Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




लेवीय 1:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तुम्ही याहवेहसमोर त्या गोर्‍ह्याचा वध करावा आणि नंतर अहरोनाचे जे पुत्र याजक आहेत, ते त्याचे रक्त आणतील आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या वेदीभोवती शिंपडतील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 त्याने परमेश्वरासमोर त्या गोर्‍ह्याचा वध करावा, आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त अर्पून दर्शनमंडपाच्या दारापुढे असलेल्या वेदीवर सभोवती शिंपडावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 त्यानंतर त्याने परमेश्वरासमोर तो गोऱ्हा वधावा. दर्शनमंडपाच्या दाराशी परमेश्वरासमोर अर्पण करून अहरोनाचे पुत्र, जे याजक, त्यांनी त्याचे रक्त सादर करावे आणि दर्शनमंडपाच्या प्रवेशद्वारासमोरील वेदीवर सभोवती शिंपडावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




लेवीय 1:5
25 Iomraidhean Croise  

वल्हांडणाची कोकरे कापली गेली आणि याजकांनी त्यांच्या हाती दिलेले रक्त वेदीवर शिंपडले, त्यावेळेस लेवीय लोकांनी प्राण्यांची कातडी काढली.


सभामंडपाच्या प्रवेशद्वारात, याहवेहच्या समक्षतेत तो गोर्‍हा वधावा.


मेंढ्याचा वध करावा व त्याचे रक्त वेदीभोवती शिंपडावे.


“निवासमंडपाच्या प्रवेशद्वारापुढे, सभामंडपापुढे होमार्पणाची वेदी ठेवावी.


यास्तव तो अनेक राष्ट्रांवर शिंपडेल, आणि त्याच्यामुळे राजे आपले मुख बंद करतील. कारण त्यांना पूर्वी कधी कोणी जे सांगितले नव्हते, ते आता बघतील, आणि ज्यांनी ऐकले नाही, त्यांना समजेल.


मी तुमच्यावर स्वच्छ पाणी शिंपडेन, आणि तुम्ही शुद्ध व्हाल; मी तुम्हाला तुमच्या सर्व अशुद्धतेपासून आणि तुमच्या मूर्तींपासून शुद्ध करेन.


तेव्हा तो मनुष्य मला म्हणाला, “मानवपुत्रा, सार्वभौम याहवेह असे म्हणतात: होमार्पणासाठी व वेदी बांधून झाल्यावर त्यावर रक्त शिंपडण्यासाठी जे नियम आहेत ते हे:


तुम्ही याहवेहसमोर वेदीच्या उत्तर दिशेला त्या प्राण्याचा वध करावा आणि अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांनी त्याचे रक्त वेदीभोवती शिंपडावे.


याजकाने तो पक्षी वेदीजवळ आणावा, त्याचे मुंडके मुरगळून काढावे आणि त्याचे वेदीवर होम करावे; त्याचे रक्त वेदीच्या बाजूला वाहू द्यावे.


“नंतर त्याने बाहेर जाऊन लोकांसाठी आणलेल्या पापार्पणाच्या बोकडाचा वध करावा; बोकडाचे रक्त अंतरपटाच्या आत घेऊन जावे आणि गोर्‍ह्याचे रक्त त्याने ज्या ठिकाणी शिंपडले, त्याच ठिकाणी म्हणजे दयासनावर व दयासनासमोर ते शिंपडावे.


कारण शरीराचे जीवन रक्तात असते आणि तुमच्या प्रायश्चित्तासाठी मी तुम्हाला वेदीवर शिंपडण्यासाठी ते दिले आहे; रक्तात जीवन असल्यामुळे प्रायश्चित्त होते.


तुमचा हात त्याच्या डोक्यावर ठेवावा आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ त्याचा वध करावा. नंतर अहरोनाचे पुत्र त्याचे रक्त वेदीच्या भोवती शिंपडतील.


तुम्ही तुमचा हात त्या अर्पणाच्या डोक्यावर ठेवावा आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वारात त्याचा वध करावा. नंतर अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत, त्यांनी वेदीच्या भोवती त्याचे रक्त शिंपडावे.


तुमचा हात त्याच्या डोक्यावर ठेवावा आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ त्याचा वध करावा. नंतर अहरोनाचे पुत्र त्याचे रक्त अर्पण म्हणून वेदीच्या भोवती शिंपडतील.


त्या व्यक्तीने त्याचे हात पापार्पणाच्या मस्तकावर ठेवावे आणि होमार्पणाच्या स्थळी तिचा वध करावा.


होमार्पणाच्या पशूंचा वध करतात तिथे तिला आणावे, तिच्या मस्तकावर हात ठेवावा आणि पापार्पण म्हणून तिचा वध करावा.


नंतर याजकाने त्यातील काही रक्त घेऊन याहवेहसमोर सभामंडपातील धूपवेदीच्या शिंगांना लावावे व गोर्‍ह्याचे उरलेले सर्व रक्त त्याने सभामंडपातील दाराशी असलेल्या होमार्पणाच्या वेदीच्या पायथ्याजवळ ओतावे.


मी याहवेहसमोर काय आणावे आणि स्तुतीस पात्र असलेल्या परमेश्वरासमोर मी नमन करावे? होमार्पणासाठी मी एक वर्षाचे वासरू घेऊन त्यांच्यासमोर येऊ का?


गाईचे, मेंढीचे व शेळीचे प्रथमवत्स यांची तू खंडणी भरू नये; ते पवित्र आहे. त्यांचे रक्त वेदीवर शिंपडावे आणि त्यांची चरबी अन्नार्पण म्हणून जाळावी. हा याहवेहला संतोषविणारा सुगंध आहे.


प्रत्येक याजक प्रतिदिवशी धार्मिक कामे करत आणि जे यज्ञ पापे दूर करावयाला कदापि समर्थ नाहीत तेच यज्ञ वारंवार करत उभा असतो.


तुम्ही येशूंजवळ, जे नव्या कराराचे मध्यस्थ आहेत आणि हाबेलाच्या रक्तापेक्षा उत्तम वचन बोलणार्‍या, त्या शिंपडलेल्या रक्ताजवळ आला आहात.


जे परमेश्वर पित्याच्या पूर्वज्ञानानुसार निवडलेले, आत्म्याच्या पवित्रीकरणाच्या कार्याद्वारे, येशू ख्रिस्ताचे आज्ञापालन करणारे, त्यांच्या रक्ताने सिंचन झालेले: तुम्हाला भरपूर कृपा व शांती असो.


बैलाचा यज्ञ केल्यानंतर, त्यांनी त्या मुलाला एलीकडे आणले,


Lean sinn:

Sanasan


Sanasan