Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 10:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 आणि याहवेहने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञांचे शिक्षण इस्राएली लोकांना देणे हे तुमचे कर्तव्य राहील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे त्यांना कळवलेले सर्व विधी तुम्ही इस्राएल लोकांना शिकवावेत.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 याप्रकारे परमेश्वराने मोशेद्वारे नेमून दिलेले सर्व विधीनियम अहरोनाने सर्व इस्राएल लोकांस शिकवावे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 10:11
16 Iomraidhean Croise  

आता पुष्कळ काळपर्यंत इस्राएलमध्ये खरे परमेश्वर नव्हते, शिकविण्यासाठी याजक आणि नियम नव्हते.


त्यांनी त्यांच्याबरोबर याहवेहच्या नियमशास्त्राचे पुस्तक घेतले आणि संपूर्ण यहूदीयामध्ये शिकविले. त्यांनी यहूदीयाच्या सर्व शहरांत जाऊन लोकांना शिक्षण दिले.


ज्यांनी याहवेहच्या सेवेसाठी योग्य समज दाखविला, त्या सर्व लेवीय लोकांना हिज्कीयाहने प्रोत्साहित केले. सात दिवस त्यांना नेमून दिलेला त्यांचा भाग त्यांनी खाल्ला आणि शांत्यर्पणाचे अर्पण केले आणि त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वराची स्तुती केली.


तेव्हा सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी एज्रा याजक मोशेचे नियमशास्त्र घेऊन बाहेर आला. ते कळण्यास समर्थ असलेले सर्व स्त्री-पुरुष सभेत एकत्र जमा झाले.


ते सर्व लोकांमध्ये जाऊन, वाचण्यात येणार्‍या परमेश्वराच्या नियमशास्त्रातील उतार्‍याचा अर्थ त्यांना समजावून सांगत होते.


त्यांनी म्हटले, “चला, उठा, यिर्मयाह विरुद्ध काहीतरी कारस्थान करू; आम्हाला नियम शिकविण्यास आमचे याजक, बोध देण्यासाठी आमचे ज्ञानी लोक, आणि संदेश देण्यासाठी आमचे संदेष्टेही नष्ट होणार नाहीत. म्हणून चला, आपण त्याच्यावर वाक्बाणाचा हल्ला करू आणि तो काय बोलतो याच्याकडे लक्ष देऊ नये.”


याजकांनी विचारले नाही, ‘याहवेह कुठे आहेत?’ नियमांचा अभ्यास करणाऱ्यांना माझी ओळख नव्हती; त्यांचे अधिपती तर माझ्याविरुद्ध बंड केले आहे. संदेष्टे बआल दैवताद्वारे संदेश देऊ लागले, आणि व्यर्थ मूर्तीचे अनुसरण करू लागले.


“याजकांच्या ओठात याहवेहसंबंधीचे ज्ञान साठविलेले असावे, कारण तो सर्वसमर्थ याहवेहचा संदेष्टा आहे आणि लोक त्याच्या मुखाद्वारे शिकवण शोधतात.


आणि मी तुम्हाला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांना सर्वकाही पाळावयास शिकवा आणि मी सदैव, युगाच्या अंतापर्यंत तुमच्याबरोबर आहे.”


कारण परमेश्वराचे संपूर्ण मनोरथ सांगण्यास मी कधीही मागेपुढे पाहिले नाही.


ते आपला निर्णय देतील आणि ते सांगतील त्याप्रमाणे अगदी तंतोतंत तुम्ही करावे. याहवेहने निवडलेल्या स्थानी त्यांनी दिलेला निर्णय तुम्ही अगदी तंतोतंत पाळावा. त्यांनी तुम्हाला जे काही करण्यास सांगितले आहे ते सर्व करण्याची काळजी घ्या.


ते तुम्हाला जे काही शिकवतील व जो निर्णय ते देतील, त्याच्या उजवीकडे वा डावीकडे न वळता, तो अंमलात आणावा.


कुष्ठरोगाच्या बाबतीत लेवी याजकाने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वागण्याची काळजी घ्या. मी त्यांना दिलेल्या आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळा.


ते तुमचे विधी याकोबाला, आणि तुमचे नियमशास्त्र इस्राएली लोकांना शिकवतील. धूपाच्या वेदीवर ते धूप जाळतील, व तुमच्या वेदीवर संपूर्ण होमबली अर्पितील.


आता प्रभू येशूंच्या अधिकाराने आम्ही तुम्हाला कोणते निर्देश दिले होते हे तुम्हास माहीत आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan