Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 10:12 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 अहरोन आणि त्याचे जिवंत राहिलेले पुत्र एलअज़ार आणि इथामारला मोशे म्हणाला, “खमिराशिवाय तयार केलेल्या अन्नार्पणातून उरलेले धान्यार्पण घेऊन याहवेहला अर्पण करा आणि ते तुम्ही वेदीजवळ बसून खावे, कारण ते परमपवित्र आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मग मोशेने अहरोनाला व त्याचे राहिलेले मुलगे एलाजार व इथामार ह्यांना सांगितले की, “परमेश्वराच्या हव्यांपैकी उरलेले अन्नार्पण घेऊन वेदीजवळ खमिरावाचून खा, कारण ते परमपवित्र आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 मग मोशे अहरोनाला आणि एलाजार व इथामार या हयात असलेल्या त्याच्या मुलांना म्हणाला, परमेश्वराच्या अर्पणापैकी उरलेले अन्नार्पण घ्या व ते वेदीपाशी खमीराशिवाय खा, कारण ते परमपवित्र आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 10:12
14 Iomraidhean Croise  

इम्नाह लेवीचा पुत्र कोरे, पूर्वेकडील वेशीचा रखवालदार, परमेश्वराला स्वैच्छिक अर्पणावरील याहवेहना मिळालेल्या वर्गणीचे वाटप करणे आणि पवित्र भेटवस्तू यावरील अधिकारी होता.


अबीशूवा फिनहासाचा पुत्र होता. फिनहास एलअज़ाराचा पुत्र होता. एलअज़ार अहरोनाचा पुत्र होता. अहरोन मुख्य याजक होता—


आणि उत्तम गव्हाच्या पिठाच्या दोन बेखमीर गोल भाकरी कराव्या, त्या बेखमीर भाकरी आणि जैतुनाचे तेल मिसळून केलेल्या असाव्यात आणि बेखमीर पिठाच्या व जैतुनाचे तेल लावलेल्या पातळ भाकरी कराव्या.


त्यांचे समर्पण आणि पवित्रीकरण करण्यासाठी प्रायश्चित्त केलेले अर्पण त्यांनी खावे. परंतु कोणी परक्याने ते खाऊ नये, कारण ते पवित्र आहे.


अहरोनाने अम्मीनादाबाची कन्या, नहशोनाची बहीण एलीशेबा हिच्याबरोबर विवाह केला. तिच्यापासून त्याला नादाब व अबीहू, एलअज़ार व इथामार झाले.


अन्नार्पणे, पापार्पणे आणि दोषार्पणे यातून ते खातील; आणि जे सर्वकाही इस्राएल लोक याहवेहस समर्पित करतात ते याजकांच्या मालकीचे होईल.


ते तुम्ही पवित्रस्थानी बसून खावे, कारण याहवेहला अर्पण केलेल्या यज्ञपशूचा तो भाग तुमच्यासाठी व तुमच्या मुलांसाठी ठरलेला वाटा आहे; कारण मला तशी आज्ञा देण्यात आली आहे.


तरी त्याच्या परमेश्वराचे परमपवित्र अन्न व पवित्र अन्न तो खाऊ शकतो;


या भाकरी अहरोन व त्याच्या पुत्रांचा वाटा होय, ज्या त्यांनी पवित्रस्थानात बसून खाव्यात; कारण याहवेहला अर्पण केल्या जाणार्‍या यज्ञातील हा परमपवित्र भाग आहे. त्याचा त्यावर कायमचा अधिकार आहे.”


भाजलेल्या किंवा शिजविलेल्या किंवा तळलेल्या प्रत्येक अन्नधान्याचे अर्पण, विधी करणार्‍या याजकाचे होईल,


अहरोनाच्या पुत्रांची नावे: प्रथम जन्मलेला नादाब, मग अबीहू, एलअज़ार व इथामार.


Lean sinn:

Sanasan


Sanasan