये.


त्यांनी त्यांच्या परमेश्वरासाठी पवित्र राहावे आणि त्यांच्या परमेश्वराच्या नावाला काळिमा लावू नये. ते याहवेहला अन्नार्पण म्हणजे त्यांच्या परमेश्वराचे अन्न अर्पितात, म्हणून त्यांनी पवित्र राहावे.


त्यांना पवित्र मानावे, कारण ते तुमच्या परमेश्वराला अन्न अर्पण करतात. त्यांना पवित्र समजावे, कारण मी याहवेह पवित्र आहे—मीच आहे जो तुम्हाला पवित्र करतो.


“ ‘याजकांनी माझी सेवा काळजीपूर्वक करावी, नाहीतर माझी सेवा निंदापूर्वक केल्याने त्यांना दोषी ठरवून मरणदंड भोगावा लागेल. त्यांना पवित्र करणारा मी याहवेह आहे.


शिवाय, सात दिवस सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ रात्रंदिवस राहून, याहवेहने दिलेल्या आज्ञेचे पालन केल्याने तुम्ही मरणार नाही, कारण मला अशी आज्ञा देण्यात आली आहे.”


मग तो कोरह आणि त्याच्या अनुयायांना म्हणाला, “सकाळी याहवेह त्यांचे लोक कोण आहेत आणि कोण पवित्र आहेत हे दाखवतील आणि याहवेह त्या व्यक्तीला आपल्याजवळ आणतील. ज्या पुरुषाला याहवेह निवडतील त्याला याहवेह आपल्याजवळ आणतील.


परंतु याहवेह मोशे आणि अहरोन यांना म्हणाले, “कारण इस्राएली लोकांच्या दृष्टीत मी पवित्र असावे इतका सन्मान करण्याइतपत तुम्ही माझ्यावर पुरेसा विश्वास ठेवला नाही, मी जो देश त्यांना देऊ करीत आहे त्यात या समुदायाला तुम्ही आणणार नाही.”


“जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या आईवडीलांवर अधिक प्रेम करीत असेल, तर तो मला पात्र नाही; जो कोणी माझ्यापेक्षा आपल्या पुत्र व कन्यांवर अधिक प्रेम करीत असेल, तर ते मला पात्र नाही.


हे पित्या, आपल्या नावाचे गौरव करा!” नंतर स्वर्गातून वाणी आली, “मी ते गौरविले आहे आणि पुनः गौरवेन.”


आणि तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करेन, यासाठी की पुत्रामध्ये पित्याचे गौरव व्हावे.


कारण सीनच्या अरण्यात कादेशच्या मरीबाह नावाच्या झर्‍याजवळ इस्राएली लोकांसमक्ष तू आणि अहरोनाने माझा विश्वासघात करून माझ्या पवित्रतेला आदर दिला नाही.


त्यांच्या आगमनाच्या दिवशी ते आपल्या पवित्र लोकांमध्ये गौरविले जातील आणि ज्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला त्या सर्वांना हर्षचकित करण्यासाठी येतील. यामध्ये तुमचा सहभाग आहे कारण आमची जी साक्ष तुम्हाला दिली त्यावर तुम्ही विश्वास ठेवला.


कारण ही वेळ न्यायनिवाडा करण्याची आहे आणि त्याची सुरुवात परमेश्वराच्या घराण्यातील लोकांपासून होत आहे; आणि जर त्याची सुरुवात आपल्यापासून झाली तर, जे परमेश्वराच्या शुभवार्तेप्रमाणे चालत नाहीत त्यांचे काय होईल?


“म्हणून याहवेह इस्राएलचे परमेश्वर, असे जाहीर करतात: ‘मी वचन दिले होते की, तुझ्या कुटुंबातील सदस्य सर्वकाळ माझ्यासमोर सेवा करतील.’ परंतु आता याहवेह असे जाहीर करतात: ‘ते माझ्यापासून दूर असो! जे माझा सन्मान करतात त्यांचा मी सन्मान करेन, परंतु जे माझा अवमान करतात त्यांचा अवमान होईल.’


तेव्हा शमुवेलाने त्याला सर्वकाही सांगितले, त्याच्यापासून काहीही लपवून ठेवले नाही. तेव्हा एली म्हणाला, “ते याहवेह आहेत; त्यांच्या दृष्टीने जे बरे ते करो.”


आणि बेथ-शेमेश येथील लोकांनी विचारले, “याहवेहच्या उपस्थितीत, या पवित्र परमेश्वरासमोर कोणी उभे राहावे? येथून हा कोश पुढे कोणाकडे जाईल?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan